नवी दिल्ली : आपण जिवंत असेपर्यंत ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, तसंच धर्माच्या आधारे आरक्षण लागू होऊ देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Exclusive Interview On ABP)  म्हणाले. ईडीच्या कारवाईत बाहेर येत असलेला पैसा निर्दोष लोकांचा आहे का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी विचारला. पंतप्रधान मोदींचा शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये रोड शो झाला. यावेळी पंतप्रधान मोदींशी एबीपी नेटवर्कच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांनी सुपर एक्स्लुझिव्ह संवाद साधलाय.


यावेळी पीएम मोदी म्हणाले की, भाषा आणि संस्कृती वेगवेगळी असली तरी  असा जोश आणि उत्साह फार कमी वेळा पाहिला गेला आहे. यावेळी ओडिशातील लोकांमध्ये खूप उत्साह आणि चमक आहे. भाषेची समस्या असूनही ओडिशातील लोकांशी हृदयाचे कनेक्शन आहे, ओडिशासाठी हा एक टर्निंग पॉइंट असून या ठिकाणी भाजपची सत्ता येणार आहे. 


पश्चिम बंगला आणि ओडिशामध्ये भाजप सर्व जागा जिंकणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम बंगाल ही एकेकाळी देशाची आर्थिक राजधानी होती. बंगालच्या क्षमतेवर आणि तरुणांवर अजूनही विश्वास आहे, पण चुकीच्या नेतृत्वामुळे काँग्रेसने 50 वर्षात ते उद्ध्वस्त केले.आधी डावे आणि नंतर ममता बॅनर्जींच्यामुळे बंगालचे नुकसान होतं. ज्या मुद्द्यांवर तृणमूल संसदेत प्रश्न विचारत होते आज त्याच मुद्द्यांना ममता बॅनर्जी शरण गेल्याचं दिसतंय. त्यामुळे यावेळी लोकसभेत पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये क्लीन स्वीप होणार आहे.


ईडीच्या छापेमारीवर काय म्हणाले पंतप्रधान? 


तपास यंत्रणांच्या छाप्यांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ईडीने नोंदवलेल्या सर्व प्रकरणांपैकी केवळ 3 टक्के प्रकरणे राजकीय लोकांशी संबंधित आहेत. सर्वांना दिसत आहे की नोटांचे ढीग बाहेर पडत आहेत. बँक मशीन्सने नोटा मोजाव्या लागतात. आतापर्यंत सुमारे 1.25 लाख कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे पैसे कुठून आले? हे पैसे निरपराध लोकांचे आहेत का?


काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस धर्माच्या आधारे आरक्षण देऊन संविधानाच्या विरोधात काम करत आहे. आरक्षणासाठी टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत मी ओबीसी, एससी-एसटी आरक्षणाचा एक अंशही कमी करणार नाही.


आपल्याला महिला वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत असून दिल्लीत त्यांचा मुलगा बसल्याची भावना महिलांची असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. महिला वर्गाचा पाठिंबा हा आमच्यासाठी एक संरक्षक कवच आहे. येत्या 4 जून रोजी भाजप आणि एनडीएचा  भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय होणार असल्याचा दावा मोदींनी केला. 


ही बातमी वाचा : 



VIDEO : PM Narendra Modi SUPER EXCLUSIVE : जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही, मोदींची मुलाखत