शिर्डी : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याने धक्कादायक वक्तव्य केलं. काँग्रेस कसाबची बाजू घेतंय, हा शहीदांचा अपमान, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इंडिया आघाडीचे सरकार गोरगरीबांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देणार असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी सुजय विखेंच्या प्रचारार्थ शिर्डीतील प्रचारसभेत हे वक्तव्य केलं आहे.
काँग्रेसकडून शहीदांचा अपमान
26/11 मुंबईचा हल्ला कुणी केला होता, असा सवाल मोदींनी नागरिकांना विचारला. 26 /11 चा हल्लाबाबत काँग्रेसचे नेत्याने भयानक वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेत्याने कसाबला निर्दोष म्हटलं आहे, त्यामुळे हा शहीदांचा अपमान आहे.
मोदींची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात अहमदनगर जिल्हा दिशा देणार आहे. विखे पाटील यांचं मोठं योगदान आहे आज याची मला आठवण येत आहे. आज तिसऱ्या परवाच्या मतदान सुरू आहे आणि बीजेपी आणि एनडीए भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे. निवडणुकीआधी इंडिया आघाडीचा किल्ला मातीच्या किल्ल्यासारखा ढासळणार आहे. इंडिया आघाडी आपल्याच लोकांच्या तुष्टीकरणांमध्ये लागली आहे. काँग्रेसला मुस्लिम लीग बनूनन टाकलं आहे, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेसने 50 वर्षात विश्वास घात केला
एनडीएचा मुद्दा विकास सुरक्षा, सन्मान, स्वाभिमान, मात्र काँग्रेस यामधील कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही. काँग्रेस शहामृगासारखं डोकं लपवून बसलं आहे. काँग्रेसने 50 वर्ष गरिबी संपविण्याचा आश्वासन देऊन विश्वासघात केला. इंडिया आघाडीचे सरकार आले तर गोरगरिबांचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिम लोकांना देतील. स्वतःच्या वोट बँकेला खुश करण्यासाठी ते हा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मोदींनी केला आहे.