Navneet Rana on Election : अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. मी पाच वर्ष खासदारकीचे पूर्ण केले आणि दुसऱ्या खासदारकीच्या टर्मसाठी मैदानात उतरले आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी आपल्या उमेदवारीचे संकेत दिलेल आहेत. लोक आपल्यावर हसत होते, मराठी बोलता न येणारी व्यक्ती खासदार कशी होऊ शकते, असं म्हणत लोकांनी आपली खिल्ली उडवल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. तर राजकारणात पती रवी राणा यांनी मार्गदर्शन केल्याचंही नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.
खिल्ली उडवणाऱ्यांवर नवनीत राणांचा पलटवार
दुसऱ्या खासदारकीच्या टर्मसाठी मी मैदानात उभी आहे, असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. नेते मंचावर बसून माझी खिल्ली उडवत होते पण, ते लोकं हसत गेले मी शिकत गेली, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मी पाच वर्ष खासदारकीचे पूर्ण केले आणि दुसऱ्या खासदारकीच्या टर्मसाठी मैदानात उतरले आहे, असं म्हणज नवनीत राणा यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात नवनीत राणा यांनी सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केलं आहे.
'नेते मंचावर बसून माझी खिल्ली उडवत होते'
नवनीत राणा यांनी यावेळी म्हटलं आहे की, ''किती लोक हसत होते. काही लोक प्रेमामुळे हसत होते, पण नेते माझी गंमत करत होते. नेते मंचावर बसून माझी खिल्ली उडवत होते, या बाईला म्हणे साधं मराठी बोलता येत नाही, ती काय खासदार होणार? मी रवीजींना विचारलं की, नेते असे हसत आहेत, मी काय करु? तेव्हा त्यांनी सांगितलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं संघर्ष करा आणि तुझ्या संघर्षाची सुरुवात इथूनच आहे.'' याच संघर्षात तू खरी उतरली तर येणाऱ्या भविष्यात तुला कुणीच रोखू शकत नाही, अशाप्रकारे राजकारणात पती रवी राणा यांनी मार्गदर्शन केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
'ते लोक हसत गेले, मी शिकत गेले'
''ते लोक हसत गेले, मी शिकत गेले. ते लोक अजूनही हसत आहे आणि मी खासदारकीचे पाच वर्ष पूर्ण केले. मी खासदारकीची पाच वर्ष पूर्ण करून दुसऱ्या खासदारकीच्या टर्मला या मैदानामध्ये उतरली आहे. महिलांनी कुणालाही घाबरण्याची गरज नाही. आम्ही आपल्या पायावर आत्मनिर्भर झालो पाहिजे, बाहेर पडून आपण काम केलं पाहिजे, फक्त नवऱ्यावर आणि कुटुंबावर कुणी बोट लाखवू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे, तोपर्यंत आपण कोणतंही काम करु शकतो'' असंही नवनीत राणा यांनी यावेळी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :