Avinash Jadhav on Prakash Surve: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागली असतानाच ‘मराठी विरुद्ध अमराठी’ वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केलंय. “मराठी माझी आई आहे, पण उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको,” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी प्रकाश सुर्वे यांच्यावर घणाघाती केलीय.  

Continues below advertisement

Avinash Jadhav on Prakash Surve: नेमकं काय म्हणाले अविनाश जाधव?

मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, अशी मुलं जन्मालाच येऊ नये जी स्वतःची आई मारायची वाट पाहतात. हा असा मुलगा कसा देवाने या माय मराठीच्या पोटी जन्माला घातला. जो आई मरायची वाट बघतोय आणि मावशी जगायची वाट बघतोय. अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत. त्यांच्या भागातील मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा हल्लाबोल त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्यावर केलाय. 

MNS Shiv Sena UBT Andolan Against Prakash Surve: प्रकाश सुर्वेंविरोधात मनसे, ठाकरे गटाचे आंदोलन

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या “माय मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे” या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीने दहिसरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन गोकुळ आनंद दहिसर (पूर्व) येथून सुरू होऊन झोन 12 पोलीस उपायुक्त (DCP) कार्यालयापर्यंत काढण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी “मराठी मानाचा अपमान सहन करणार नाही”, “प्रकाश सुर्वे माफी मागा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनादरम्यान तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुर्वे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. शेवटी प्रतिनिधीमंडळाने डीसीपींना निवेदन देत आमदार सुर्वे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. या आंदोलनात स्थानिक नागरिक, शिवसेना, मनसे आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Continues below advertisement

Prakash Surve: नेमकं काय म्हणाले होते प्रकाश सुर्वे? 

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले होते की, "मी हे सांगू इच्छितो की मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल. पण मावशी मरायला नको. कारण मावशीचं आपल्यावर जास्त प्रेम असतं. मला माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही (उत्तर भारतीयांनी) दिलं आहे. माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी तुमचं प्रेम असंच ठेवा," असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

मोठी बातमी! निवडणुकांच्या अनुषंगाने न्यायालयात सुनावणी; हायकोर्टाने मतदार यादीसंदर्भातील चारही याचिका फेटाळल्या