Continues below advertisement

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील (Grampanchayat) तब्बल 85 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील (Nashik) तब्बल 36 ग्रामपंचायतींमधील विविध पक्षाच्या 1 ते जास्तीत जास्त 9 सदस्यांपर्यंत अशा एकूण 85 सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाचा लाभ घेत या सदस्यांनी आरक्षण कोट्यातून निवडणूक लढवली होती. मात्र, विजयानंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असतानाही त्यांनी ते सादर न केल्याने त्यांच्यावर अपल जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) ही कारवाई केली.

जिल्ह्यात जानेवारी 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राखीव जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे बागलाण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या एकूण 85 सदस्यांना अपर जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले आहे. निवडणूक निकालानंतर या व्यक्तींना 12 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सुधारणा अध्यादेशानुसार 10 जुलै 2023 अन्वये निवडून आलेले सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अध्यादेशाच्या तारखेपासून पुन्हा बारा महिन्याची मुदत वाढ देण्यात आली होती. सदर मुदत 9 जुलै 2024 रोजी संपुष्टात आलेली असून या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अपर जिल्हाधिकारी यांनी तब्बल 85 सदस्यांना एकाचवेळी अपात्र घोषित केले आहे.

Continues below advertisement

अपात्र झालेली सदस्य संख्या व ग्रामपंचायत

अंबासन ३, इजमाने ३, औंदाणेपाडा १, करंजाड ३, कुपखेडा १, कोटबेल १, कोळीपाडा ३, खमताने ४, जुने शेमळी ३, ठेंगोडा २, तरसाळी १, ताहाराबाद २, दरेगाव १, द-हाणे २, देवळाणे १, द्याने १, धांद्री ५, नळकस २, नवी शेमळी २, निताने २, पिंपळदर १, बोढरी ३, ब्राह्मणगाव ३, मळगाव भामेर ३, मोराने सांडस २, यशवंत नगर २, रातीर १, रामतीर २, लखमापूर ९, लाडूद ५, वाडीपिसोळ ३, विंचुरे १, शेवरे १, श्रीपुरवडे २, सारदे ३, सोमपूर १.

हेही वाचा

उरणमध्ये जोरदार राडा, मनसे पदाधिकाऱ्याला आईसमोरच मारहाण, भाजप आमदार महेश बालदींची माफी मागायला लावली; नेमकं काय घडलं?