Maharashtra Winter Session Nagpur 2025: एफडीएच्या कामावर सत्ताधारी भाजपचेच आमदार नाराज, विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएचे टोचले कान
Maharashtra Winter Session 2025: विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार २९३ च्या प्रस्तावावर भाषण करत आहेत. आज सरकारकडून या भाषणांवर प्रतिउत्तर दिला जाणार असून आरोप-प्रत्यारोपाची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Winter Session Nagpur 2025: नागपुरमध्ये सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस (Maharashtra Winter Session Nagpur 2025) आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार २९३ च्या प्रस्तावावर भाषण करत...More
नांदेड: प्रहार संघटनेतर्फे आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या निधीतून दिव्यांगांना निधी देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर चार मागण्यांसाठी ही धरणे आंदोलन करण्यात आले. आजचे आंदोलन हे केवळ धरणे आंदोलन आहे. पण, आमच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
एफडीएच्या कामावर सत्ताधारी भाजपचेच आमदार नाराज
भर सभागृहात आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएचे टोचले कान
एफडीएच्या थातूरमातूर कारवाईचे काढले वाभाडे
कफ सिरफमुळे झालेल्या २५ बालकांच्या मृत्यू कडे वेधले लक्ष
अजित पवारांनी २०० कोटींची घोषणा करून दिले फक्त ३० कोटी
शासन गंभीर नसल्याची सुधीर मुनगंटीवार यांची टीका
शब्द देऊन पैसे देत नाहीत - मुनगंटीवार
बिंदू नामावली मध्ये सुधारणेच्या दृष्टीकोनातून एकही पाऊल नाही
फक्त ९० अधिकाऱ्यांच्या नावावर सुरु आहे कारभार
नवीन अधिकारी प्रशिक्षण घेऊन ही नियुक्तीच्या प्रतिक्षेत
मंत्री नरहरी झिरवळ यांनीच दिली एफडीएच्या ढिसाळ नियोजनाची कबुली
गोसीखुर्द प्रकल्पाला मोठा काळ लोटला असला तरी प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, पुनर्वसनाचं दिलेलं आश्वासन हवेत विरलं आहे. ऑक्टोबर महिन्यात तीव्र आंदोलनादरम्यान पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेणाऱ्या शेकडो प्रकल्पग्रस्तांचे आता हाल सुरू झाले आहेत. पालकमंत्र्यांनी मुंबईत मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांशी बैठक लावून देण्याचा दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करीत सरकारकडून भ्रमनिरास झालेल्या या प्रकल्पग्रस्तांनी आज जलसमाधी आंदोलनाचा गंभीर इशारा दिला आहे. वैनगंगा नदीच्या कारधा तिरावर या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केलं आहे. जलआंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत तातडीनं बैठक लावावी, आणि दुपारी 3 वाजेपर्यंत यावर तोडगा काढावा, अशी मागणी आहे. प्रशासन आता काय तोडगा काढतंय, याकडं आता प्रकल्पग्रस्तांच्या नजरा लागल्या आहेत.
नांदेडमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजीपाला विक्रेत्यांनी मोर्चा काढत मनपाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवलाय. शुक्रवारचा आठवडी बाजार इंदिरा गांधी मैदानातच भरवावा यासाठी मनपा आग्रही आहे. त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्या विरोधात मनपाकडून दंडात्मक कारवाई होतेय. या कारवाईच्या निषेधार्थ भाजीपाला विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भाजीपाला विक्रेत्यांना पुरेसी जागा द्यावी अशी मागणी या आंदोलन कर्त्यांनी केलय.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आज जयंतीदिनी संपूर्ण मुंडे परिवार गोपीनाथ घडतील त्यांच्या समाधी स्थळी नतमस्तक झाला. यावेळी आमदार धनंजय मुंडे देखील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्याचे दिसून आले .नस्तमस्तक होताच आमदार धनंजय मुंडे भाऊक झाल्याच दिसून आलं आहे. समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पानावलेले डोळे पुसल्याचं दिसून आलं.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील इंदेगांव ते विहामांडवा पाटावरील पूल अचानक कोसळला आहे. पुलावरून ऊसाचा ट्रॅकटर जात असतानाच पूल मधोमध अचानक कोसळला. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळूवाहतूक या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाढली होती, नागरिकांनी सांगून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पूल कोसळला असल्याचा आरोप गावकरी करत आहे.
कालची मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस तब्बल ६ तास उशिराने
रात्री १२ वाजता सीएसएमटी स्थानकात येणारी गाडी आज सकाळी ६.१३ वाजता पोचली
कोकण रेल्वे मार्गात २ वेळा इंजिनात बिघाड आणि एका ठिकाणी सिग्नल मध्ये बिघाड झाल्याने आधीच उशिराने धावत असलेली गाडी कळंबोली येथील मध्य रेल्वेच्या पुर्वनियोजित ब्लॉक मध्ये अडकली
हा ब्लॉक देखील वेळेपेक्षा जास्त कालावधीने संपला त्यामुळे गाडीला अजून उशीर झाला
अखेर ही गाडी आज सकाळी ६ वाजता सीएसएमटी स्थानकात पोचली
त्यामुळे कोकणातून मुंबईत येणारे प्रवासी रात्रभर गाडीतच ताटकळत बसले होते
आदिवासी म्हणून पुन्हा आरक्षण बहाल व्हावे या मागणीसाठी काल नागपुरात दाखल झालेला गोंड गोवारी समाजाचा मोर्चा गेले 24 तास नागपुरात ठाण मांडून बसला आहे.. राज्याचे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले गोंड गोवारी बांधव शेकडोंच्या संख्येने टेकडी रोड वरील स्टॉपिंग पॉईंटजवळ ठाण मांडून बसले आहे.. काल हा मोर्चा नागपूरच्या टेकडी रोडवर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोर्चातील शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली होती.. मात्र मुख्यमंत्र्यांनी वडणे समिती अहवालाचा अभ्यास करून कारवाई करण्यासाठी पुन्हा एक महिन्याचा वेळ मागितल्यामुळे मोर्चेकरी नाराज झाले असून ते नागपूर सोडायला तयार नाही..
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून शोककळा पसरली आहे. लातूर येथील त्यांचे निवासस्थान देवघर येथे अंतदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आला आहे.
त्यांच्या पार्थिव देहाचे आज श्रद्धांजली दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा भाजप नेते बसवराज पाटील मुरूमकर, तसेच माजी मंत्री व भाजप नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतले.
अंत्यविधी उद्या (१३ डिसेंबर) सकाळी ११ वाजता लातूर शहराजवळील वरवंटी शिवारातील त्यांच्या शेतात पार पाडला जाणार असल्याची माहिती माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी दिली.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मोठे योगदान मागे ठेवून शिवराज पाटील चाकूरकर यांची जीवनयात्रा संपली. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरांमध्ये महानगरपालिका मंगल कार्यालयाजवळ अंडा भुर्जीची गाडी ला अचानक आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला, अंडा भुर्जी च्या गाडीवर गर्दी असताना ग्राहकांची ऑर्डर करत असताना अचानक पणे गॅसने भडका घेतला व गाडीला मोठी आग लागली या आगीमध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाल्याने ,गाडी मालकाचे मोठे नुकसान होऊन त्याचा उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे ,अचानक गॅसला भडका झाल्याने भडक्याचा रूपांतर आगीत झालं आणि काही वेळातच गाडी जळून खात झाली, मात्र सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही
शिवराज पाटील यांच्या निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपलाः खा. अशोकराव चव्हाण
लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, देशाचे एक व्यासंगी व कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राष्ट्रीय राजकारणात ते महाराष्ट्राचा एक चेहरा होते. त्यांनी आयुष्यभर सार्वजनिक प्रश्नांना अग्रक्रम दिला आणि देशसेवा केली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी अनेक दूरदर्शी धोरणे अवलंबली. त्या धोरणांचा प्रभाव व सकारात्मक परिणाम आजही दिसून येतो. राजकारण, समाजकारण व प्रशासनात त्यांनी दिलेले योगदान चिरंतर राहिल.
Pune : पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट ने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ६ डिसेंबर रोजी पुणे विमानतळावर करण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेस आय एक्स २४१ या विमानाने एक महिला प्रवासी बँकॉकवरुन पुणे विमानतळावर पोहचली. एअर इंटेलिजन्स युनिट च्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला चौकशीसाठी अडवले आणि तिच्या बॅग ची तपासणी करायला सुरुवात केली. यावेळी त्यातील २ चिप्स च्या डब्यात या महिलेने लपवलेला गांजा मिळून आला. त्याचे वजन केले असता ते ७२२ ग्रॅम इतके मिळून आले ज्याची बाजार भावानुसार ७२.२ लाख रुपये किंमत आहे संबंधित महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गेल्या आठवड्यात तेलंगानाहून जळगाव कडे लग्न समारंभासाठी निघालेलं पाटील दांपत्य हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजी नजीक रहस्यमय रित्या बेपत्ता झालं होतं. जवळपास 36 तासांच्या शोध मोहिमेनंतर पाटील दांपत्याची कार राष्ट्रीय महामार्ग लगत असलेले एका 90 फूट खोल विहिरीत सापडली होती. यात या दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना आता पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं असून यात पाटील दांपत्याची कार येत असलेल्या बाजूनेच चुकीच्या व विरुद्ध दिशेने एक कार येत आहे व या कारने पाटील दांपत्याच्या कारला कट मारला. यावेळी कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्या लागत असलेल्या विहिरीत कोसळली. समोरून चुकीच्या व विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारचालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याच पोलिसांनी आता स्पष्ट केलं असून पाटील दांपत्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या या अज्ञात कार चालकाविरुद्ध पोलिसांनी काल कलम 281, 106 BNS / 119 व 134 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नांदुरा पोलीस आता या अज्ञात कार चालकाचा शोध घेत आहेत. मात्र मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज नुसार अज्ञात कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे व चुकीच्या आणि विरुद्ध दिशेने कार चालवण्याच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याच निष्पन्न झाला आहे.
जळगाव : जळगावच्या भडगाव तालुक्यातील कोठली गावालगतच्या गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून गौण खनिज माफियांनी आतापर्यंत हजारो ब्रास वाळू उपसल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांच्या साहाय्याने थेट नदीपात्रात उत्खनन केले जात असल्याने नदीच्या विस्तीर्ण पात्रात खोल भगदाड निर्माण झाली आहेत. या अवैध उत्खननामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वाळू माफियांच्या धाकाला कंटाळले आहेत. महसूल प्रशासनाने या माफियांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील स्मशान भूमी तीन दिवसांपूर्वी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावरील सुमारे दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह अस्थि व राख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.
पुणे: एप्रिल महिन्यापासून पासून पुणे विमानतळ परिसरात अधूनमधून दिसणारा एक प्रौढ नर बिबट्या पुणे वनविभागाच्या नेतृत्वाखाली, RESQ Charitable Trust, Indian Air Force आणि Pune Airport Authorities यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे सुरक्षितरीत्या बेशुद्ध करून पकडण्यात आला
या बिबट्याने विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांचा वापर करून आत-बाहेर हालचाल चालू ठेवली होती
विमानतळाचा विस्तृत आणि संवेदनशील परिसर लक्षात घेता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नांना अनेक गंभीर तांत्रिक आणि सुरक्षा विषयक अडचणींचा सामना करावा लागला
कॅमेरा ट्रॅप, live कॅमेरे आणि पिंजरे यांद्वारे सातत्याने निरीक्षण ठेवण्यात आले होते
बिबट्याचे सर्व संभाव्य बाहेर पडण्याचे मार्ग बंद व मजबूत करण्यात आले, अतिरिक्त live निरीक्षण करणारे कॅमेरे बसवण्यात आले आणि बोगद्याच्या आतील हालचाली अधिक अचूकपणे समजण्यासाठी कॅमेरा ट्रॅपचे पुनर्स्थापन करण्यात आले
११ डिसेंबर रोजी सुमारे ३० सदस्यांच्या संयुक्त पथकाने बिबट्याला अंदाजे 80 फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची मोहीम आखली, जेणेकरून नियंत्रित परिस्थितीत बेशुद्ध करण्यात आले
काही दिवसांपूर्वी पुण्यात एका भरधाव चारचाकी वाहनाचे सनरूफ उघडून २ तरुणांनी स्टंट केले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गेल्या आठवड्यात झालेला हा व्हिडिओ पुण्याच्या खडकी भागातील असल्याचं समोर आल्यावर पोलिसांनी या तरुणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर या तरुणांना पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना समज दिली. या तरुणांनी सुद्धा हाथ जोडून ही गोष्ट कबूल केली आणि माफी मागितली.
राज्यात हुडहुडी वाढली, अहिल्यानगर 6.6अंशांवर
सलग तिसऱ्या दिवशी अहिल्यानगर मध्ये राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद
राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पारा घसरला
उत्तर भारतातून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट
राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा ७ ते १० अंशांपर्यंत
अहिल्यानगर मध्ये ६.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)
अहिल्यानगर: ६.६
पुणे: ७.९
जळगाव: ७.०
कोल्हापूर: १४.४
महाबळेश्वर: ११.१
मालेगाव: ८.८
नाशिक: ८.२
सांगली: १२.३
सातारा: १०.०
सोलापूर: १३.२
छत्रपती संभाजीनगर: १०.८
परभणी: १०.४
अकोला: १०.०
अमरावती: १०.२
बुलढाणा: १२.२
गोंदिया: ८.०
नागपूर: ८.१
वर्धा: ९.९
यवतमाळ: १०
आमगाव पोलीस रात्री पेट्रोलिंग वर असताना एक चारचाकी बोलेरो वाहन संसयास्पद आढळले त्याला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना पाहताच ड्रायव्हरने भरधाव वेगाने वाहन चालवत नेले. त्याचा पाठलाग पोलिसांनी करून रिसामा अंडर रेल्वे जवळ ड्रायव्हर गाडी सोडून पसार झाला त्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध कत्तल करण्यासाठी 12 गोवंंस घेऊन जात असल्याचे आढळले. या 12 गोवंश जनावरांची सुटका केली आहे. ज्यांची अंदाजित किंमत 1 लाख 20 हजार रुपये असून 7 लाख रुपये किमतीची बोलेरो चार चाकी वाहन असा 8 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
रायगड मधील पोलिस मुख्यालयाच्या लेखा शाखेत शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा प्रकार समोर आलाय.आरोपी राजेश राम जाधव, आणि त्यांची पत्नी रिया राजेश जाधव यांनी पोलिस पाटलांचा मिळणारा पगार (मानधन)हा कोषागारातून मंजूर करून घेत त्यामध्ये न कामावर हजर नसलेल्या पोलिस पाटलांची देखील खोटी नावे तयार करून त्यांच्या नावाचा देखील पगार काढून, कोट्यवधी रुपयांचा बिल दाखवत कोट्यवधी रुपयांची रक्कम तयार केली. हा सर्व प्रकार फिर्यादीने उघडकीस आणल्यानंतर ही बाब समोर आलीय. सन 2021 पासून हा प्रकार सुरू असून यामध्ये मुख्य आरोपी यांच्या पत्नी रिया राजेश जाधव यांचा देखील समावेश असल्याची बाब उघडकीस येते. आता या प्रकरणी या दोघांवरही अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक किशोर साले या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
- नाशिकच्या निफाडमध्ये पारा 6.1 अंशावर तर, नाशिकमध्ये देखील तापमान 8 अंशापर्यंत घसरल्याने थंडीत मोठी वाढ
- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानात होत आहे घट...
- पुढचे दोन-तीन दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता...
- थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा करत आहेत वापर...
केंद्र व राज्य सरकारचा तंत्रशिक्षण आणी कौशल्य विकासावर विशेष भर आहे आणि त्याचमुळे की काय राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना संतांची किंवा महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र याच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालये प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांविना ओस पडत असल्याचे चित्र आहे आणि त्यामुळे तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण न होताच त्यांना संस्था सोडाव्या लागत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील 13 औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 5 तांत्रिक विद्यालयांचा कारभार फक्त तीन प्राचार्य सांभाळत असून जवळपास सर्वच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 50 टक्के तांत्रिक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत आणि यामुळे मात्र तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होतानाच चित्र आहे.
यवतमाळ येथून देवदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा समृद्धीमहामार्गावर वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज गावाजवळ धरधाव पिकअप मालवाहू वाहनाने अचानकपणे ब्रेक केल्याने मागून येणाऱ्या भरधाव कार अनियंत्रित होऊन मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली याघटनेत दोन जण जागीच ठार झाले तर... दोन जण गँभिर जखमी झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती निकाली करण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली आहे ही मुदत यादी 10 डिसेंबर पर्यंत होती. नाशिक महापालिकेकडे 9000 हरकती प्राप्त झाल्यामुळे या सर्व हरकतींवर कार्यवाही करण्यात येत आहे. दुबार नाव असल्यांना महापालिकेकडून नोटीसा बजावण्यात येत आहेत. हरकतीनमध्ये प्रभागात नाव नसणे, चुकीचे पत्ते, नाव गहाळ आणि मयत नावे,दुबार नाव अशा अनेक हरकती प्राप्त झालेल्या होत्या या सर्वांना महापालिकेकडून नोटीस देऊन नव्याने सुधारित अंतिम मतदार यादी तयार करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महापालिकेचे प्राधिकृत अधिकारी यांनी दिली आहे.
- नाशिकमध्ये वाढत्या थंडीमुळे महानगरपालिकेच्या सकाळ सत्राच्या शाळा भरणार आठ वाजता...
- चार दिवसांपासून शहराचे तापमान ८ ते ८.५ अंशांवर, थंडीमुळे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला निर्णय...
- खाजगी शाळा व्यवस्थापनावर सक्ती नाही, खाजगी शाळेचे निर्णय संबंधित खाजगी शाळा व्यवस्थापनाला घेण्याची मुभा...
- नाशिकमध्ये वाढत्या थंडीमुळे सकाळी सात वाजताची शाळा भरणार आठ वाजता, लहान मुलांच्या आरोग्यासाठी मनपा प्रशासनाने घेतला निर्णय...
- पालकांच्या मागणीनंतर मनपा प्रशासनाने सकाळी सातची वेळ आठ वाजता केल्याची माहिती...
- थंडीमुळे मनपाच्या शाळा उशीर भरवण्याचा घेतला निर्णय, मात्र खाजगी शाळांना स्वतंत्र निर्णय घेण्याची दिली मुभा...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Winter Session Nagpur 2025: एफडीएच्या कामावर सत्ताधारी भाजपचेच आमदार नाराज, विक्रमसिंह पाचपुतेंनी एफडीएचे टोचले कान