अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram jagtap) गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहेत. अजित पवार सातत्याने सर्वधर्म समभाव आणि छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा घेऊन आपण पुढे जात असल्याचं सांगतात. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आमदार असलेल्या संग्राम जगताप यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका घेतल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. विशेष म्हणजे जाहीरपणे भाषणं करत त्यांनी मुस्लिमांना लक्ष्य केल्याचंही दिसून आलं होतं. तर अजित पवारांनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीतही त्यांनी दांडी मारल्याने संग्राम जगताप यांच्या मनात नेमकं काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून समोर येत होता. त्यातच, दोन दिवसांपूर्वी संग्राम जगताप (Ahilyanagar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. अखेर, धमकी देणाऱ्यास हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे, पण आरोपी मूळ बीडचा (Beed) असल्याचीही माहिती आहे. 

Continues below advertisement

आमदार संग्राम जगताप यांचे  खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर, स्वीय सहायकाच्या तक्रारीवरुन अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला. मोबाईलवर आलेल्या या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा  देण्यात आला होता. हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप चर्चेत असतानाचा हा मेसेज आल्याने पोलिसांनी देखील त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. अखेर, अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने हैद्राबाद येथील निजामाबाद तालुक्यातील धगगी या गावातून अटक केली आहे.

आरोपी मूळ बीडचा, हैदराबादेतून अटक

हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली होती. अखेर, आरोपीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने हैद्राबाद येथील निजामाबाद तालुक्यातील धगगी या गावातून अटक केली आहे. "संग्राम को दो दिन के अंदर खत्म करूंगा" असा धक्कादायक टेक्स्ट मेसेज आमदार जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अनिस महमद हनीफ शेख, मूळचा चकलांबा, जिल्हा बीड येथील असून सध्या तो नारेगाव संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबादमध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Continues below advertisement

हेही वाचा