Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : "धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रामाणिक माणूस आहे, तो उपकार विसरत नाही, अशी आमची त्यांच्याबाबत भूमिका होती. त्यांच्यावर संकट होतं, त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळलं. ते कधीच उपकार विसरायचे नाहीत. ते जातीवाद करत नाहीत. मी लोकांना खूप सांगायचो. लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असं म्हणायचो. पण या चार पाच दिवसांत असं वाटू लागलंय की, ते या सगळ्यात पुढे आहेत. पोस्ट टाकायला लावतेत, त्यांचे कार्यकर्ते मला मारीन म्हणतेत", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. मनोज जरांगे पाटील हे सध्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी रुग्णालयातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.


माझे संरक्षण करायला मराठा समाज खंबीर आहे


मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझे संरक्षण करायला मराठा समाज खंबीर आहे. जातीय शांतता राहावी, असं तज्ज्ञांचे मत आहे. मी मराठा समाजाला सांगतो शांत राहा. कोण कोणत्या भावनेतून बोलतय लक्ष ठेवा. किती चूका करतेत ते पाहा. तुमच्यावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करा. माझ्याकडे येतात आणि फोटो काढतात. माझ्या डोक्याला खुराक झालाय. कशाला गोरगरिबाचे वाटोळे करता. समाज फक्त आरक्षण मागतोय, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.


माझा आणि समाजाचा कोणालाच पाठिंबा नाही


पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, माझा आणि समाजाचा कोणालाच पाठिंबा नाही. खोटा पाठिंबा कशामुळे मिरवत आहात. मी काही देव नाही. आपली जात डोळ्यासमोर ठेवा. निवडून येण्यासाठी जातीचा तोटा कशामुळे करता? करोडो मराठ्यांना माझं आव्हान आहे, मतदान करताना आपल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवा. आपलं आंदोलन विसरु नका. सर्वजण एका ताकदीने चाला. चार टप्प्यात फजिती झाली, तशी पाचव्या टप्प्यातही करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. 


राजकारण्यांना मराठ्यांची भीती 


राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे आहे. आता भीती वाटतं आहे. पाचव्या टप्प्यात सुद्धा भीती ठेवा.. प्रत्येक मतदार संघात मोदी सभा घेत आहे. 4 तारखेला पुन्हा उपोषण करणार काही झाले तरी करणार. तिथे पुढची दिशा कळेल. पुढचे उपोषण आमरण उपोषण असणार आहे. सविस्तर प्लॅन 4 तारखेला करूय आम्हाला राजकारणात यायचे नाही पण आरक्षण दिले नाही.. आम्ही सर्व मराठा समाज विधानसभेत पूर्ण ताकदीने उतरू. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल