Nilam Gorhe: संघ काही करणार नाही, आणि स्वयंसेवक काहीही सोडणार नाही. संघाची ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच आक्रमक वाटली. त्यामुळे मला मी माझ्या मातृभूमीवर आल्यासारखेच वाटले असं म्हणत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सूचक प्रतिक्रिया देत अजितदादा सह राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी संघाच्या निमंत्रणापासून हरकतच ठेवल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी RSS शी लहानपणापासून संबंध असल्याचं वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून टोलेबाजी होत आहे. दरम्यान, आज नागपुरात संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाजप आणि शिवसेनेचे आमदार यावेळी स्मृतिभुवन परिसरात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले या दोनच आमदारांनी यावेळी उपस्थिती दर्शविली. मात्र अजितदादांसह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते यांनी संघाच्या निमंत्रणापासून फारकतच ठेवली. असं निलम गोऱ्हे म्हणाल्या."संघ काही करणार नाही, मात्र स्वयंसेवक काहीही सोडणार नाही". ही संघाची भूमिका आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखीच आक्रमक वाटली. असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
काय म्हणाल्या निलम गोऱ्हे?
"संघ काही करणार नाही, आणि स्वयंसेवक काहीही सोडणार नाही" संघाची ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखीच आक्रमक असून ती आम्हाला खूप आवडली.संघाच्या मार्गदर्शनानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे म्हणाल्या.आज नागपुरात संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते... मोठ्या संख्येने भाजप आणि शिवसेनेचे आमदार यावेळी स्मृतिभुवन परिसरात उपस्थित होते... राष्ट्रवादी काँग्रेसच्याही राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले या दोनच आमदारांनी यावेळी उपस्थिती दर्शविली... मात्र अजितदादांसह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते यांनी संघाच्या निमंत्रणापासून फारकतच ठेवली...
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप आणि शिवसेने च्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संघ पदाधिकाऱ्यांनी सुमारे दहा ते बारा मिनिटे महायुतीच्या सर्व निवडून आलेल्या आमदारांचं मार्गदर्शन केलं.संघ आता स्थापनेचे 100 वर्ष पूर्ण करत असताना, शताब्दी वर्षात संघाकडून समाजासाठी कोणते उपक्रम हाती घेतले जातील, याची माहिती देण्यात आली.. लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व आमदारांनी शताब्दी वर्षानिमित्त सुरू केल्या जाणाऱ्या उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी व्हावं अशी अपेक्षा संघ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली... संघाच्या उपक्रमांना त्यांच्या मतदारसंघात आमदार सहयोग करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: