Rahul Gandhi Hydgrogmn bomb press confernce: ज्या मतदारांच्या घराचा क्रमांक शून्य (House No 0) आहे, ते मतदार हे बेघर आहेत, हा देशाचे मुख्य निवडणूक (Election Commission) आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदार यादीतील घोळाचे धक्कादायक पुरावे प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशात तब्बल 93 हजार बेघर मतदार असल्याचे म्हटले होते. या मतदारांकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने त्यांचा पत्ता लिहताना घराचा क्रमांक 0 लिहला जातो, असे स्पष्टीकरण ज्ञानेश कुमार यांनी दिले होते. मात्र, राहुल गांधी यांनी हे सर्व दावे खोडून काढले. (Fake voters news)

Continues below advertisement

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणतात की, काही लोकांकडे घर नसतं पण ज्यांचं नाव मतदार यादीत असते. या व्यक्ती रात्री जिथे झोपतात ती जागा यांचा पत्ता असतो. मग ही जागा रस्त्याच्या कडेला, पुलाखाली किंवा दिव्याखाली असू शकते. या लोकांचा पत्ता हाऊस नंबर 0 असा असतो, असे ज्ञानेश कुमार यांनी म्हटले होते. आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा हरियाणातील हाऊस नंबर 0 पत्ता असणाऱ्या मतदाराची ओळख पटली. मात्र, गावात या व्यक्तीचे मोठे घर होते. हाऊस नंबर 0 पत्ता असलेले हे मतदार निवडणूक झाल्यानंतर सापडत नाहीत. मतदान होताच हे सगळेजण गायब होतात, त्यांना शोधणे अवघड असते. त्यामुळे ज्ञानेश कुमार खोटं बोलत आहेत. मतदार यादीतील ही गोष्ट चूक नाही, तर जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे. मतदार यादीतील बेघर व्यक्तींचे कपडे पाहून ते बेघर नाहीत, हे स्पष्टपणे लक्षातही येते, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

Fake Voting: ब्राझीलियन मॉडेलचं हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदान

निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढून टाकण्यासाठी सॉफ्टवेअर आहे, पण ते ते का वापरत नाहीत? यासाठी एआयचीही आवश्यकता नाही; ते काही सेकंदात ते काढून टाकू शकतात, पण ते असे करत नाहीत कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे. निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे. हा ठोस पुरावा आहे. राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवला आणि विचारले, "निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?" ते म्हणाले की, माझा एक प्रश्न आहे: हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन मुलीची भूमिका काय आहे? या मुलीने हरियाणा विधानसभा निवडणुकीत 10 वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. 

Continues below advertisement

आणखी वाचा

ऑपरेशन सरकार चोरी! ब्राझीलच्या माॅडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बाॅम्ब