Maharashtra Winter Session 2024 नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. विधानसभेच्या निकालानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी नेमका कधी पार पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सरकारस्थापनेच्या आधीच हिवाळी अधिवेशनाच्या तारखा समोर आल्या आहेत. येत्या 16 डिसेंबर ते 24 डिसेंबरमध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांसाठी डिजिटल आसनव्यवस्था असणार आहे. यासह अधिकवेशनाच्या अनुषंगाने युद्धपातळीवर काम सुरु झालं आहे.


दरम्यान, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. हे अपयश एवढे आहे की यातील एकाही घटक पक्षाला 29 चा आकडा गाठता आला नाही. त्याचमुळे विरोधी पक्षनेता हे पदही मिळणार नाही. नागपुरात डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होईल. मात्र, रविभवन परिसरातील 22 व 23 नंबरच्याया कॉटेजमध्ये आता राहणार कोण, हा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.


विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार?


हिवाळी अधिवेशनाच्या तारखा समोर आल्याने त्या अनुषंगाने नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारीला वेग आला आहे. दरम्यान, अधिवेशनात विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार? हा प्रश्न या निमित्याने आता विचारला जाऊ लागला आहे. नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधीपक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याचे सजावटीचे काम सुरू आहे. मात्र आवश्यक असलेले संख्याबळ विरोधी पक्षाकडे नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बंगल्याच्या सजावटीचे काम सुरू आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांसाठी आरक्षित असलेला बंगला कोणाला मिळणार याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  


कधी होणार हिवाळी अधिवेशन?


राज्यातील नवनिर्वाचित २८८ आमदारांचं सरकार स्थापन झाल्यानंतर १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. पण अद्याप सरकार स्थापन न झाल्याने २८८ आमदारांना एकत्र बोलवत सत्ता स्थापनेचं एक अधिवेशन मुंबईला होणार आहे. यासाठी २८८ पैकी ७८ हे पहिल्यांदा विधानसभेत पोहचले आहे. त्यात भाजपचे ३३, शिंदे गट शिवसेना १४, अजित पवार गट राष्ट्रवादी ८, ठाकरे शिवसेना १०, कांग्रेस ६, शरद पवार गट राष्ट्रवादी ४ व इतर ३ आमदारांचा समावेश आहे.