नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधताना, त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हे जन्माने ओबीसी (OBC) नाहीत, त्यांचा जन्म ओबीसीमध्ये झाला नाही. ते गुजरातमधील तेली (Teli) समाजात जन्माला आले. भाजपने (BJP) 2000 साली या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज ओदिशामध्ये पोहोचली. यावेळी बोलताना राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? (Rahul Gandhi on PM Modi OBC)
राहुल गांधी म्हणाले, "सर्वात आधी मला हे सांगावं लागेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्मजात ओबीसी नाहीत. नरेंद्र मोदी हे गुजरातमधील तेली समाजात जन्मला आले. आपल्या सर्वांना भयंकर बेवकूफ, मूर्ख बनवलं जात आहे. तेली जातीला भाजपने 2000 साली ओबीसीमध्ये समाविष्ट केलं. त्यामुळे मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत. तरीही ते खोटं बोलून आपण जन्मजात ओबीसी असल्याचं सांगत आहेत. मला सर्टिफेकटची काहीही गरज नाही. मला माहिती आहे ते ओबीसी नाहीत. ते कोणत्याही ओबीसीची गळाभेट घेत नाहीत. ते कोणत्याही शेतकऱ्याचा हात हातात घेत नाहीत, कोणत्या मजुराला हात लावत नाहीत. ते केवळ अदानींचा हात पकडतात. मोदी कधीही जातनिहाय गणना करु देणार नाहीत, हे मी लिहून देतो. जातीय गणना फक्त आणि फक्त राहुल गांधी आणि काँग्रेसच करु शकते"
भाजपचा पलटवार (BJP attacks on rahul Gandhi)
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या दाव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी आधी जातींचा अभ्यास करायला हवा, असं केंद्रीय मंत्री कौशल किशोर म्हणाले. ते नेहमीच जातीयगणनेबाबत बोलतात, त्यांना माहिती आहे की तेली समाज कोणत्या गटातून येतो. तेली समाज ओबीसी प्रवर्गातच समाविष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच समाजाचे आहेत. राहुल गांधी यांना त्याबाबत काहीही माहिती किंवा त्यांचा अभ्यास नाही. त्यांना देशातील जाती-पातीबाबत काहीही माहिती नाही. ते नेहमीच काहीही विचार न करता बोलतात, असा हल्लाबोल कौशल किशोर यांनी केला.
संबंधित बातम्या