छत्रपती संभाजीनगर : रक्ताचं कुठलही नात नसलं तरीही मानलेले नाते देखील किती महत्वाचे असतात याच्या अनेक कहाण्या आपण नेहमी आयकत असतो. अशीच काही मानलेल्या नात्याची कहाणी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची देखील आहे. सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील मानलेल्या बहिणीकडे दरवर्षी अब्दुल सत्तार भाऊबीज (Bhaubeej) सण साजरा करतात. विशेष म्हणजे कितीही कामात व्यस्थ असले तरीही अब्दुल सत्तार अनेक  वर्षांपासून प्रत्येक भाऊबीजेला आपल्या मानलेल्या बहिणीकडे जातातच. विशेष म्हणजे त्यांच्या भाऊ बहिणीच्या या नात्याला जवळपास गेल्या 25 वर्षांची परंपरा आहे. 


पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सालाबादप्रमाणे यंदाही सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथे भाऊबीज साजरी केली आहे. सावखेडा येथील मानलेल्या बहिणीकडे दरवर्षी अब्दुल सत्तार भाऊबीज सण साजरा करतात. तर, गेल्या अनेक वर्षांपासून अब्दुल सत्तार राखी पौर्णिमा तसेच भाऊबीजसाठी नचूकता दरवर्षी सावखेडा येथे येतात. यंदाही त्यांनी 25 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी, मानलेली बहीण भागीरथीबाई धनजी पा. गोंगे यांनी नेहमीप्रमाणे भावाला रुमाल टोपी, कपडे भेट देऊन औक्षण केले. तसेच, मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील बहिणीला साडी भेट दिली. तर, अब्दुल सत्तार यांनी गोंगे परिवाराला दीपावली, पाडवा, भाऊबीजच्या शुभेच्छा दिल्या.


भाऊ बहिणीचं नातं जोपासलं 


अब्दुल सत्तार आणि भागीरथीबाई यांच्या भाऊ बहिणीच्या या नात्याला जवळपास गेल्या 25 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे, आज अब्दुल सत्तार मंत्री जरी असले, तरी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी अतिशय साध्यापणासह तितक्याच आपुलकीने भाऊ बहिणीचं नातं जोपासलं आहे. रक्ताचं कुठलही नात नसलं तरी मानलेल्या भाऊ बहिणीचं हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असत हे यातून सिद्ध होते. विशेष म्हणजे भाऊबीज प्रमाणेच प्रत्येक राखी पौर्णिमाच्या दिवशी देखील अब्दुल सत्तार न चुकता सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथे जाऊन भागीरथीबाई यांच्याकडून राखी बांधून घेतात. 


आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत...


सिल्लोड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या संवेदन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सिल्लोड शहरातील तालुका कृषी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित या किटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांच्या पाठीशी राज्यातील सरकार असून, त्यांना हवी ती संपूर्ण शासकीय मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे यावेळी सत्तार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


वडील सत्तेत मंत्री, पण मुलाने काढला सरकार विरोधातच मोर्चा; 'अजब आंदोलनाची गजब कहाणी'