Thackeray Group Vs Shinde Group: पुण्यात (Pune) ठाकरे (Uddhav thackeray) आणि शिंंदे (Eknath Shinde) समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर हा प्रकार घडला आहे. हा सगळा हैदोस थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Thackeray Group Vs Shinde Group: नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, एका विशेष कार्यक्रमासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुण्यातील (Pune) गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर आले होते. त्यावेळी ठाकरे (Uddhav thackeray) समर्थक आणि शिंदे (Eknath Shinde) समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे समर्थक बाहेर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. शिंदे समर्थकांच्या घोषणाबाजीनंतर ठाकरे समर्थक आक्रमक झाले. त्यांच्याकडूनही घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटाचे पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिला कार्यकर्ताही आपापसात भिडले आहेत. यातच परिस्थिती निवळत नसल्याचं पाहत अखेर पोलिसांना मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या मार्गावर थांबवलं. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढून त्यांना येथून जाण्यास सांगितलं आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Thackeray Group Vs Shinde Group: दापोलीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे-ठाकरेंचे समर्थक आमने-सामने
आजच्या पुण्याच्या राड्या आधी शुक्रवारी दापोलीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरेंचे समर्थक आमने-सामने आले होते. आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. त्यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट समर्थकांनी ताब्यात घेतली. शिवाय आमदार योगेश कदम समर्थकांनी उध्वव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.