Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस; विविध लक्षवेधी सूचना सभागृहात मांडल्या जाणार

Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून, पुरवणी मागण्यांवरील चर्चा अपेक्षित आहेत.

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 11 Dec 2025 06:47 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस (Maharashtra Winter Session 2025) असून, पुरवणी मागण्यांवरील चर्चा अपेक्षित आहेत. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर आरोप होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान...More

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आणि रणनीतीचा नवा पॅटर्न आणला जाणार 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आणि रणनीतीचा नवा पॅटर्न आणला जाणार 


नगर परिषद निवडणुकीत अनेक भागांमध्ये भाजप आमदार, खासदार आणि बाहेरील प्रभारींनी उमेदावारापासून ते रणनीती निश्चितीपर्यंत मनमानी केल्याचं समोर 


त्यामुळे नव्या रणनीतीनं महापालिका निवडणुका सामोरे जाण्यासंदर्भात खलबतं


विश्वसनीय सूत्रांची माहिती 


भाजपच्या दृष्टीने १०० टक्के निवडून येण्याची खात्री असलेल्या प्रभागात तरुण एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार, आयात उमेदवार लादल्या जाणार नाही 


विजयाचा विश्वास आहे पण खात्री नाही अशात प्रभागांमध्ये पक्षांबरोबरच अन्य पक्षांतील व्यक्ती किंवा मोठी सामाजिक प्रतिष्ठा असलेल्यांचा विचार होणार 


युतीचा विषय बंद नाही, अशात मित्रपक्षाच्या नेत्याने आपल्याविरोधात बोलल्यास प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना 


विदर्भातील महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी नागपुरात बैठक 


सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी ३ तास विदर्भ कार्यालयात मॅरेथाॅन बैठक 


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, संजय कुटेंसोबतच काही प्रमुख नेत्यांची देखील उपस्थिती 


ट्रिपल इंजिन सरकार आणा, घरोघरी जात संपर्क वाढवा, बूथ सभा, छोट्या सभांना प्राधान्य देत निवडणूक चिन्हकेंद्रीत करण्याच्या देखील बैठकीत सूचना

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.