Praful Patel : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) उमेदवारीवरून महायुतीमध्ये मोठं वादंग पाहायला मिळत आहे. भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार देखील दिला आहे. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विचारले असता पटेल यांनी सांगितले की, नवाब मलिक आमचे सहकारी आहेत. आमदार मंत्री सर्व पदावर ते राहिले आहेत. तसेच त्यांनी कुठलाही गुन्हा केला आहे असं कोर्टात सिद्ध झालेला नाही. आम्ही त्यांना तिकीट दिली आहे. भाजप व शिवसेनेला त्यांची मदत करायची नसेल किंवा दुसरा उमेदवार द्यायचे असेल तर ती त्यांची इच्छा असल्याचे पटेल म्हणाले.
दरम्यान, येथील जागेमुळं महायुतीच्या इतर दुसऱ्या जागांवर परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत अशी सावध भूमिका देखील यावेळी प्रफुल पटेलांनी घेतली आहे. ते गोंदिया येथे माध्यमांशी बोलत होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माजी मंत्री मंत्री नवाब मलिक माणखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अजित पवार यांनी तिकीट दिलं आहे. मात्र, महायुतीमधूनच नवाब मलिक यांना विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे भाजपने स्पष्ट केलं आहे. मात्र, दुसरीकडे सना मलिक यांना अनुशक्तीनगरमध्ये पाठिंबा देण्यात आला आहे.
दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीचा प्रचार करणार नाही, भाजपची भूमिका
भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही' असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही', असे आशिष शेलार म्हणाले. दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गटान नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुलं मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय.
महत्वाच्या बातम्या:
Nawab Malik : काही लोक सांगतात शिंदे आणि पवार साहेबांचं काहीतरी सुरुय, निकालानंतर कोण कोणासोबत जाईल काही सांगता येत नाही : नवाब मलिक