Uttamrao jankar on Babandada Shinde : सहा सहा वेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व , असं म्हणत उत्तमराव जनाकर (Uttamrao jankar) यांनी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर टीका केली. शरद पवार ज्यावेळी संकटात होते. अजितदादा ज्यावेळी फुटले त्यावेळी शरद पवार यांना अभिजीत पाटील यांनी आधार दिला असल्याचे जानकर म्हणाले. मी तर विमानातून उडी ठोकली. तुम्हाला फक्त दोरीवरुन उडी टाकायची होती असा टोलाही जानकर यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लगावला.
तुमची वेडी पोरं आमदार करायला आम्ही तयार नाही
येत्या 23 तारखेला आपण अभिजीत पाटील यांचा गुलाल उधणार आहोत असेही उत्तमराव जानकर म्हणाले. मोहिते पाटील आणि आम्ही आता एकत्र आहोत. त्यामुळं माळशिरसचा आकडा मी तुम्हाला लवकरच सांगतो असेही उत्तमराव जानकर म्हणाले. अभिजीत पाटील यांचा गुलाल पडणार असल्याचे उत्तमराव जानकर म्हणाले. मोहिते पाटील आणि आम्ही जावकर एकत्र आहोत. त्यामुळं माळशिरसचा आकडा मी तुम्हाला लवकरच सांगतो असे उत्तमराव जानकर म्हणाले. तुमची वेडी पोरं आमदार करायला आम्ही तयार नाहीत असा टोला देखील उत्तमराव जानकर यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लगावला. आम्हाला कर्तबगार सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार करायचा असल्याचे जानकर म्हणाले. पवारसाहेबांची मोठी ताकद आहे. लोकसभेला ठरवलं मागे पुढं सरु पण पवारसाहेबांसाठी लढू हे आम्ही ठरवल्याचे उत्तमराव जानकर म्हणाले. बाळादादांचे ठरले म्हणजे ठरल्याचे जानकर म्हणाले. तुम्ही केलेलं प्रत्येक मतदान हे पवारसाहेबांना जाणार आहे.
अभिजीत पाटील यांना पवारसाहेबांनी का तिकीट दिलं?
अभिजीत पाटील यांना पवारसाहेबांनी का तिकीट दिलं? मोहिते पाटील यांनी त्यांना का पाठिंबा दिला? कारण अभिजीत पाटील यांच्यामध्ये कुवत असल्याचे जानकर म्हणाले. मी देखील शिंदेंसोबत 10 वर्ष होतो. त्यांना आम्ही जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. पण ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनाचं पहिल्यांदा ते विसरतात असे म्हणत जानकरांनी शिंदे बुंधवर टीका केली. म्हणून मी लोकसभेला त्यांना पाडलं. त्यावेळी आम्ही आणि मोहिते पाटील एकत्र आलो. झालेली चूक मोहिते पाटील कुटुंबाने स्वीकारली. भविष्यात मी अभिजीत पाटील तुमच्यासाठी लढाई करेल असे जानकर म्हणाले. या मतदारसंघात रस्ते नाही पाणी नाही मग तुम्ही 30 वर्ष काय केलं? असा सवाल जानकारांनी केला.