Manoj Jarange on Narendra Modi : "मोदींनी स्वत:चे चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला नाही. हा मराठा समाजाचा विजय आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्यावर वाईट वेळ आणली. महाराष्ट्रातील स्थानिक भाजप नेते व मराठा आरक्षण न दिल्याने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावे लागत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते मराठा समाजाचा द्वेष करतात, आरक्षण दिलं नाही म्हणून मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडण्याची वेळ आली आहे", असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) म्हणाले. ते धाराशिवमध्ये (Dharashiv) बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षण मिळाले नाही तर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचेही स्पष्ट केले. 


सहा कोटी मराठ्यांची 9 एकरात सभा होणार आहे


मनोज जरांगे म्हणाले, 1 तारखेला नारायण गडावर आमची बैठक होणार आहे. या बैठकीची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु आहे. सहा कोटी मराठ्यांची 9 एकरात सभा होणार आहे. नियोजनाची, तयारीची अंतिम बैठक देखील होणार आहे. 3 मे रोजी तयारीसाठी बैठक होईल. समज गैरसमज असल्याची गरज नाही. मी राजकारणात नाही आणि राजकारणाचा माझा संबंधही नाही. मी ना महायुतीला निवडून द्या म्हटलं ना महाविकास आघाडीला निवडून द्या म्हटलं. कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. परंतु पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. निवडून यावे, उभे राहावे, असं काही नाही. मराठ्यांना पाडायलाही शिकलं पाहिजे, असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं. 


जो सगे सोयऱ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने आहे, त्याला सहकार्य करा 


पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, जो सगे सोयऱ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने आहे, त्यांना मराठा समाजाने सहकार्य करावे. मराठ्यांची ताकद दाखवणे, खूप गरजेचे आहे. त्यांना काय इशारा द्यायचा तो गेला आहे. मराठा समाज स्वत:च्या मुलाच्या बाजूने असणार आहे. आमचा कोणताही उमेदवार नसल्यामुळे समाजाचा नाईलाज आहे. त्यांना पर्याय नाही. परंतु मराठा समाज यावेळी बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे. धनंजय मुंडेंना गोरगरिबांची जाणीव नाही. राजकारण करायचे असते तर मराठ्यांनी त्यांच्या चार पिढ्यांना निवडून दिलं नसतं. आजही मराठा समाज त्यांना विरोधात मानत नाही. त्यांच्या काही लोकांना मराठ्यांचा द्वेष आहे. त्याच्यात बदल केला तर बर होईल. विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून करतोय,असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar on PM Narendra Modi : स्त्रीयांची अब्रू घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचे पीएम मोदींचे धोरण, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, शरद पवारांची टीका