Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत कोणत्याही क्षणी ठाकरे गटाचे खासदार फोडले जाऊ शकतात, अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 'ऑपरेशन टायगर'ची (Operation Tiger) केवळ चर्चाच असली आता हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. मातोश्रीवर नुकत्याच बोलवण्यात आलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे नऊपैकी पाच खासदार गैरहजर होते. त्यामुळे दुखावलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी, 'ज्यांना जायचं आहे त्यांना जबरदस्तीनं हात धरुन थांबवण्यात काय अर्थ', अशी खंतही बोलावून दाखवली होती. यानंतर आदित्य ठाकरे यांनी आमचा आमच्या खासदारांवर अंधविश्वास असल्याचे म्हटले असले तरी अंतर्गत स्तरावर ठाकरे गटालाही आपले काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते फुटू शकतात, याची जाणीव असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर आता मातोश्रीवरुन हे खासदार फुटल्यास पुढे काय करायचे, यादृष्टीने नवी रणनीती राबवण्याचे काम सुरु झाले आहे. (Maharashtra Politics news)

Continues below advertisement

ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांच्या फुटीच्या बातम्यांच्या अनुषंगाने डॅमेज कंट्रोलसाठी सध्या प्रयत्न सुरु झाले आहेत. खासदार गेले तरी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत राहतील, असा प्रयत्न आता उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु असल्याचे समजते. त्यादृष्टीने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं काम पक्षाकडून युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते. ठाकरे गटाकडून आपल्या कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा आणि धीर देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खासदार फुटणार या अफवांवर  विश्वास ठेवू नका, सर्व खासदार आपल्यासोबत आहेत, असे काल पार पडलेल्या ईशान्य मुंबईच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. 

जे खासदार फुटणार अशा बातम्या समोर येत आहेत, त्या त्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खासदार आपल्यासोबत असल्याचे सांगत पक्ष संघटित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार अशी चर्चा असताना खासदार जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ता पदाधिकारी पक्ष सोबत राहायला हवा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत.  ईशान्य मुंबईतील आमदार, विभाग प्रमुख, पदाधिकारी यांची काल उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे आपल्यासोबत आहेत, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. ज्या खासदारांसंदर्भात संशय व्यक्त केला जातोय, त्या खासदारांना सुद्धा स्पष्टीकरण देण्याच्या सूचना ठाकरे गटाकडून करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या बैठकीला आपण अनुपस्थित का राहिलो? हे सुद्धा कार्यकर्त्यांना सांगा व पक्षाची एकजूट राहू द्या, अशा सूचना सुद्धा उद्धव ठाकरेंनी बैठकीला अनुपस्थित असलेल्या खासदारांना दिल्या आहेत. 

Continues below advertisement

Eknath Shinde Shivsena: शिंदेसेना मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार

वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी गोरेगाव नेस्को येथे शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतील आमदार नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या वर्धापन दिवसाला मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नगरसेवक आणि आमदारांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच यंदाच्या वर्धापन दिनी जिल्हा परिषद, विधान परिषद आणि पंचायत समितीत निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार केला जाईल. मात्र, चर्चा आहे ती “ऑपरेशन टायगरची”, वर्धापन दिनाला ठाकरेंच्या सेनेतील काही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का ? याची जोरदार चर्चा रंगली आहे.

तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा होणार आहे. खासदारांच्या फुटीच्या चर्चेवर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच  ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नऊ खासदार वर्धापन दिली तरी उपस्थित राहणार का? याकडे विशेष लक्ष असेल.

आणखी वाचा

Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?