Nitesh Rane : विरोधक रडीचा डाव खेळत आहे, त्यांना आता शेमड्या मुलांसारखं करायचं. हेच लोकसभेवेळी का केलं नाही? खासदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं ना. राजीनामा द्यायला लावा आणि काय परिस्थिती आहे हे दिसतील आणि व्होट जिहाद वगैरे सर्व दिसतील. असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूनी काढलेल्या सत्याच्या मोर्चावर टीका केली आहे. तर हिजाब घातल्यावर त्याचा देखील दुरुपयोग होतो. तेव्हा हे मारण्याची भाषा करत नाहीत. मुळात हा मोर्चा जरा मोहम्मद अली रोडकडे नेला असता तर फायदा झाला असता, अशा शब्दात मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज ठारेंना (Raj Thackeray) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.  

Continues below advertisement

Nitesh Rane attack on Raj Thackeray : ... त्यामुळेच रडगाणे, कागदं दाखवली जातायत

राज्यातील मच्छिमारी व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यावर मच्छिमारांना त्याचा फायदा झाला आहे. आपण शेतकऱ्यांना मदत करतो, तशीच मदत मच्छिमारांना मिळणार, सगळ्यांचा फायदा आर्थिक समृद्धीत होईल. देवाभाऊच्या सरकारमुळे हे तुम्हाला दिसतंय. पहिले मच्छिमार मोटरबाईक चालवायचे आज गाडीत बसेल. आम्ही आश्वासन देत बसलो नाही, जीआर काढलाय. मागील 11 महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांकडून निवडणुकीचे रडगाणे घातले जातायत. त्यामुळेच कागदं दाखवली जातायत, असे म्हणत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज ठाकरेंना टोला लागला आहे.

Continues below advertisement

Nitesh Rane : शेतकऱ्यांना जी मदत तशीच मद आता मच्छिमारांना मिळणार

मच्छिमारीला कृषीचा दर्जा आपण दिला होता. अशात त्यांना देखील त्याचे फायदे देणार होत. यासंदर्भात किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजपरतावा मार्फत मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनाजी मदत आपण करत होते, तशीच मदतीचा लाभ आता मच्छिमारांना मिळणार आहे. आमच्या शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना आर्थिक फायदा होणार आहे. कोकणात जे भातशेतीचे नुकसान झाले आहे, यासंदर्भात आम्ही लक्ष वेधलं आहे. जास्तीत जास्त मदत शासनाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश दिले आहेत. पंचनामे सुरु असले तरी भात शेती करणाऱ्यांना विश्वास देतो, मदत आपल्याला होणार आहे. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा -