Mangesh Sable and Manoj Jarange supporter, Jalna : जालना लोकसभेत (Jalna Loksabha) अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले उमेदवार मंगेश साबळे (Mangesh Sable) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांमध्ये (Manoj Jarange supporter) बाचाबाची झाली आहे. अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे मनोज जरांगे पाटील यांचे नाव वापरून मत मागतात. मराठा समाजाची दिशाभूल करतात, असा आरोप जरांगे समर्थक विश्वंभर तरुखे यांनी केला आहे. दरम्यान, मंगेश साबळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आपण एका समाजाची लढाई लढत नसून मी मनोज जरांगे यांचं नाव वापरत नसल्याचं उमेदवार मंगेश साबळे यांनी म्हटलंय.
मंगेश साबळेंवर कोणते आरोप?
मनोज जरांगेंचे समर्थक विश्वंभर तरुखे म्हणाले, मी त्यांना विरोध केलेला नाही. मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मंगेश साबळे हा एक खोटारडा माणूस आहे. मनोज जरांगे पाटलांच्या नावावर खोट बोलून मत मागत आहे. त्याची मित्रमंडळी देखील एक ग्रुप तयार करुन काहीतरी चालवत आहेत. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. मी वारंवार त्याला सूचना दिल्या. मात्र, त्याने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही. आम्हाला टाळतो आणि दिशाभूल करत आहे. तो फक्त मराठा समाजाचे मतदान घेण्यासाठी उभा आहे. 4 केसेस झाल्या की, माणूस तडीपार होतो आणि हा 45 केसेस माझ्यावर आहेत म्हणत आहे. आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोडल्या, मी हे केलं, ते कलं. मराठा बांधवांना कळवायचे आहे की, हा समाजासाठी नाही, तर स्वत:ची पोळी भाजण्यासाठी प्रयत्न करतोय.
मंगेश साबळे काय म्हणाले?
काही गुन्ह्यांमध्ये म्हणजे एका केसमध्ये 6-6 केसेस असतात. एफआयआरमध्ये त्या पद्धतीने लिहिलेलं असतं. त्याचा आधी अभ्यास करा. लोकशाही आहे, उभा राहिलो आहे. मी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन केलं आहे. मी पुन्हा एकदा आव्हान करतो की, कोणीही पाटलांचे नाव वापरू नये. दादांचा फोटो वापरू नये. आपण समाजाच्या नावावर कोणालाही मतदान मागणार नाही आहोत. आपल्याला विकास आणि जनतेच्या शेतीमालाचा विषय आणि हमीभावाचा विषय,असे बरेच प्रश्न आहेत. समजाासाठी मी जातीवंत मराठा आहे, असं मंगेश साबळे यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या