Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha LIVE: आंदोलनाला एक दिवसांची मुदतवाढ, मनोज जरांगेंची 7 वाजता पत्रकार परिषद

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha LIVE: मनोज जरांगे पाटील हे सकाळी दहाच्या ठोक्याला मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 29 Aug 2025 06:06 PM

पार्श्वभूमी

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha LIVE : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  हे सकाळी दहाच्या ठोक्याला मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली...More

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला 1 दिवसांची मुदतवाढ, मुंबई पोलिसांचा निर्णय

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी निर्णय घेतला. आज आंदोलकांकडून करण्यात आलेल्या वाहतूक कोंडीबाबत काही नियम व अटींच्या पार्श्वभूमीवर उद्याची परवानगी दिली गेली. उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे. परवानगीबाबत पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवर  निर्णय घेण्यात आला.