Jalna News : संत महंत समाज घडवणारे एक न्याय मंदिर आहे. भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री (Namdev Shastri) असे काही बोलले असतील असे मला वाटत नाही. किंबहुना त्यांना दोष देऊन चालणार नाही. जाणाऱ्याने सांगितले असेल की असा म्हणा म्हणून. कारण ते एक मोठं श्रध्दा स्थान आहे. खंडण्याबद्दल ते बोलतील असे मला वाटत नाही. तसेच जो व्यक्ती त्या ठिकाणी गेला आहे त्याला कुठे कुठे हात पसरावे हे कळत नसावं. विकृतपणे केलेल्या कामाला समाज पाठीशी घालत नाही. तसेच वंजारी समाजाला ही हे मान्य नाही.
मात्र असे खरंच असेल तर आरोपींचं समर्थन, हे राज्याचे मोठं दुर्दैवी आहे. शेवटी महंत हे महंत असतात. या कृत्याला जर कोणी समर्थन देत असेल तर ते समर्थन हे गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे ठरेल. ते असे बोलले असतील तर भयंकर आहे. यात राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आंनद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या, असा त्याचा अर्थ होत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली आहे.
भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री (Namdev Shastri) यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असा संदेश दिला. आजपर्यंत भगवान गडाचा राजकीय कारणासाठी वापर करु न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान या प्रकरणावर भाष्य करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
... मात्र नामदेवशास्त्री असे बोलले असतील तर हे भयंकर आहे
या वक्तव्यामुळे संप्रदायवर परिणाम होण्याचं काही काय कारण. गुंड हे संप्रदाय चालवत नाही. ते काही बोलले असतील तर दुरुस्त करतील. त्यांना उगाच बोलवायला लावले आहे. कारण महंत खमके आहेत, ते असे बोलले असतील तर दुरूस्ती करतील. कदाचित त्यांना एक बाजू सांगितली असेल म्हणून ते बोलले असतील. दरम्यान महंत नामदेवशास्त्री यांच्यावर दबाव असेल असा मला विश्वास बसत नाही. मात्र ते असे बोलले असतील तर हे भयंकर आहे. यात राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आंनद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या, असा त्याचा अर्थ होतो असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
धनंजय मुंडे वातावरण दूषित करताय - मनोज जरांगे पाटील
या प्रकरणात माणसाला मारून टाकले, त्याच्या रक्ताची माया दया नाही का? तुमच्यावर फाशीची वेळ आली म्हणून बाबाजी यांचा आसरा घेण्यासाठी गेले. पूर्वी दुःख देणारे हेच का मग, हीच का ती टोळी. बाबाजी यांना तुम्ही यात ओढत आहात. किंबहुना धनंजय मुंडे वातावरण दूषित करत आहेत. हा धक्कादायक विषय आहे. न्यायची अपेक्षा न करणे आणि गुंड सांभाळणे असा त्याचा अर्थ आहे. यात बाबाजीची सल गुंडांना येणार नाही. हे प्रकरण वेगळ्या दिशेने चालले आहे. यातून राज्यात भयंकर मॅसेज जाणार आहे. असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हे ही वाचा