Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांना काँग्रेस हवी आहे; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मनसेची नाराजी
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना आजपासून सुरुवात होणार आहे. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची पश्चिम विदर्भासाठीची आढावा बैठक होणार आहे. तर मुंबई...More
नाशिक महापालिकेच्या वतीने रामकाल पथ योजनेअंतर्गत रामकुंड परिसरातील गेल्या दोन सिंहस्थ कुंभमेळ्याचे साक्षीदार असलेल्या वस्त्रांतर गृहाची इमारत अखेर पाडण्यात आली. महापालिकेचे कामकाज दोन दिवसांपासून सुरू होते. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक पुरोहित संघाने याला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र विरोध डावलून वस्त्रांतर गृह जमीनदोस्त करण्यात आले.
धुळे : जिल्ह्यात यंदा तीन लाख 80 हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली होती... मात्र अतिवृष्टी मुळे केवळ 12 हजार हेक्टरला फटका बसला असून उर्वरित तीन लाख 68 हजार हेक्टर वरील पिकांचे देखील अनियमित पाऊस आणि नंतरच्या झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असून केवळ 12 हजार हेक्टर वरील पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे... उर्वरित तीन लाख 68 हजार हेक्टर वरील नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्याम सनेर यांनी केली आहे...
धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसला आहे... या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेली मदत ही जिल्ह्यातील केवळ 12 हजार हेक्टर वरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार असून जिल्ह्यात यंदा तीन लाख 80 हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली होती... मात्र अतिवृष्टी मुळे केवळ 12 हजार हेक्टरला फटका बसला असून उर्वरित तीन लाख 68 हजार हेक्टर वरील पिकांचे देखील अनियमित पाऊस आणि नंतरच्या झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असून केवळ 12 हजार हेक्टर वरील पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे...उर्वरित तीन लाख 68 हजार हेक्टर वरील नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत जाहीर करा अशी मागणी अजित पवार गटाचे श्याम सनेर यांनी केली आहे...
शहापूर तालुक्यातील आसनगाव MIDC परिसरातील एस. के. आय. प्लास्टिक कंपनीत आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग एवढी विक्राळ झाली की परिसरात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले. या धुराचे लोट दहा ते बारा किलोमीटर अंतरावरून पाहिले जात आहे. आगीची माहिती मिळताच शहापूर, भिवंडी, कल्याण तसेच जिंदाल अग्निशमन दलाच्या एकूण चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मागील तीन तासांपासून आग सुरूच असून, अद्यापही पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, या कंपनीत प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन केले जात होते. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान सलग प्रयत्न करत असून, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजून किती वेळ लागणार हे सांगता येणार नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिसाचा पलंगावरून पडल्याने मृत्यू
संभाजी शिवाजी दोलतोडे असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव..
शिवाजी दोलतोडे हे घरी झोपले असताना पलंगावरून पडल्याने
डोक्याला गंभीर इजा झाली होती
त्यानंतर त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झालंय
याप्रकरणी सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक निधन म्हणून करण्यात आली आहे नोंद
खेड तालुक्यातील नातूनगर येथे मर्सिडीज कारला लागली आग; तिघे प्रवासी थोडक्यात बचावले
नातूनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री साडे दोनच्या सुमारास एका मर्सिडीज बेंझ कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नाशिकचे संदेश राजेश चवळे हे आपल्या MH 02 BZ 1400 क्रमांकाच्या मर्सिडीज बेंझ कारमधून नाशिकहून गणपतीपुळेच्या दिशेने प्रवास करत होते. कारमध्ये एकूण तीन जण प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक कारमधून धूर निघू लागल्याने सर्वजण तत्काळ बाहेर पडले, आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला.
खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, कार पूर्णपणे जळून खाक.
खेड तालुक्यातील नातूनगर येथे मर्सिडीज कारला लागली आग; तिघे प्रवासी थोडक्यात बचावले
नातूनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री साडे दोनच्या सुमारास एका मर्सिडीज बेंझ कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नाशिकचे संदेश राजेश चवळे हे आपल्या MH 02 BZ 1400 क्रमांकाच्या मर्सिडीज बेंझ कारमधून नाशिकहून गणपतीपुळेच्या दिशेने प्रवास करत होते. कारमध्ये एकूण तीन जण प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक कारमधून धूर निघू लागल्याने सर्वजण तत्काळ बाहेर पडले, आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला.
खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, कार पूर्णपणे जळून खाक.
Nashik Crime News : कोणी लागत नाही नादी...' असे रील तयार करीत व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकच्या जेलरोड येथील माजी नगरसेवक पवन पवार व त्याच्या साथीदाराविरुद्ध सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरविल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केलाय...नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात स्वतःचे शुभेच्छा फलक अवैधरीत्या लावल्याप्रकरणी पवन पवार व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पवन पवारसह संशयित वतन ब्रह्मानंद वाघमारे व त्यांचे साथीदार सोहेल पठाण, तथागत, आशिष वाघमारे, नीलेश भोसले यांनी त्यांचे फोटो वापरून या रीलद्वारे 'कोणी लागत नाही नादी, मोठे लोक आमच्याकडे येतात, मोजीवाले गँगस्टर...' अशा शब्दांत रील तयार केले होते. या संदर्भात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत थेट माजी नगरसेवक पवन पवार यांच्यावरच पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला आहे.
एसआरए प्रकल्पात आता 35 टक्के जागा खुली ठेवावी लागणार
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचे परिपत्रक
35 टक्के जागा सार्वजनिक स्वरुपात खुली ठेवावी लागणार
65 टक्के जागेतच इमारतींचा विकास करता येणार
खुल्या जागांच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष निरीक्षण समितीची स्थापना
एसआरए उपमुख्य अभियंतांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
आदेशात काय?
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात आता 35 टक्के जागा खुली ठेवावी लागणार
ही 35 टक्के जागा विकसित करून स्थानिक महापालिका किंवा प्राधिकरणाकडे सुपूर्द करावी लागेल
तीन वर्षांसाठी या जागेच्या देखभालीची तरतूद ही विकासकालाच करावी लागेल
विकसित केलेल्या या 35 टक्के जागेमध्ये सर्व नागरिकांना प्रवेश खुला ठेवावा लागेल
या खुल्या जागी हरित लँडस्केपिंग, उद्यान, सावलीसाठी झाडे, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाकडे, खेळणी या स्वरूपात विकसित केल्या जातील
‘ही जागा सार्वजनिक आहे’ अशा आशयाचा फलकही विकसित केलेल्या खुल्या जागेत लावावा लागेल
मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने कांग्रेसची महत्त्वाची बैठक
कांग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात
रमेश चेन्नीथला यांच्यासोबतच कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, भाई जगताप, ज्योति गायकवाड यांची उपस्थिती
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत कशा पद्धतीची रणनिती आखली जावी याबाबत चर्चा
दोन्ही ठाकरे एकत्र येत असल्याच्या चर्चा असताना काँग्रेस ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणार का? हे बघणं महत्त्वाचं
मुंबईतील स्थानिक प्रश्नांसोबत स्थानिक राजकारणाचा आढावा घेत रिपोर्ट सादर केला जाणार
मुंबईतील सांताक्रुझमधील गॅलेक्सी हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात
महापालिका निवडणुकीच्या तोंडावरं सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
भाजप शहराध्यक्क्षांनी संघटन मंत्र्यांना पत्र लिहीत भाजप आमदार विरोधात केली तक्रार
भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी संघटनमंत्री राजेश पांडे यांना पत्र लिहीत भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरुद्ध केली तक्रार
सोलापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयकुमार देशमुख हे कोणत्याही पद्धतीचे सहकार्य करत नसल्याचा आरोप
पक्षाने दिलेले कोणतेही कार्यक्रम उत्तर विधानसभा मतदार संघातील नगरसेवक, मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्ते राबवत नाहीत
पक्षाने परवानगी दिली तर आम्ही उत्तर विधानसभेत सक्षमपणे यंत्रणा उभी करून आगामी निवडणुकीत भाजपाची सत्ता आणू
तसेच शहर उत्तर मधील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करुन दुसरे पदाधिकारी नेमावेत
अशी मागणी भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी संघटना मंत्री राजेश पांडे यांच्याकडे केली आहे
मागील काही दिवसापासून आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यातला वाद उफाळून आलंय
विजयकुमार देशमुख यांनी देखील जाहीर व्यासपीठावरून शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यावर टीका केली होती
त्यानंतर आता भाजप शहराध्यक्ष यांनी आमदारविरोधात लिहलेल्या पत्रामुळे भाजपमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय
दिवाळीपूर्वी एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत
16 संघटनांनी संपाबाबत राज्य सरकारला पत्रक दिल्याची माहिती
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीमध्ये एक वाजता सह्याद्रीला महत्त्वाची बैठक पार पडणार
त्यापूर्वी अनेक एसटीचे कर्मचारी हे आझाद मैदानामध्ये एकवटणार आहे
एसटीच्या कृती समितीच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष कायम
पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण
पुणे पोलिस दलातील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण
पुण्यातील कोंढवा परिसरात ४ ते ५ जणांकडून कर्मचाऱ्याला मारहाण
पवन डिंबळे असे वाहतूक कर्मचाऱ्याचे नाव
डिंबळे सध्या भारती विद्यापीठ विभागाच्या वाहतूक विभागात कार्यरत आहेत
मारहाणीत डिंबळे यांच्या कानातून आणि नाकातून आले रक्त
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील कोंढवा परिसरात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, डिंबळे हे त्यांची ड्युटी संपवून घरी निघाले असताना कोंढवा भागातील एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले. तिथे काही जणं दारू पित असल्याचं निदर्शनास आल्यानंतर डिंबळे यांनी त्यांना हटकलं. यातून त्या तरुणांमध्ये आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले. काही वेळात तिथे सबंधित तरुणांचे मित्र आले आणि त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली
पोलिस कर्मचाऱ्याने अंगात जॅकेट घातल्यामुळे संबंधित व्यक्ती कोण आहे हे त्या तरुणांना कळले नाही
जखमी पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे
मंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले
सिल्वर ओक निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले
भेटीच कारण अस्पष्ट
राजगड किल्ल्यावर मधमाश्यांचा हल्ला; तरुणी ४० फूट दरीत कोसळली, रात्री रेस्क्यू मोहिम यशस्वी
राजगड किल्ल्यावर मधमाशांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले
राजगड किल्ल्यावर फिरायला आलेल्या अंजली पाटील हिला मधमाश्यांच्या हल्ल्यापासून बचाव करताना ४० फूट खोल दरीत कोसळल्याने गंभीर दुखापत झाली.
तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याने ती हालचाल करू शकत नव्हती.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस आणि रेस्क्यू टीम मध्यरात्री धाडसी रेस्क्यू मोहीम राबवली.
निसरडा उतार आणि अंधारात ८–९ तासांच्या प्रयत्नांनंतर तिला सुरक्षितपणे खाली आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक तोडगा काढण्याच्या बैठकीवरुन महायुतीतील तिन्ही नेत्यांमध्ये श्रेय लढाई
कामगार संघटनेकडून घाईघाईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावण्यात आली
मात्र, पडळकरांच्या सेवा शक्ती एसटी संघटनेनं आक्षेप घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडून आजची बैठकच रद्द करण्यात आली
त्यानंतर, पडळकरांच्या संघटनेकडून मुख्यमंत्र्यांकडे मंगळवार किंवा बुधवारी बैठक लावण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं
मात्र, यासंदर्भातली माहिती मिळताच तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण देण्यात आलं
ज्या कर्मचारी आंदोलनात सहभागी नाहीत अशा देखील संघटनांना बोलवून बैठकीचं नियोजन करण्यात आलं
त्यामुळे फक्त बैठका लावण्यावरुन महायुतीत श्रेय लढाई सुरु असल्याची चर्चा आहे
अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या सर्व जनावरांना नुकसान भरपाई मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तीन जनावरांची अट रद्द
जनावर वाहून गेल्यावर पुरावा नसेल तरी पशु मालकांना मिळणार नुकसान भरपाई, त्यासाठी प्रशासकीय कमिटीची नियुक्ती होणार
कोल्हापूर,सांगली जिल्हामध्ये 2019 ला आलेल्या महापूराच्या धरतीवर धाराशिव जिल्ह्यात वाहून गेलेल्या जनावरांसाठी गावोगावी प्रशासकीय कमिटीची नियुक्ती
तलाठी, ग्रामसेवक पशु वैद्यकीय डॉक्टर, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील आणि कोतवाल यांचा कमिटीमध्ये असणार समावेश
या कमिटीने शेतकऱ्याकडे पशुधन असल्याचं पत्र दिल्यानंतर , पशु मालकांना मिळणार नुकसान भरपाई
एन डी आर एफ आणि एसडी आरएफ निकषांनुसार सर्व जनावरांसाठी पशु मालकांना अनुदान मिळणार असल्याची भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव जिल्ह्यात महापुराच्या तडाख्यात दोनशेहून अधिक पशुधनाचा मृत्यू
भररस्त्यात एलपीजी टँकर थांबवून गॅस सिलिंडर रिफिलिंग करणारे सेंटर वाळूज भागात परिसरात उघडकीस
छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज एमआयडीसी भागात घरगुती वापराचा एलपीजी वाहून नेणाऱ्या महाकाय टँकरमधून अवैधरीत्या व्यवसायीक सिलिंडरमध्ये गॅस भरत असल्याचा धक्कादायक प्रकार आला आहेच. वाळूज औद्योगिक परिसराला लागून असलेल्या गंगापूर परिसरात हा प्रकार सुरू होता. बाजारभावापेक्षा व्यावसायिक सिलेंडर कमी किमतीत विकले जात होते का? गॅस टँकर इथपर्यंत कसा पोहचला ? टँकर चालक गॅसची चोरी नेमक्या कसा करत होता यासह अन्य प्रश्न उपस्थित होतात.
मात्र, हा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कोण चालवते याचा शोध सुरू या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सगळ्या चित्रीकरणही करण्यात आले आहे. घटनास्थळी शेकडो गॅस सिलिंडरचे गोदाम असून तेथे सुरक्षेची कुठलीही उपाययोजना नव्हती. काही मोठी दुर्घटना घडून अनेकांच्या जिवाला धोका होऊ शकतो.
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज अमरावती आणि नागपूर विभागीय बैठक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,संघटन मंत्री शिवप्रकाश ही बैठक घेणार आहेत
- अमरावती विभागाची बैठक अमरावती येथे सकाळी 11 वाजता तर नागपूर विभागाची नागपुरात 4 वाजता सुरू होणार आहे
- या बैठकीला जिल्हास्तरीय भाजप पदाधिकारी उपस्थित राहतील
- बैठकीत महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आगामी निवडणुकीला सामोरे जाताना काय केलं पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात येणार
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज अमरावती आणि नागपूर विभागीय बैठक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,संघटन मंत्री शिवप्रकाश ही बैठक घेणार आहेत
- अमरावती विभागाची बैठक अमरावती येथे सकाळी 11 वाजता तर नागपूर विभागाची नागपुरात 4 वाजता सुरू होणार आहे
- या बैठकीला जिल्हास्तरीय भाजप पदाधिकारी उपस्थित राहतील
- बैठकीत महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आगामी निवडणुकीला सामोरे जाताना काय केलं पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात येणार
Nashik : नाशिक शहरामध्ये वाढलेल्या गुन्हेगारीनंतर नाशिक पोलिसांकडून क्लीन अप मोहीम सुरू करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार, राजकीय नेत्यांच्या आश्रयातील गुन्हेगार, शहरातील सराईत, रील बनवत दहशत पसरवणारे अशा विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. या गुन्हेगारांना पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे उद्गार गुन्हेगारांच्या तोंडून निघत आहे. मात्र शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईनंतर आता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून देखील गुन्हेगारांच्या विरोधात ॲक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. सोशल मीडियावर दहशत पसरवणाऱ्यांना नाशिक ग्रामीण पोलिसांकडून चांगलाच धडा शिकवला जात आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार अन्यथा कारवाई केली जाईल असा नम्रतेचा थेट इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता
पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी आमदार रोहित आबा पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदी मेहबूब शेख जबाबदारी सांभाळत आहेत
पक्षाच्या संघटनात्मक बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे
सूत्रांची माहिती
कल्याणमधील वसंत व्हॅली (Vasant Valley) परिसरातील डीमार्टमध्ये (DMart) एका परप्रांतीय महिलेने मराठी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या महिलेला जाब विचारला. ‘मला पोलिसांची आवश्यकता आहे का?’, असा प्रश्न विचारत तिने सुरुवातीला प्रतिसाद दिला. मनसेच्या हस्तक्षेपानंतर या महिलेने अखेर माफी मागितली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक घोषित होण्याच्या आधीच महायुतीत जागा वाटपावरून चढाओढ सुरू झाली आहे. शहरात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असले तरी भाजपचं जागावाटपात भाजपचं मोठा भाऊ असेल असं आमदार संजय केनेकर म्हणाले आहेत तर आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही वेगळा विचार करू असा थेट इशारा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दिला आहे . तर संजय शिरसाठ यांनी कालच म्हटलं आगामी निवडणूक महायुतीतच लढवायची, पण काही जण आमच्याशी छळ कपट करत असल्याचं म्हटलं आहे.त्यामुळे महायुतीत निवडणूक घोषणा होण्याआधीच महायुतीत कलगीतुरा रंगल्याच पाहायला मिळतोय .
गोसीखुर्द प्रकल्पासाठी शेकडो गावातील नागरिकांच्या शेती आणि गावा अधिग्रहित केलीत. मात्र 40 वर्षांचा कालावधी लोटलेला असतानाही अजूनही प्रकल्प बाधितांच्या अनेक समस्या निकाली निघालेल्या नाहीत. वारंवार आंदोलन करून, निवेदन देऊन प्रलंबित प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून भंडाऱ्यात प्रकल्प बाधितांचा अभिनव आरपार निवासी आंदोलन सुरू केलं. आज भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे नियोजन समितीच्या बैठकीला भंडाऱ्यात आलेत. दरम्यान, अभी नही तो कभी नही म्हणत प्रकल्पबाधित आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई - कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. प्रकल्प बाधितांचा आक्रमक पवित्रा बघतात पालकमंत्री भोयर यांनी नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर प्रकल्पबाधितांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून प्रलंबित समस्या जाणून घेतल्यात. यावेळी प्रकल्प बाधितांनीही त्यांच्या समस्या, निर्माण होणारी अडीअडचण आणि लालफितशाहीत अडकलेले त्यांचे प्रस्ताव किंवा प्रलंबित असलेले प्रश्न हे पोटतिडकीने मांडलेत. यावर पालकमंत्री भोयर यांनी....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत लवकरच प्रकल्पबाधितांची बैठक लावू, असं आश्वस्त केलं. यासाठी प्रकल्प बाधितांची 11 लोकांची समिती गठित करण्याच्या सूचनाही गोसेबाधितांना दिल्यात. पालकमंत्र्यांनी सर्व समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागील आठ दिवसांपासून सुरू असलेलं गोसे बाधितांच आरपार निवासी आंदोलन मागे घेण्यात आलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना आजपासून सुरुवात होणार आहे. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची पश्चिम विदर्भासाठीची आढावा बैठक होणार आहे. तर मुंबई महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत काँग्रेसची मुंबईत बैठक पार पडेल. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेही शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Updates: राज ठाकरे यांना काँग्रेस हवी आहे; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मनसेची नाराजी