Prithviraj Chavan on Dharmendra Pradhan Resignation : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा (Dharmendra Pradhan Resignation) म्हणजे खरंतर लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) तो स्वीकारला की नाही? ते अजून कळलेलं नाही. शिवाय त्या संदर्भात पर्यायी व्यवस्था आणि जबाबदारी अजून कुणाकडे दिली आहे, हे देखील कळायचं बाकी आहे. पण विद्यार्थी ताकद आणि युवाशक्तीचा आज मोठा विजय झाला आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीचा हा विजय झालेला आहे.अशीप्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे. (Prithviraj Chavan on Dharmendra Pradhan Resignation)

Continues below advertisement

दरम्यान, मला वाटतं की हा राजीनामा जर संसदेचं अधिवेशन सुरू होण्याआधी झाला असता तर कदाचित संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे चालवलं गेलं असतं. सोबतच हा मोदी सरकारच्या कार्यकाळातील जबाबदारी स्वीकारून दिलेला पहिला राजीनामा आहे आणि मला वाटतं या एकाच वाक्यात वर्णन करायचझालंतर 'बिगिनिंग इज द एंड' (Beginning is the end)' असेकरतायेईल, असेहीतेम्हणाले. तर यापुढे मोदी सरकार चालणार नाही. युवाशक्ती मोदी सरकारला उलवून टाकल्याशिवाय राहणार नाही. असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

Prithviraj Chavan: .... देशव्यापी युवांची ताकद, आंदोलनापुढे मोदींना नमतं घ्यावं लागलं

Continues below advertisement

देशाने यापूर्वी अनेक आंदोलनं बघितली आहे. मात्र अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांनी उभं केलेलं हे देशव्यापी आंदोलन पहिल्यांदाच अनुभवले आहे. आपण मंडलच्या वेळेच आंदोलन पाहिलं, गुजरात मधलं विद्यार्थ्यांच आंदोलन पाहिलं आणि इतर शेतकऱ्यांची आंदोलन पाहिली. मात्र देशव्यापी युवांची ताकद यातून दिसून आली. आंदोलन कुठल्याही विभागाचं किंवा जातीचं, धर्माचे, भाषेचं हे आंदोलन नव्हतं. त्यामुळे या आंदोलनापुढे मोदींना नमतं घ्यावं लागलं, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

Prithviraj Chavan: फास्टट्रॅक कोर्टचा काहीही उपयोग होणार नाही, ती केवळ तात्पुरती मलमपट्टी

परिणामी, पंतप्रधान मोदी पॅनिकमोड मध्ये गेलेले आहेत. ते मध्यरात्री व्हिडिओ प्रसारित करून युवकांना संबोधित करतात. मात्र हीच गोष्ट तुम्ही आधी का केली नाही. मोदींच्या कार्यकाळात 142 पेपर लीग झाले आहेत. याला राजकीय पाठबळ मिळालं होतं, प्रचंड मोठा माफिया यामागे काम करत होता. त्यामुळे यामागे कुणाचं संरक्षण होतं, हे शोधलं पाहिजे. शिवाय फास्टट्रॅक कोर्टचा काहीही उपयोग होणार नाही. ती केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. त्यामुळे मूलभूत सुधारणा करणे सरकारला आता आवश्यक आहे. न केल्यास जनतेच्या आणि युवाशक्तीच्या प्रचंड मोठ्या असंतोष आणि रोषाला या सरकारला पुन्हा सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या