Sanjay Gandhi National Park Mumbai: मुंबईतील बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park Mumbai) पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांच्यावर दडपशाही आणि दमदाटीचे आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील संजय गांधी उद्यान भागात अतिक्रमण केलेल्या झोपड्यांनचे पुनर्वसन तीन किलोमीटरच्या परिसरातच करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र, त्यांना कल्याण-शिरढोण, खोणी परिसरात घरे दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच मागणीसाठी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाविरोधात तीव्र मोर्चा काढण्यात आला.

Continues below advertisement

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग जाम केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आंदोलनामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे गेटवर पोलिसांनी तीन लेयर बॅरिकेटिंग केली आहे. मोठा संख्येत पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. तरीसुद्धा पहिला लेयर तोडून आंदोलन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या आतमध्ये बसले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासना बाहेर बोरिवलीहुन अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. बोरिवली पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागत असलेला आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. (Sanjay Gandhi National Park Mumbai Marathi News)

उद्यान प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले- (Sanjay Gandhi National Park Protest)

उद्यान प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत शासनाच्या निर्णयानुसारच पुनर्वसन केले जात असल्याचा खुलासा केला आहे. मात्र या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक पार पडली त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील बैठक घेतली, या बैठकीमध्ये म्हाडाकडून कल्याण खोणी येथे 6500 सदनिका उपलब्ध करून दिले आहे. याच ठिकाणी वन विभागाकडून नागरिकांचे स्थलांतर केली जात आहे.

Continues below advertisement