Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Marathi Reservation) प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे.

मुंबईत 29 ऑगस्टला जे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. मनोज जरांगे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, एकदा आमचे डोके फुटले, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. आंतरवलीतील आया बहिणी दुःख सहन करावं लागलं, गुढघ्याचे ऑपरेशन झाले, मांड्यांला टाके घेतलेत. त्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची, आणि त्या भानगडीत पडायचं नाही. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, गोडी गुलाबीने तुम्हाला जे करायचं ते करायचं, त्यावेळेस घडलं ते घडलं. आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. ही धमकी नाही तुम्हाला मी हे समजून सांगतो, कारण तुम्हाला ती खोड आहे. आई-बहीण, पोरांवर हात पडला तर मराठे कोणत्याही टोकाला जातील, तुमच्यामुळे देशातल्या पंत्रप्रधान मोदी साहेबांसहित सरकारला सुद्धा हादरा बसेल. मराठे वेळोवेळी मार खायला मोकळे नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण, फ्रेट कॉरिडोअरला मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

Rohit Pawar and Meghna Bordikar: माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर माय झ#$ टाकेन पोलिसांची, मेघना बोर्डीकर शेजारी असताना खुलेआम धमकी, रोहित पवारांनी ट्विट केला 'तो' व्हिडीओ