Maharashtra Winter Session Nagpur 2025: हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Maharashtra Winter Session Nagpur 2025: आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे.

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 08 Dec 2025 06:11 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Winter Session Nagpur 2025: आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Winter Session) सुरुवात होत आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये...More

निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा आणखी एक कारनामा समोर येण्याची शक्यता

पुणे : मुंढवा जमीन घोटाळ्यातील आरोपी आणि निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा पुन्हा एक कारनामा समोर येण्याची शक्यता आहे. सूर्यकांत येवले यांने कुटुंबियांची पतसंस्थेची थकबाकी ८५ लाख ५० हजारांची रोख रक्कम भरल्याचा दावा RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. मुंढवा प्रकरण सुरू असतानाच ही रक्कम भरली गेल्याचही त्यांचं म्हणणं आहे. येवले यांच्याकडे एवढी रक्कम आली कुठून आणि भ्रष्टाचार आणि मनी लॉन्डरिंगचा प्रकार असल्याचंही दिसून येत आहे. या सगळ्या प्रकरणाची ED कडून चौकशी करावी, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. त्यांनी ट्विटकरुन हा दावा केला आहे. सोबत कागदपत्रदेखील पुरावा म्हणू जोडले आहेत.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.