Manoj Jarange Patil, जालना  : आम्ही कुठवर पक्ष- पक्ष करायचं आणि कुठवर निवडून आणायचं. माझ्या हितासाठी नाही समाजासाठी उपोषण करत आहे. कामगार सरकारच्या फायद्यासाठी बोलायला लागलेत, अशी खूप आमदार आहेत. त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा दडपण आहे. 17 सप्टेंबर रोजी मुक्ती संग्रामाचा दिवस सुरू होतो. मला गोरगरिबांच्या फायद्यासाठी लढायचे आहे. काही लोकांना नेत्यांच्या फायद्यासाठी लढायचं आहे. गरिबांच्या लेकरांचे भविष्य खराब झाला नाही पाहिजे. यासाठी आमरण उपोषण होईल टोकाचे उपोषण करणार आहे.  लढायचं का पडायचं ते पुढच्या पुढे होईल. सर्व पक्षांच्या मराठ्यांना सांगतो स्वतःच्या लेकराला विचारून बघा आरक्षणाची काय किंमत आहे", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.  ते जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


मराठ्यांच्या लेकराच्या फायद्याऐवजी सरकारच्या फायद्यासाठी बोलू लागलेत


मनोज जरांगे पाटील म्हणाले, एकही गोरगरीब मराठा सरकारच्या बाजूने राहिला नाही. मी माझ्या समाजाचं उपोषणाबद्दल फक्त ऐकत नाहीये. माझ्यासाठी नाही, तर समाजाचे लेकरं मोठी व्हावेत. यासाठी उपोषण सुरु आहे. समाजाचे माझ्यावर प्रेम आहे, माया आहे. मराठ्यांच्या लेकराच्या फायद्याऐवजी सरकारच्या फायद्यासाठी बोलू लागलेत. विरोधात बोलणाऱ्या आमदारांबाबत बोलायचंही नाही. ही देवेंद्र फडणवीसांची चाल आहे. त्यांच्यावर दडपण आणलं जात आहे. ज्या आमदारांना आम्ही मोठं केलं. ते समाजासाठी नाही तर नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढू लागलेत. या लोकांमुळेच देवेंद्र फडणवीस अडचणीत येणार आहेत. आमदार लोक समाजाच्या विरोधात बोलून राजकीय करियर खराब करु लागलेत. 


तुम्ही आरक्षण नाही दिलं तर निवडणुकीत फायदा कसा होईल?


पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, विरोधकांना जाब विचारण्याची गरज नाही. तुम्ही सत्तेत आहात. तुम्हाला एखाद्या समाजाला द्यायचं नसलं की तुमच्या जीवावर येतं. त्यांनी माझ्याविरोधात ट्रॅप रचलाय. तुम्ही आरक्षण द्या. त्याचा फायदा विरोधक घेत आहेत. तुम्ही आरक्षण दिले तर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही लोकांचे हक्क देऊन टाका. तुम्हाल द्यायचं नाही, नंतर विरोधकांना फायदा झाला म्हणून रडका पणा करायचा. तुम्ही आरक्षण द्या तुमच्या फायदा होईल. तुम्ही आरक्षण नाही दिलं तर निवडणुकीत फायदा कसा होईल? आम्ही कोणाचा ठेका घेतलेला नाही. मला राजकारणात जायचं नाही. मी मुक्तीसंग्रामा दिवशी उपोषणाला बसणार आहे. मी आणखीही सांगतो राजकारणात जायचं नाही. तुम्ही आम्हाला उपोषण द्या. माझ्या मागण्या सरकारला पाठ झाल्या आहेत, अनेकांची त्याच्यावर पीएचडी झालीये. 


इतर महत्वाच्या बातम्या 


दादा, तुमचं वागणं बदललंय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय? तुमच्यासाठी पवारसाहेबांना धोका दिला, आम्ही काय मिळवलं? अजित पवारांच्या कार्यकर्त्याचे पत्र व्हायरल