Prakash Mahajan On Raj Thackeray: नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session Nagpur 2025) सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून नागपुरात एक मोठी घडामोड घडली. मनसेतून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) आणि मनसेचे माजी ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रामगिरी बंगल्यावर पोहोचले. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यावरुन सूचक वक्तव्य केलं. 

Continues below advertisement

प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत विचारण्यात आले. यावर माझं वैयक्तिक काम आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पारिवारिक संबंध आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले. यावेळी प्रकाश महाजन यांनी वैभव खेडेकर यांचंही कौतुक केलं. भाजपामध्ये वैभव खेडेकर खूप आनंदी आहे. माझ्या पाल्याचा आनंद पाहायला आलो आहे. वैभव खेडेकर कमळाकडे गेला. त्यामुळे मी खूश आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले. तसेच भाजपाचा पराभव झाल्यावर आम्हाला वाईट वाटतं, नातं जुनं आहे, असं सांगत मी कधीच भाजपाविरोधात काम केलेलं नाही. आता भाजपाने ठरवायचं आहे, असं सूचक विधानही प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यामुळे प्रकाश महाजन भाजपामध्ये प्रवेश करणार की काय?, अशा चर्चांना उधाण आले आहे. 

मी राज ठाकरेंना घाबरत नाही- प्रकाश महाजन (Prakash Mahajan On Raj Thackeray)

मनसे हिंदुत्वापासून दूर जाते आहे. त्यांनी हिंदूत्वाच्या प्रश्नावर माघार घेतली. मनसेतून बाहेर पडण्यामागे हेच कारण आहे, असंही प्रकाश महाजनांनी सांगितले. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. आम्ही कधी ते लपवलं नाही. मी राज ठाकरेंना घाबरत नाही. संघ विचारांचा मी माणूस आहे, शाखेत देखील जातो, असं प्रकाश महाजन यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील अभिनेता रमेश परदेशी (पिट्या भाई)ने आपल्या सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केलेला. यावरुन राज ठाकरेंनी पिट्या भाईचा पुण्यातील एका बैठकीत पाणउतारा केला होता. यावरुनही प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर टीका केली. 

Continues below advertisement

प्रकाश महाजन काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Sharad Pawar-Ajit Pawar Meet Delhi: गौतम अदानी, अजित पवार, राहुल-प्रियांका गांधींपासून श्रीकांत शिंदे जया बच्चनपर्यंत...; शरद पवारांना दिल्लीत कोण कोण भेटले?, संपूर्ण यादी समोर