Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपरिषद निवडणुकीत कोणाची बाजी? मतमोजणी LIVE
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: महाराष्ट्रभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालीय. कोणाची सरशी? कोणाचा पराभव? फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा (Municipal Councils), नगरपंचायतींच्या निवडणुकीची (Nagar Panchayat Election Result 2025) मतमोजणी आज पार पडतेय. राज्यभरात ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात...More
Parali Beed Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला परळीत मोठा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांचा पराभव
दीपक देशमुख यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवली होती. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे व्यंकटेश शिंदे हे विजयी झाले आहेत.
Beed Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: बीड ब्रेकिंग : बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांची रणनिती यशस्वी ठरली
बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, धारूर मध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीवर
पंकजा मुंडे यांनी नव्या, जुन्यांना एकत्र करून निवडणूक आखली होती
पालकमंत्री अजित पवार यांना धक्का
Hingoli Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: कळमनुरी नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी 1300 मतांनी विजयी झाल्या आहेत. कळमनुरी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला.
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: राज्यात कोणत्या नेत्याला धक्का? कुणी गड राखला?
- आमदार प्रशांत बंब यांना गंगापूर मधून मोठा धक्का, आमदार सतीश चव्हाण यांनी मारली बाजी
- फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का आमदार अनुराधाताई चव्हाण, मंत्री अतुल सावे यांना धक्का ठाकरे गटाचे उमेदवार विजयी
- खुलताबादमध्येही काँग्रेसने खाते उघडले, त्यामुळे स्थानिक आमदार प्रशांत बंब यांना धक्का, मुख्यमंत्र्यांची खुलताबादमध्ये झाली होती सभा
Mukhed Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: मुखेड ब्रेकिंग : एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिलं यश
Sindhudurg Vengurla Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: सिंधुदुर्ग: दीपक केसरकर यांना वेंगुर्ल्यातही धक्का, विजय आठ नगरसेवकांपैकी अवघी एक जागा शिंदे सेनेच्या वाट्याला, वेंगुर्ल्यात आघाडीवर असलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील भाजपचा...
वेंगुर्ले विजयी नगरसेवक
लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना
रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप
गौरी माईनकर, भाजप
प्रीतम सावंत, भाजप
विनायक गवंडकर, भाजप
गौरी मराठे, भाजप
आकांक्षा परब, भाजप
तातोबा पालयेकर, भाजप
Jejuri Municipal Council Vote Counting LIVE: जेजुरी नगरपरिषद मतमोजणी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी आघाडीच्या दिशेने
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी आघाडीच्या दिशेने
भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी...
तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी...
Nandgaon Nashik Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नाशकातील नांदगावमध्ये कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?
- आ.सुहास कांदे यांनी नांदगावचा गड राखला..
- शिवसेना ( शिंदे गट ) सागर हिरे विजयी..
- शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी..
- भाजपला एक जागा राखता आली नाही...
- राष्ट्रवादीचा धुव्वा, ' भुज ' बळ कमी पडले..
Kolhapur Shirol Elections LIVE: आमदार अशोकराव माने यांच्या मुलगा सुनेचा होमपीचवर दारुण पराभव. शिरोळातील मतदारांना भाजप ताराराणी आघाडीला नाकारले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका अरविंद माने पराभूत, नगरसेवक पदाच्या अरविंद अशोकराव माने पराभूत झाले आहेत.
Ausa Municipal Council Election Result 2025 LIVE: औसा नगरपरिषदेचं चित्र स्पष्ट झालं असून औसा इथे जल्लोष सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली असून एक नगराध्यक्ष आणि 17 जागांवर विजय मिळवला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा
- 23 जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय
- 6 जागेवर भाजप विजय
- काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, गेल्या वेळेस दोन वरून, यंदा शून्यावर काँग्रेस
- नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजय
Palghar Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: पालघर : राज्यात भाजपनं प्रतिष्ठेची केलेल्या डहाणू नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप पिछाडीवर . शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आघाडीवर. 2700 मतांनी माच्छी आघाडीवर तर भाजपचे भरत राजपूत पिछाडीवर . डहाणू नगरपरिषदेत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट सरळ लढत. शिंदे गटाला सर्वपक्षीय पाठिंबा. डहाणू नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी 2700 मतांनी आघाडीवर आहे.
Ratnagiri Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: रत्नागिरी : देवरुख नगरपंचायत 9 पैकी 7 नगरसेवक महायुतीचे तर एक भाजपचा अपक्ष बंडखोर विजयी
Shirdi Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: शिर्डी नगरपालिका : शिर्डी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार जयश्री थोरात आघाडीवर
Murgud Municipal Council Election Result 2025 LIVE: मुदखेड नगरपरिषद निवडणूक दुसऱ्या फेरीची मते भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विश्रांती ताई माधव पाटील कदम यांना 1699 तर काँग्रेसच्या उमेदवार सौशिलाताई राजबहादुर कोत्तावार यांना 1O12 मते मिळाली असून दुसऱ्या फेरीमध्ये 687 मते भाजप उमेदवाराला जास्तीचे असून दुसऱ्या फेरी अखेर 596 मते घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विश्रांती ताई माधव पाटील कदम यापुढे आहेत.
Nashik Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नाशिक जिल्हा/ नगर परिषद निकाल लाईव्ह
- भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
- पिंपळगाव बसवंत - भाजपचे डॉ. मनोज बर्डे आघाडीवर
- सिन्नर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले आघाडीवर
- ओझर - भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर
- त्र्यंबकेश्वर - भाजपचे कैलास घुले आघाडीवर
- इगतपुरी - शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर
Murgud Municipal Council Election Result 2025: मुरगुड नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा, शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी, तर सेनेच्या नगराध्यक्ष पदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर मिळाला विजय, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांना मुरगुडमध्ये धक्क
Manchar Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: मंचर नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदाच्या चुरशीत कोण पुढे?
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
- राजश्री गांजाळे (शिंदेशिवसेना) - 1612
- प्राची थोरात (अपक्ष) - 1563
- मोनिका भालेराव (Apराष्ट्रवादी) - 1494
शिंदे शिवसेनेच्या राजश्री दत्तात्रय गांजाळे पहिल्या फेरी अखेर 49 मतांनी आघाडीवर
Parbhani Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: परभणी जिल्ह्यात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?
- जिंतूर मध्ये भाजप आघाडीवर
- सेलूत कांग्रेस आघाडीवर
- सोनपेठ शहर परिवर्तन विकास आघाडी आघाडीवर
- मानवत अजित पवार राष्ट्रवादी
- गंगाखेड अजित पवार राष्ट्रवादी आघाडीवर
- पाथरी काँग्रेस आघाडीवर
- पूर्णा काँग्रेस आघाडीवर
Shirur Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: शिरूर नगरपरिषद : शिरूर नगरपरिषद मध्ये सुरुवातीपासूनच भाजप न आघाडीवर आहे. थेट लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी आहे.
Kolhapur Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: कोल्हापुरात भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी, चंदगड नगरपंचायतीमध्ये सुनील कावनेकर यांचा विजय झाला आहे. सुनील कावनेकरांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रचारासाठी आले होते.
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: राज्यात कोण कुठे पुढे, कोण मागे? फक्त एका क्लिकवर...
- रायगड...महाड नगरपालिकेतून राष्ट्रवादीचे सुदेश कलमकर आघाडीवर सुदेश कलमकर यांना 318 तर शिंदे गटाचे सुनील कविस्कर यांना 267 मत
- जेजुरी नगरपरिषद निवडणूक, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जयदीप बारभाई आघाडीवर
- नवापूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव आघाडीवर
- नांदगावमध्ये पहिल्या फेरी अखेर शिवसेना ( शिंदे गट ) आघाडीवर.. पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे सागर हिरे यांना मिळाले 3436 मते, राष्ट्रवादी (अजित पवार ) उमेदवार राजेश बनकर यांना मिळाले 1817 मत
Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: चंदगड नगरपंचायत : राजर्षी शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी
तर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार 3 विजयी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगरपंचायत साठी आले होते प्रचाराला
भाजप शिवसेनेला चंदगड मध्ये सहा ठिकाणी धक्का
Bhagur Municipal Council Election 2025 LIVE: मतमोजणीला सुरुवात होताच अजितदादांच्या राष्ट्रवादीनं खातं खोललं. भगूरमध्ये 7 उमेदवार विजयी झाले आहेत. अजित दादांनी भगूरमध्ये शिवसेनेची गेली 25 वर्षांची सत्ता उलथवली आहे.
Mudkhed Municipal Council Election Result 2025 LIVE: मुदखेड नगरपरिषद निवडणूक पहिल्या फेरीची मते भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विश्रांती ताई माधव पाटील कदम यांना 1207 तर काँग्रेसच्या उमेदवार सौशिलाताई राजबहादुर कोत्तावार यांना 1298 मते मिळाली असून पहिल्या फेरीमध्ये 91 मताने काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीलाताई राजबहादुर कोत्तावार यापुढे आहेत.
Satara Mhaswad Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: म्हसवड, सातारा ब्रेकिंग: साताऱ्यातील म्हसवड प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठान पणाला लागली होती. अशातच मंत्री जयकुमार गोरे यांच्या भाजपचे खाते खोललं आहे.
विजयी उमेदवार
प्रभाग 1)सुशांत कांबळे (भाजप)
प्रभाग 2) सुनिता तांबे (भाजप)
प्रभाग 3) पुष्पा मुकणे (भाजप)
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: सिन्नरमध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर, तर कोल्हापुरात शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. मालवणमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर, बारामतीत अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तसेच, कणकवली - शहर विकास आघाडी आघाडीवर आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Nagar Panchayat Election 2025: छत्रपती संभाजीनगर नगराध्यक्ष निवडणूक निकाल
एकूण जागा : 7
- सिल्लोड : शिवसेनाचे समीर सत्तार आघाडीवर पोस्टल
- कन्नड : काँग्रेस चे शेख फरीन आघाडीवर
- पैठण : उबठा च्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
- गंगापूर : भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर
- खुलताबाद : भाजप परशराम बारगळ आघाडीवर
- वैजापूर : पोस्टल मतमोजणीत भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी आघाडीवर
- फुलंब्री ( पंचायत ) : भाजप सुहास शिरसाठ आघाडीवर
Kolhapur Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागलमध्ये पहिला कल हाती
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सविता माने आघाडीवर
चंदगड नगरपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर
भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कावनेकर आघाडीवर
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी सुरु होणार. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी होईल. पुढील चार-पाच तासांमध्ये निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता.
उरण नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर राडा.
नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक इसम स्ट्राँग रुमच्या दिशेने गेल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप
मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना इसम स्ट्राँग रुमकडे गेला कसा ?
महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भावना घाणेकर यांचा तहसीलदारांना सवाल
परळीत स्ट्राँग ऑफ उघडली जात आहे स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती देऊन
उमेदवारांनी त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर ही स्ट्राँग उघडली जात आहे
दोन स्ट्राँग रूम होत्या पहिल्या मतदानाची मुख्य स्ट्राँगरूम असणारे तर दुसरी जी आहे ती काल मतदान प्रक्रिया पार पडली ती असणार आहे
परळीत स्ट्राँगरूम बाबत झालेल्या वादानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रशासनाकडून प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जात आहे
- भगूर नगरपरिषदेच्या मतपेट्या स्ट्राँगरूमच्या बाहेर काढण्यास सुरुवात...
- अवघ्या काही वेळात मतमोजणीला होणार सुरुवात...
- भगूरची मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये राबवली जाणार...
- भगूर नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप, मवीआ अशी लढत...
- मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार...
- निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मतमोजणीची तयारी पूर्ण...
बीड ब्रेक: उमेदवार प्रतिनिधींसमोर बीड मध्ये स्ट्राँग रूम अनलॉक
बीड नगर परिषदेसाठी एक नगराध्यक्ष आणि 52 नगरसेवक पदासाठी होणार मत मोजणी
आधी टपाली मत मोजणी होणार
परळी येथील स्ट्राँग रूम ओपन केली जात आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल. पण त्याआधी स्ट्राँग रूम उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आहेत.
- पक्षाच्या नेत्यांना आम्ही बोलावले नाही आम्ही परिस्थिती सांभाळली लोकांचा प्रतिसाद सोबत असल्याने काही अडचण नाही
- मी निवडणुकीनंतर आढावा घेतला आमचा उमेदवार पाच ते दहा हजार मताने निवडून येईल असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला
- चित्र एकदम चांगले राहिले जास्तीत जास्त नगरसेवक सुद्धा निवडून देतील
- या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यासाठी सर्व पक्षांचे वरिष्ठ आले
- जे लोक इथे काम करतात त्याच अनुषंगाने लोक निवडून देतात
- पूर्णपणे विश्वास आहे पाच ते दहा हजार मताने आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येईल
- बीड नगर परिषदेत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवार स्मिता वाघमारे यांचे पारडे जड आहे
निकालापूर्वी जळगावच्या चाळीसगाव शहरात विजयाचे बॅनर झळकले
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर जळकले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून निकालापूर्वी विजयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे.
प्रतिभा चव्हाण यांची लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देणाऱ्या आशयाचे बॅनर झळकले आहे.
निकालापूर्वीच चाळीसगावात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिंगेला पोहोचला आहे.
अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद, 2 नगर पंचायतीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात
धामणगाव रेल्वे यातही तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीला होईल सुरुवात...
धामणगाव रेल्वे नगर पालिका मध्ये भाजप कडून आमदार प्रताप अडसड यांच्या सख्ख्या बहीण डॉ अर्चना रोठे आणि काँग्रेस कडून वर्षा देशमुख यांच्यात थेट लढत आहे...
6 टेबलावर 4 फेऱ्या होणार असून यात कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष..
नाशिक जिल्ह्यात येवला नगरपरिषद निवडणूक चर्चेत राहिली होती.. या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून तर दराडे बंधूंनी शिवसेना ( शिंदे गट ) कडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती..मंत्री भुजबळांच्या अनुपस्थितीत येवला नगरपरिषदेची निवडणूक सूत्र समीर भुजबळ व भुजबळ कुटुंबियांनी हातात घेतली होती...थोड्याच वेळात मतमोजणीला प्रारंभ होत आहे...येवला नगरपरिषदेसाठी १३ टेबलवर चार फेऱ्यांद्वारे मतमोजणी होणार आहे
तळकोकणात कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषद, वेंगुर्ले नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद मध्ये पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. काही वेळात मतमोजणी सुरू होणार असून निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण भाजपने जिल्ह्यात स्वबळाचा नारा देत निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मालवणमध्ये आमदार निलेश यांची प्रतिष्ठा पणाला लागली तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले मध्ये दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
धाराशिवमध्ये निकालापूर्वी भाजपकडून गुलालाची खरेदी
भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयात गुलालाच्या गोण्या ठेवण्यात आल्या
गणेश उत्सवाच्या काळात ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून वापरलेलं गाणं वापरत मल्हार पाटील फॅन क्लब पेजवरून गुलाल पोत्याचे व्हिडिओ पोस्ट
धाराशिव नगर परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आमने-सामने
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाही स्वतंत्र उमेदवार त्यामुळे तिरंगी लढत
धाराशिव नगरपरिषदेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
पालघर जिल्ह्यातील डहाणू जव्हार पालघर नगरपरिषद वाडा नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी पार पडत असून या मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. या नगरपरिषदांमध्ये डहाणू नगरपरिषद हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे मानले जाते कारण या ठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भारत राजपूत आणि शिवसेनेचे राजेंद्र माच्छी यांच्यात सरळ नगराध्यक्ष पदासाठी लढत होत असून या ठिकाणी दोन्ही नेत्यांची भाषणे मोठ्या प्रमाणात गाजली होती तर आरोप प्रत्यारोप हे झाले होते. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असून डहाणूच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष कोण होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेच्या हद्दीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवार आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सविता प्रताप माने यांच्या विजयाचे बॅनर सध्या झळकत आहेत. हे बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहेत
-नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळातच सुरुवात होणार....
- मतमोजणीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे....
- उमेदवारांच्या भव्तव्य मतपेटीत बंद झाले असल्याने अवघ्या काही वेळात मत पेट्या उघडल्या जाणार....
- सुरुवातीला टपाली मतदान उघडला जाणार आहे तर त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार....
- उमेदवार प्रतिनिधींची कसून चौकशी केल्यानंतरच आज सोडलं जात आहे....
- नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकेचे निवडणूक स्थानिक आमदार खासदार आणि माजी खासदार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे....
- सत्तेतील पक्षाचे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत असल्याने विजयाच्या गुलाल कोणाच्या डोक्यावर पडणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार.
Nashik Nagar Palika Nagar Panchayat Election 2025: नाशिक जिल्ह्यात येवला नगरपरिषद निवडणूक चर्चेत राहिली होती. या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून तर दराडे बंधूंनी शिवसेना (शिंदे गट) कडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मंत्री भुजबळांच्या अनुपस्थितीत येवला नगरपरिषदेची निवडणूक सूत्र समीर भुजबळ आणि भुजबळ कुटुंबियांनी हातात घेतली होती. थोड्याच वेळात मतमोजणीला प्रारंभ होत आहे. येवला नगरपरिषदेसाठी 13 टेबलवर चार फेऱ्यांद्वारे मतमोजणी होणार आहे.
Sindhudurg Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE Updates: तळकोकणात कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषद, वेंगुर्ले नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषदमध्ये पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. काही वेळात मतमोजणी सुरू होणार असून निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण भाजपने जिल्ह्यात स्वबळाचा नारा देत निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मालवणमध्ये आमदार निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले मध्ये दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Satara Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: सातारा जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. मतमोजणीची संपूर्ण तयारी जिल्ह्यातील विविध मतमोजणी केंद्रावर पूर्ण झाले आहे. साताऱ्यात दहा राऊंड मतमोजणीचे होतील, या ठिकाणी 16 टेबल लावण्यात आले आहेत. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ईव्हीएम मशीन साठी ठेवण्यात आले आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Latur Nagar Palika Nagar Panchayat LIVE: लातूर जिल्ह्यातील एक नगरपंचायत आणि चार नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यात औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या चार नगर परिषद आणि रेणापूर नगर पंचायतीचा समावेश आहे. या पाच ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी एकूण 32 तर नगरसेवकाच्या एकूण 128 जागांसाठी 513 असे एकूण 545 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज होणार आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
यात अहमदपूरमध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, औषध भाजप आमदार अभिमन्यू पवार उदगीर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, निलंगा भाजप नेते तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, तर रेनापूर येथे भाजप आमदार रमेश कराड या सत्ताधारी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर विरोधकांमधील काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
Satara Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: सातारा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी सातारा नगरपालिकेची निवडणुकीची मतमोजणी काही वेळात सुरू होणार आहे. साताऱ्यातील उमेदवारांची धाकधूक वाढले आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला लागले आहेत. खासदार उदयनराजे, मंत्री शिवेंद्रराजे यांच्या विरोधात पहिल्यांदाच मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. सातारकर नेमका कोणाला कल देणार याचे चित्र काही वेळात स्पष्ट होईल.
Kagal Nagar Palika, Nagarparishad Election Result LIVE: राज्यभरातल्या नगरपंचायती आणि नगरपालिकांची मतमोजणी अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपली आहे..त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे तर कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन नगरपंचायत आणि दहा नगरपालिकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले आहे..राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाले आहे. त्यामध्ये मुरगुड नगरपालिकेसाठी राज्यात सर्वाधिक 88% मतदान झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोण आघाडी बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कागल नगरपालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून 6 टेबलवर 7 फेऱ्या होणार आहेत..कोल्हापूर पोलीस प्रशासनाने निकालानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढू नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत.
Raigad Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: राज्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होतोय. रायगड जिल्ह्यात देखील एकूण दहा नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून सर्वांनाच याची उत्सुकता आहे ती लागून राहिलीय. 217 जागांसाठी 575 उमेदवार नगरसेवक पदासाठी तर 34 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी उभे असून या सर्वांचे भविष्य आजच्या मतदान पेटीतून उलगडणार आहे. त्यामुळे कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. जिल्ह्यात मुरूड, अलिबाग, पेण, कर्जत, रोहा नगरपालिकेवर महिलांना संधी मिळाली असून अलिबाग वगळता उर्वरित चार ठिकाणी महायुतीतील शिंदे सेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच होताना पहायला मिळणार आहे तर तिकडे अलिबाग मध्ये शेकाप विरुद्ध भाजप शिंदे सेना युतीचा सामना रंगणार आहे . त्यामुळे मतपेटीतून उलगडणारे भविष्य आजमावण्यासाठी सर्वच उमेदवार सज्ज आहेत. आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून अनेक रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आलीय.
Chhatrapati Sambhaji Nagar Election Result 2025 LIVE: परळीमध्ये आज नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. नगर परिषदेच्या मुख्य इमारतीत मतमोजणी होत असल्याने आज वैद्यनाथ मंदिर कडे जाणारा मुख्य मार्ग बंद असणार आहे. काही दिवसांपूर्वी स्ट्रॉंग रूम बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या राड्यानंतर आज मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोड वर आहे.
Beed Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: बीड : नगरपरिषदेच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. बीड नगर परिषदेची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात होत असून 18 टेबलवर ही मतमोजणी होईल. तर गेवराईमध्ये नगरपरिषदच्या इमारतीमध्ये एकूण 15 टेबलांवर मतमोजणी होणार आहे.
नगरपरिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला आहे. अजित पवार बीडचे पालकमंत्री असून त्यांनी स्वतः प्रत्येक नगरपरिषदेसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. तर बीड नगरपरिषदेत पहिल्यांदाच भाजपाने 52 जागेसह एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली असून या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला आहे.
स्थानिक पातळीवर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर भाजपा नेते योगेश क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी सत्ता काबीज करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
मतमोजणी आधी कोणाचे पारडे जड?
- बीड नगरपरिषदेत भाजपच्या ज्योती घुंबरे
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्मिता विष्णू वाघमारे
- या दोघींचे पारडे सध्या जड आहे.
- तर अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला का? हे आज समोर येईल.
- तर तिकडे गेवराई नगर परिषदेत भाजपच्या गीता बाळराजे पवार
- आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शीतल दाभाडे या दोघींमध्ये थेट लढत आहे.
- सध्या तरी गेवराईत भाजपच्या गीता पवार यांचे पारडे जड आहे.
Raigad Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: रायगडमधील महाड आणि रोहा नगरपालिकेत मतदानाच्या दिवशी जोरदार राडा झाला होता. महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्यात जोरदार हाणामारी झाली आणि या वादात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. महाडमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये बंद पडलेल्या ईव्हीएम मशिन मुळे या परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापसात आमने सामने आल्याने हा प्रकार घडला आणि या भानगडीत सुशांत जाबरे यांच्या कडून विकास गोगावले यांना पिस्तुल दाखवण्यात आली. महाडमध्ये गोगावले विरुद्ध जगताप कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली असून या नगरपालिकेत शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत होताना पहायला मिळणार आहे तर तिकडे रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचे आरोपावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांना कानाखाली लगावली यावरून रोहा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते रोहा ही नगरपालिका खासदार सुनिल तटकरे यांचा बालेकिल्ला असणारी नगरपालिका असून येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना आणि भाजप युतीमध्ये लढाई होणार आहे त्यामुळे उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रोहा शहरात बाईक रॅली काढत तटकरे यांना आवाहन दिलं होत त्यामुळे रोहा नगरपालिकेवर देखील कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
Sindhudurg Election 2025 LIVE: मालवणमध्ये शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करत भाजप पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचं म्हटलं होत. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या गाडीत पैसे पकडले, त्यावेळी देखील पोलिसांना मालवण पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यास भाग पाडलं. भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली. त्यामुळे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांची मालवणमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोबत याआधी उबाठाचा नगराध्यक्ष होता, त्यामुळे ही जागा उबाठाची असल्यानं इथे माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Solapur Nagar Palika Elections 2025 LIVE Updates: आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढणे, बाईक रॅली काढणे, डॉल्बी लावण यावर पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मोठी उपाययोजना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्वांना वेध लागलेत मतमोजणीचे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये केवळ महायुतीच नव्हे, तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. राज्यातील लहान शहरांचा कौल कोणाला? याचा फैसला आज होणार आहे.
Nagar Palika, Nagar Panchayat Election Result 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्वांना वेध लागलेत मतमोजणीचे. राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी, आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी होईल
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE Updates: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत (Nagarparishad Election Result) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचा निकाल दिलेला. काही नगरपरिषदांबाबत (Nagarparishad Election Result) न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला पार पडली. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे, 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले.
Maharashtra Nagar Palika Elections 2025 LIVE: राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेला. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, आज महाराष्ट्रभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपरिषद निवडणुकीत कोणाची बाजी? मतमोजणी LIVE