मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून महाविकास आघाडीचे अनेक नेते, आमदार, खासदार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट देत आहेत. त्यामध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार-खासदार आघाडीवर आहेत. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज तिसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, यावेळी बार्शीचे आमदार दिलीप सोपल हेही त्यांच्यासमवेत होते. त्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती. तसेच, शरद पवारांनी आत्तापर्यंत आरक्षण का दिलं नाही, असा सवालही आंदोलकांनी विचारला. 

Continues below advertisement


आझाद मैदानातून बाहेर पडताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती. तसेच, सुप्रिया सुळे या आंदोलन स्थळावरून, आझाद मैदानातून बाहेर पडताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालत आक्रमपणे घोषणा देत आत्तापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी याकडे आधी लक्ष द्यावं आणि निर्णय घ्यावा. तुम्ही आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली आणि सत्ता स्थापन केली ना, मुख्यमंत्री बनले ना? मग आता सत्तेत आहात. सरकार तुमचं आहे आणि निर्णयही तुम्हाला घ्यायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही आम्हाला काय विचारताय? आमच्यावर का टाकताय? याचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे, हे विरोधकांवर टाकू नका, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. 


प्रगल्भ नेतृत्वाने संयमाने घ्यायचं असतं - आव्हाड


आपला वैचारिक विचार असू द्यात, पण सुप्रिया सुळेंना घेराव घातला तरी आंदोलकांचा तो अधिकार आहे. कारण, सुप्रिया सुळे ह्या खासदार आहेत, राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. मात्र, त्यासोबतच शरद पवारांच्या कन्या आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. तसेच, आंदोलकांची घोषणा ही माणूसकीच्या दृष्टीतून बघायची असते, चिडलेला माणूस हा घोषणा देतो, रागवतो. पण, प्रगल्भ नेतृत्वाने ते संयमाने घ्यायचं असतं, तेच सुप्रिया सुळेंनी केलं असेही आव्हाड यांनी म्हटले. 



हेही वाचा


मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांवर पडळकरांचा बोचरा पलटवार