पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्या प्रकरण आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात होत असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राजीनामा घेणे ही प्रथा काँग्रेसमध्ये चुकीची असल्याचं म्हटलं आहे. 


नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण?


काँग्रेसच्या राजवटीत आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घतले त्यानंतर ते चौकशीला समोरे गेले. मात्र, काँग्रेसची ही प्रथा खूप चुकीची राहिल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. हे माझे व्यक्तिगत मत आहे, तेव्हाही होतं. आजही आहे. काँग्रेसच्या काळात जे राजीनामे घेतले गेले ते कुठल्या आधारावर घेतले गेले, विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेणे, आरोप केले. राजकारणापोटी कोणालाही बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचे सत्र हे काँग्रेसच्या काळामध्ये खूप चुकीचं आहे, तसेच राजकारणात आरोप होतात, प्रत्यारोप होतात. हा राजकारणाचाच भाग आहे. केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही निर्णय घेतलेले ते चुकीचे आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम त्यावेळेला झालेला असल्याचा अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. 


राजकारणातून उध्वस्त करण्याचा कार्यक्रम


काँग्रेसच्या राजवटीमध्ये आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर ते चौकशीला सामोरे गेले. मात्र काँग्रेसची ही प्रथा खूप चुकीची आहे. राजकारणातून उध्वस्त करण्याचा कार्यक्रम त्यावेळेला झाला. राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र हे काँग्रेसच्या काळात होतं. ते फार चुकीचं आहे, आरोप होतात, प्रत्यारोप होतात, हा राजकारणाचा भाग आहे. त्याबद्दल काही तक्रार नाहीये. पण केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही घेतला गेलं ते निश्चित चुकीचा आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा हा कार्यक्रम त्यावेळी झालेला आहे, असे मी सांगू शकतो, असंही पुढे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.


धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणालेत?


अजित पवार - धनंजय मुंडे यांच्याबाबत जेवढी माहिती मला आहे, तेवढी माहिती मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अजित पवार म्हणाले होते.


देवेंद्र फडणवीस - अजित पवार काय बोलले ते मला माहिती नाही. ते काय बोलले याची माहिती देईन आणि त्यावर प्रतिक्रिया देईन.