Maharashtra Live Updates: 23 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी आज मतदान
Maharashtra Live Updates: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यवतमाळ,...More
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.अभिनेता सोनू सूद हे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते.. दरवेळी शिर्डीत सोनू सूद यांच्या बरोबर असणारे कोपरगाव येथील त्यांचे मित्र विनोद राक्षे आज बरोबर नव्हते.. त्याला कारण म्हणजे विनोद यांच्या पत्नी सुरेखा राक्षे या कोपरगाव नगरपालिकेत नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत... भावासारखा मित्र निवडणुकीत व्यस्त असल्याने आपल्या मित्राच्या भेटीसाठी सोनू सूद स्वतः कोपरगावात पोहोचले... मतदान केंद्राजवळ जाऊन उमेदवार सुरेखा विनोद राक्षे आणि विनोद राक्षे यांची भेट घेत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या
मुंबई : मुंबईत पिंपरी चिंचवडमधून भाजपमध्ये मोठं इनकमिंग सुरु आहे. दुसरीडके पिंपरी चिंचवड भाजपमधील इच्छुकांनी आंदोलन सुरु केलंय. या इच्छुकांनी थेट बंडाचा इशारा दिलाय. हे प्रवेश म्हणजे आम्हा निष्ठवंतांवर अन्याय करणारे आहेत. आमची फसवणूक होतीये, असं करायचं होतं तर मग 820 जणांचे अर्ज मागवून मुलाखती कशाला घ्यायच्या? अशी खदखद व्यक्त करत या इनकमिंगला इच्छुकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध झुगारून भाजपने प्रवेश करुन घेतलेत. आता यांना तिकीट दिलं तर आम्ही बंड करणार, असा इशारा या इच्छुकांनी दिलाय.
- धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिला नजर कैदेत.
- प्रसादाच्या स्वरूपात चार हजार रुपये मिळणार असल्याचा महिलांचा आरोप.
- कप बशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी सकाळपासून थांबून ठेवण्याचा महिलांचा आरोप.
- तुमच्या समाजाच्या नेत्यापाशी पैसे देतो म्हणून कुंभार समाजातील महिला नजर कैदेत.
- मंगल कार्यालय डाबून ठेवल्यानंतर आता मंदिरात महिला नजर कैदेत.
- कप बशी हे चिन्ह मराठवाडा जनहित पार्टीचे असल्याची माहिती
- सकाळी सात वाजल्यापासून महिला मंदिरात नजर कैदेत
बीड : बीड नगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपाचे कमळ फुलेल असा विश्वास भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र मतदार आमच्या बाजूने होते. त्यांनी आमच्या बाजूने कौल दिलाय. गेवराईच्या पंडितांनी याआधी देखील बीडमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. तो लोकांनी धुडकावून लावला. आजही तेच चित्र पाहायला मिळेल असं योगेश क्षीरसागर यांनी मतमोजणी प्रक्रिये दरम्यान म्हटले आहे.
गडचिरोलीतील दिनेश पुसू गवाडे हत्या प्रकरणात एनआयएने आणखी दोन फरार आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी बंदी घातलेल्या CPI (माओवादी) संघटनेचे सदस्य असून रघू उर्फ प्रताप उर्फ इर्पा उर्फ मुद्देल्ला उर्फ सैलू (निझामाबाद, तेलंगणा) आणि शंकर महाका (गडचिरोली, महाराष्ट्र) अशी त्यांची नावे आहेत.
नोव्हेंबर २०२३ मध्ये दिनेश पुसू गवाडे यांचे पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
स्थानिकांमध्ये दहशत पसरवणे आणि नक्षल हालचालींबाबत माहिती देऊ नये, हा या हत्येमागील उद्देश होता.
ऑक्टोबर २०२४ मध्ये तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता.
यापूर्वी या प्रकरणात चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
उर्वरित फरार आरोपींचा शोध आणि कट उघडकीस आणण्यासाठी NIA कडून तपास सुरू आहे.
वसमत नगरपालिका निवडणूक सुरू असून प्रभाग क्रमांक 15 मधील लिट्ल इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्याने गोंधळ झाल्याचे उघडकीस आले आहे. मॉकपोल दरम्यान मशीन मधील बटन दाबत नसल्याने हा गोंधळ झाला होता दरम्यान निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ मशीन बदलल्या असून आता या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे
परभणीच्या जिंतूर नगरपरिषदेतील एका तर दुसरीकडे पूर्णा नगर परिषदेच्या दोन नगरसेवक पदासाठीची मतदानाची प्रक्रिया आज पार पडतेय सकाळपासून दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे.जिंतूर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाची पाहणी राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली यानंतर बोलताना त्यांनी उद्याचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय आज जे मतदान पार पडतय त्यातील मतदारांचा उत्साहच उद्याचा निकाल सांगतोय असे त्या म्हणाल्या आहेत
भंडारा शहरातील दोन प्रभागात मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. दोन प्रभागात 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नव मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया सुरू झाली असून आठ उमेदवारांसाठी दोन प्रभागातील 8107 मतदार मतदान करणार आहेत. मात्र भंडारा शहराचं असलेलं 9 अंश सेल्सिअस तापमान आणि कडाक्याची थंडी यामुळे मतदारराजाने सध्या तरी मतदान केंद्राकडे पाठ दाखवल्याचं चित्र बघायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळत आहे.
भाजपकडून शिवसेनेकडे १३१ पैकी ४८ जागांची मागणी, उर्वरीत जागा शिवसेनेला, यात अनेक जागा शिवसेनेच्या उमेदवारांच्या देखील आहेत
मात्र शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नाही, सिटिंग नगरसेवकांच्या जागा मागितल्याने शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी
भाजप कडून मागील काही निवडणूक निकालांचे दाखले, मात्र त्यामध्ये एकट्या भाजपचे नाही तर युती म्हणून शिवसेनेचे देखील मते असल्याचा शिवसेनेचा बैठकीत निर्वाळा
सेना भाजप जागा वाटपात ठाणे शहरातील जागांचा मोठा तिढा, एकच ठिकाणी दोन्ही पक्षाची ताकद असल्याने एका पॅनल मध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार मिळून उभे राहण्याची शक्यता
सोलापूर शहरातील एका इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
सोलापुरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये अज्ञात कारणावरून वीस वर्षे तरुणाची आत्महत्या.
विद्याधर प्रकाश शिंदे असे आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थ्यांचे नाव.
विद्याधर शिंदे हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता.
विद्याधर शिंदे हा धाराशिव जिल्ह्यातील कळंब रहिवासी होता
याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे
तुम्ही केलेला भ्रष्टाचार काढू नये आणि दुसरे पैसे मागायचे म्हणून तुम्ही शहाच्या भेटीला गेलात. असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय... परळी नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत बजरंग सोनवणे यांनी बोलतांना केंद्रामधून पैसा आणून मी परळीचा विकास करणार.. फक्त पोस्टर बाजी करणार नाही.. प्रभू वैद्यनाथाचा विकास करण्यासाठी मी शहाला भेटलो असं पोस्ट करून सांगणार नाही.तुम्ही केलेला भ्रष्टाचार काढू नये आणि दुसरे पैसे मागायचे म्हणून तुम्ही शहाच्या भेटीला गेलात. मी केंद्रातून आणि राज्य सरकार मधून पैसा आणून विकास करणार जिल्हा नियोजन मधून मला 12 कोटी मिळाले त्यातील सहा कोटी तर माझ्या पी ए ने वाटून टाकले. अस बजरंग सोनवणे म्हणाले.
अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषद शाळेच्या मतदान केंद्र 4/3 वर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड..
अंजनगाव सुर्जी मध्ये आज नगरपालिकेच्या मतदानाला साडेसात वाजता झाली सुरुवात..
मशीन बंद झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली..
मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा..
भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये आज मतदान होतं आहे. या दोन जागांसाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 12 मध्ये 5 तर, प्रभाग 15 मध्ये 3 उमेदवार उभे आहेत. दोन प्रभागात 9 मतदान केंद्रावर 45 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहे. तापमानाचा पारा 10 अंश डिग्री सेल्सिअस वर पोहोचला असताना कुडकुडत्या थंडीतही भंडाराकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला आहे. या निवडणुकीत शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
रत्नागिरी- जिल्ह्यात विविध ठिकाणी बिबट्याची दहशद वाढली
राजापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार
राजापूर चव्हाणवाडी येथे वैभव चव्हाण यांच्या कारखान्यातील कुत्र्यांवर हल्ला
कुत्र्यावरच्या हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर
तर दुसऱ्या एका घटनेत संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर गावातील एका घरात शिरला बिबट्या
वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर तीन तासानंतर बिबट्या जेरबंद
पकडलेल्या बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडले जाणार
गंगापूर तालुक्यातील मुरमी एका १८ वर्षांच्या तरुणीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना काल उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ (१८), असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वैष्णवी वाळूज येथील एका विद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी तिचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वैष्णवीचा मृतदेह घरात आढळून आल्याने ग्रामस्थांना धक्का बसला.
घटनेवेळी ती घरात एकटीच होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धाव, फॉरेन्सिक टीम पाचारण घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
गंगापूर तालुक्यातील मुरमी एका १८ वर्षांच्या तरुणीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना काल उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ (१८), असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वैष्णवी वाळूज येथील एका विद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी तिचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वैष्णवीचा मृतदेह घरात आढळून आल्याने ग्रामस्थांना धक्का बसला.
घटनेवेळी ती घरात एकटीच होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धाव, फॉरेन्सिक टीम पाचारण घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
हिंगोली : वसमत नगरपालिकेचे निवडणूक आपला मध्ये असल्याने पुढे ढकलण्यात आली होती आणि त्यानुसार आज या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे वसमत शहरातील 72 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया राबवली जाणार असून 56 हजार मतदार आज मतदानाचा अधिकार बजावणार आहेत वसमत नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाची सात उमेदवार राज्य रिंगणात आहेत तर नगरसेवक पदासाठी 125 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे.
मंगळवेढ्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने आदर्श मतदान केंद्र उभारलेली असून यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मंगळवेढा नगरपालिकेत साठी आज मतदान होत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने आदर्श मतदान केंद्र बनविली आहेत. या मतदान केंद्रावर फुग्यांची आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .. मतदान करून आलेल्या मतदारांसाठी मतदार सेल्फी पॉईंट देखील बनविला असून आता या आदर्श मतदान केंद्रामुळे मतदानाचा टक्का किती वाढणार हे पाहता येणार आहे.
मंगळवेढ्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने आदर्श मतदान केंद्र उभारलेली असून यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मंगळवेढा नगरपालिकेत साठी आज मतदान होत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाने आदर्श मतदान केंद्र बनविली आहेत. या मतदान केंद्रावर फुग्यांची आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .. मतदान करून आलेल्या मतदारांसाठी मतदार सेल्फी पॉईंट देखील बनविला असून आता या आदर्श मतदान केंद्रामुळे मतदानाचा टक्का किती वाढणार हे पाहता येणार आहे.
मराठवाड्यामध्ये आज सहा जिल्ह्यात 115 सदस्यांसाठी मतदान होतंय.. फुलंब्री नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. यापूर्वी ही मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र काही कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आज मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन तर 17 जागेसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मतदान प्रक्रियेपूर्वी सकाळी ईव्हीएम यंत्रांची तपासणी उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी , मतदान अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने मतदान होण्यासाठी प्रशासन सज्ज असून आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, फुलंब्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून सुहास शिरसाठ तर महाविकास आघाडीच्या वतीने राजेंद्र ठोंबरे हे उमेदवार रिंगणात आहेत.
अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते. हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणलं असल्याचा आरोप काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय .दरम्यान काँग्रेस व भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इथे गोंधळ घातला, या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराने आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढले, या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का? याची चौकशी आता केली जाते आहे.मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं आहे.
मराठवाड्यामध्ये आज सहा जिल्ह्यात 115 सदस्यांसाठी मतदान होतंय. फुलंब्री नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. यापूर्वी ही मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र काही कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आज मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन तर 17 जागेसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. मतदान प्रक्रियेपूर्वी सकाळी ईव्हीएम यंत्रांची तपासणी उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी , मतदान अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने मतदान होण्यासाठी प्रशासन सज्ज असून आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, फुलंब्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून सुहास शिरसाठ तर महाविकास आघाडीच्या वतीने राजेंद्र ठोंबरे हे उमेदवार रिंगणात आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Updates: 23 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी आज मतदान