Nilesh Rane: शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी 26 नोव्हेंबर रोजी मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. यावेळी निलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. विजय किनवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) मालवणमध्ये येऊन गेले, वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावरून कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात जुगलबंदी सुरु असल्याचे दिसून येते. आता यावर निलेश राणे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. 

Continues below advertisement

निलेश राणे म्हणाले की, निवडणूक आयोगाने, पोलिसांनी पैसे जप्त केले म्हणजे क्राईम झालेला आहे. एवढा वेळ जाऊन देखील एफआरआय सोडा, नोटीस देखील आरोपीला गेलेली नाही. हे पैसे कुठून आलेत? यासंबंधीत तपशील देखील घेण्यात आलेला नाही. हे सर्व अपेक्षित होतं. यात नवीन काहीच नाही. भाजप मालवण नगरपरिषदेच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या विरोधात कोर्टात गेलो, त्यांची काल पहिली तारीख होती. मात्र, त्यांनी साधा वकील सुद्धा दिलेला नाही. तुम्ही म्हणत होता की, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, तुम्ही गेला नाहीत. तुमचे वकीलही गेले नाहीत. हा कुठला न्याय व्यवस्थेवर विश्वास? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.  

Nilesh Rane: गुन्हा घडला म्हणजे कारवाई झाली पाहिजे

विजय केनवडेकर यांच्या घरात परवानगी मागून गेलो होतो, दरवाजा त्यांनी उघडला तेव्हा त्यांनी थांबवलं पाहिजे होतं. त्यांनी आत येऊन बसायला सांगितलं, मग अनधिकृत त्यांच्या घरी कसा गेलो? त्यांना उलटे आरोप करायला लाज वाटली पाहिजे. मी क्राइम शोधून दिले, त्यावर माझ्यावर कारवाई करणार काय? त्यांनी क्राईम करून माफी मागायची सोडून आत कसा शिरला म्हणतात, विषय बदलायचे काम सुरु आहे. आम्हाला गृहीत धरू नये, शासकीय कामाला वेळ लागतो, तो वेळ दिलेला आहे. पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा घडला म्हणजे कारवाई झाली पाहिजे, तसेच इतर दोन लोक होते त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. 

Continues below advertisement

Nilesh Rane: माझा आरोप थेट रवींद्र चव्हाण यांच्यावर

हमाम मै सब नंगे होते है, असा टोमणा नितेश राणेंनी नितेश राणेंना लगावला होता. यावर बोलताना हे उर्दू आहे, असं त्यांनी म्हटलं. मी माझ्या पक्षाचे काम करतो आणि करत राहणार. कुठे चुकीचं दिसलं तर आवाज उठवणार. मी पुराव्याच्या आधारावर बोलतो. माझा आरोप थेट रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे. ते आणि त्यांची लोक यातून वाचू शकत नाहीत. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. 

Nilesh Rane: तर तुम्ही तक्रार केली पाहिजे होती

रवींद्र चव्हाण येतात तेव्हा पैशांचे वाटप होते असं वक्तव्य निलेश राणेंनी केला होता. यावर उदय सामंत देखील जिल्ह्यात येऊन गेले, त्यांना आम्ही सांताक्लॉज म्हणायचं का? असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला होता. यावर बोलताना निलेश राणे म्हणाले की, आरोप प्रत्यारोप होत राहणार. उदय सामंत येऊन गेले तेव्हा तुम्हाला वाटलं असेल असं काही होत होतं तर तक्रार केली पाहिजे होती. मी तुमच्या विरोधात तक्रार केली. तुमचे कार्यकर्ते पैसे वाटण्यात व्यस्त होते. हातात दहा, दहा पंधरा हजार रुपये घेऊन भाजपचे सर्व कार्यकर्ते मतदारांना पैसे देण्यात ते व्यस्त होते. ते क्राइम कुठे शोधणार? रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची गाडी, घर, सोन घ्यायची बुकिंग करून ठेवली. परदेशात फिरायला जायला बँक बॅलन्स जमवत आहेत. रवींद्र चव्हाण जे पैसे देत आहेत ते पैसे 60 टक्के सुद्धा खाली गेलेले नाहीत. जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरात जात आहेत. त्यामुळे त्यातील 10 ते 15 जण खायला बसलेत, असा आरोप त्यांनी केलाय.  

Nilesh Rane: भिजलेला माणूस कुणाला घाबरत नाही

मी पैसे वाटतं असेल तर पुरावा द्या, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही फोन टॅब करू शकता. आमच्या जिल्ह्यात मालवण निवडणूक लागली, बाकी सगळ्या निवडणुका संपल्यात. भिजलेला माणूस कुणाला घाबरत नाही, धमकी का देता? जे काय करायचं ते करून टाका. दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे रवींद्र चव्हाण म्हणतात. यावरून तुमच्या मनात काय आहे हे दिसतं. ही मित्रपक्षांना धमकी आहे, असं मला वाटतं. मालवणमध्ये एका बाजूला गरिबीत आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंतीत निवडणूक होतेय, हे बघून त्रास होतोय. हे महाराष्ट्रभर पसरू नये. हे त्या-त्या ठिकाणी थांबलं तर महाराष्ट्राचे चित्र बदलेल, असे देखील निलेश राणे म्हणाले. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nilesh Rane : मालवणमधील स्टिंग ऑपरेनशनच्या आरोपांवर निलेश राणे ठाम; म्हणाले, नुसतं तो पैसा व्यवसायातला होता सांगून होणार नाही, पुरावे सादर करावेच लागतील