Rohit Pawar on CJI Bhushan Gavai Attack: सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्यावर वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Continues below advertisement

यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, काल सरन्यायाधीशांवर जो काही हल्ला झाला, त्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. काल मनुवादी प्रवृत्तीच्या एका वकिलाने हल्ला केला. तो आरएसएसचा कार्यकर्ता आहे. या व्यक्तीने सरन्यायाधीशांवर हल्ला केला. ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कष्टाने ते वकील झाले. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेले ते व्यक्ती आहेत. ते सुप्रीम कोर्टाचे प्रमुख आहेत, अशा व्यक्तीवर मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट मारत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे, आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो.

Rohit Pawar on CJI Bhushan Gavai Attack: सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे

लोकशाही टिकली पाहिजे. सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे, अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे. पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशात वातावरण घडवून करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना हळूहळू सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आपला कंट्रोल असावा, असे वाटते. कोर्टात सामान्य लोकांना न्याय मिळत असतो. तिथे कुठेतरी आपला कंट्रोल असावा जेणेकरून येत्या काळात मनुवाद देशात परत आला पाहिजे, असा प्रयत्न काही लोकांचा आहे. त्याचा विरोध आम्ही करत आहोत, असे रोहित पवार यांनी म्हटले. 

Continues below advertisement

Rohit Pawar on CJI Bhushan Gavai Attack:  रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

रोहित पवार पुढे म्हणाले की, काल हे प्रकरण घडलं तेव्हा सामान्य लोकांनी लगेचच निषेध व्यक्त केला. पुरोगामी विचारांच्या सर्व पक्षांनी निषेध केला. पण, भाजपच्या नेत्यांनी आठ-आठ तास उशिरा या गोष्टीचा निषेध केला. थातूर मातुर गोष्टींवर लगेचच ट्विट करणारे भाजपचे मोठमोठे नेते हे इतक्या मोठ्या घटनेवर आठ-आठ तासांनी व्यक्त होतात. त्यामुळे आम्ही या मनुवादी व्यक्तींचा निषेध करत आहोत. त्यांनी कितीही ताकद लावली तरी या देशातून संविधानाला कोणीही हलवू शकत नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 

Baramati News : सरन्यायाधीशांवरील हल्ल्याविरोधात बारामतीतही आंदोलन 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बारामतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

आणखी वाचा