Navnath Ban on Ravindra Dhangekar : शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन  (Navanath Ban) यांच्यात कार्टून कॅरेक्टरवरून जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे. 'जर मी डोरेमॉन असेल तर तुम्ही बावळट नोबिता आहात', असे थेट प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी धंगेकरांना दिले आहे. हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा धंगेकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका केली होती, ज्यावर टीका करण्याची धंगेकरांची लायकी नसल्याचे ब म्हणाले होते. यानंतर, धंगेकरांनी नवनाथ बन यांचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करत 'हा डोरेमॉन कोण?' असा प्रश्न विचारला. या टीकेला उत्तर देताना ब यांनी ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिल दिलं आहे.

Continues below advertisement

Navnath Ban on Ravindra Dhangekar : मी डोरेमॉन आहे तर तुम्ही बावळट नोबिता आहात.'

धंगेकरांच्या टीकेला उत्तर देताना यांनी म्हटले की, 'बारा पक्ष फिरुन आलेले शिवसेना नेते, ज्येष्ठ नेते रवींद्रजी धंगेकर यांनी मला डोरेमॉन म्हटलंय, पण ते विसरले आहेत की डोरेमॉन उपाय शोधतो, लोकांना मदत करतो. तुमच्या म्हणण्यानुसार मी डोरेमॉन आहे तर तुम्ही बावळट नोबिता आहात.'

Continues below advertisement

'जैन बोर्डिंग'चा घटनाक्रम- (Jain Boarding House)

15 मे 2025- ट्रस्टी आणि गोखले कंपनीत विक्री करारनामा दस्त नोंदणी 

23 जुलै 2025- ट्रस्टकडून बांधकाम आराखडा परवानगीसाठी पालिकेकडे प्रस्ताव दाखल 

8 सप्टेंबर 2025- ट्रस्ट जमिनीवर निवासी आणि व्यापारी बांधकामास परवानगी, मनपाकडून आराखडा मंजूर

6 ऑक्टोबर 2025- बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटीकडून कर्ज प्रस्तावास मंजुरी

7 ऑक्टोबर 2025- श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कडून कर्ज प्रस्तावास मंजूरी

8 ऑक्टोबर 2025- ट्रस्टी आणि गोखले कंपनीत जागा विक्री खरेदीखत दस्त नोंदणी 

8 ऑक्टोबर 2025- खरेदी खतात 230 कोटींच्या मोबदल्याचा उल्लेख, पण बाजारभाव 311 कोटी, 81 कोटींनी कमी दाखवला

8 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनी आणि बुलडाणा अर्बन (20 कोटी) व श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह (50 कोटी) यांच्यात गहाणखत दस्त

20 ऑक्टोबर 2025- धर्मादाय आयुक्तांकडून खरेदी-विक्रीला प्रकरणात जैसे थे ठेवण्याचे आदेश

24 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनी आणि बुलडाणा अर्बन व श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह यांच्यात कर्ज परतफेड दस्त

27 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनीची ट्रस्टींना ईमेल करुन व्यवहारातून माघार 

28 ऑक्टोबर 2025- धर्मादाय आयुक्तांसमोर आज पुन्हा सुनावणी

संबंधित बातमी: