Varanasi : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदी 6 हजार 223 मतांनी पिछाडीवर गेले आहेत. सकाळी 9.15 मिनिटांनी आलेला हा कल आहे. काँग्रेसच्या अजय राय यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत अजय राय यांनी 11,480 मत मिळवली आहेत. तर नरेंद्र मोदींना 5257 मत पडली आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची आकडेवारी दिली आहे. त्यामुळे देशातील सर्वात महत्वपूर्ण असलेल्या जागेवर यावेळी सुरुवातीच्या कलांमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान हे सुरुवातीचे कल असून यामध्ये मोठे बदल होऊ शकतात. नरेंद्र मोदी गेल्या दोन निवडणूकांमध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींनी देशाचे नेतृत्व करताना वाराणसी हा मतदारसंघ निवडला होता. त्यामुळे वाराणसी हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जातो. दरम्यान, हे सुरुवातीचे कल आहेत. यामध्ये पुढे बदलही होऊ शकतात.
Varanasi : नरेंद्र मोदी वाराणसीमधून पिछाडीवर, पहिल्या फेरीनंतर काँग्रेसच्या अजय राय यांना 6 हजार 223 मतांची आघाडी
सुमित भुजबळ | Sumit Bhujbal | 04 Jun 2024 09:46 AM (IST)
Varanasi : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदी 6 हजार 223 मतांनी पिछाडीवर गेले आहेत. काँग्रेसच्या अजय राय यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
Photo Credit - abp majha reporter