Praful Patel on Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये (Sharad Pawar NCP) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar NCP) 2004 च्या विधानसभा निवडणुकीवरुन दावे-प्रतिदावे सुरुच आहेत. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा येऊन देखील काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रिपद कशामुळे देण्यात आले? असे सवाल अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना विचारताना दिसत आहेत. दोन्ही गटांच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी 2004 बाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांबाबत एक ट्वीट केले आहे. 






ट्वीटरवर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ? 


प्रफुल्ल पटेल यांनी 2004 सालाबाबत आणखी एक गौप्यस्फोट केलाय. ट्वीटर प्रफुल्ल पटेल लिहितात, होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले. हे देखील खरे आहे की, 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. आणि हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये काँग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे!


2004 बाबत शरद पवारांचे स्पष्टीकरण 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2004 मध्ये जास्त जागा येऊनही मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह कशामुळे धरला नाही? याबाबत शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2004 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेतला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या 


भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळ म्हणाले...