- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसचे प्रमुख नेते सत्याच्या मोर्चात सहभागी; सभास्थळी हजारोंची गर्दी, आतापर्यंत काय काय घडलं?, सर्व अपडेट्स
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार (Mumbai Morcha) आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा (Satyacha Morcha)...More
लोकशीत संविधानेन जो अधिकार दिला आहे त्याच रक्षण करण्याची आज वेळ आली आहे
सगळं विसरून आम्हाला एक व्हाव लागेल
सिद्ध करून देण्याचं आम्हाला आव्हान केल होत ज्यांनी सिद्ध केल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला
गुन्हे दाखल होतात याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत
संसदीय लोकशाही टिकवायची असेल तर एक व्हाव लागेल
आज सगळ्यांनी जबरदस्त एकजूट दाखवली...
राज्यात मत चोर दिसेल तिथल्या तिथे लोकशाहीचा मार्गाने फटकावला पाहिजे
Ancondaa बसलेला आहे
निवडणूक येईल तशी यांची दडपशाही सुरू होईल
कायदेशीर पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार जेव्हा कधी निकाल येईल तेव्हा बघू
निवडणूक आयोग लाचार झाला आहे
नाही तर जनतेच न्यायालय या सगळ्यांचा निर्णय घेईल
आम्ही एकत्र आलोय तुमच्यासाठी, मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी, महाराष्ट्रासाठी
यावेळी तुम्ही भक्कम पणे साथ देण्याची गरज आहे
आम्हाला निवडणुका हव्या आहेत
यांना लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आम्ही आसुसलेलं आहोत
मात्र ठरवून तुम्ही निवडणुका घेणार आहात तर लोकांनी ठरवायचं आहे
डोळ्यादेखत लोकशाहीची खून होतोय त्यावर लाचारी करणार नाही
निवडणूक आयोगाची लोक घरी आली होत
सक्षम नावाच्या ऍप वरून अर्ज केला होता
माझ्या नावाने OTP काढण्याचा प्रयत्न झाला
२३ तारखेला अर्ज करण्यात आला
मतदार यादीतून चौघांची नाव बाद करण्याचा प्रयत्न केला गेला का?
आज संपूर्ण महाराष्ट्र एकवटून देशाला दिशा दाखवतोय
सगळ्यांनी आपली नाव तपासा आणि तुमच्या घरात पत्त्यावर कोणी रहात नाहीत ना याची तपासणी करा
कारण शौचालयात लोक रहात आहेत
संतुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या विरोधी पक्षांची एकजूट झाली आहे.
मध्यंतरी वापरलेला एक शब्द गाजला
आत्ता जागे व्हा नाहीतर Anaconda आ येईल,
मी का anaconda बोललो कारण यांची भूक संपत नाही
पक्ष चोराला सगळी घेतलं
मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे आमचा परदा फाश करूनच दाखवा
आज संपूर्ण महाराष्ट्र एकवटून देशाला दिशा दाखवतोय
सगळ्यांनी आपली नाव तपासा आणि तुमच्या घरात पत्त्यावर कोणी रहात नाहीत ना याची तपासणी करा
कारण शौचालयात लोक रहात आहेत
नवी मुंबईत आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेले
शौचालयात मतदार नोंदवले गेले
लाजिरवाणी बाब आहे
मशीन्स च डेमन्स्टार्शन केल
सगळ्यांना जर प्रश्न असेल निवडून आलेल्यांना देखील प्रश्न पडला होता
हा सगळं प्रकार निवडणूक आयोगांमार्फत सुरू आहे
हा मतदारांचा अपमान नाही का?
त्यांच्या मताला काय किंमत आहे.
असत्य बोलणारे सत्याचा मोर्चा घेऊन निघाले आहेत
गेस्ट अपेअरींग करणारे आज बाहेर निघाले आहेत
तीन कपडे बदलून सहभागी झाले आहेत
कांग्रेस नेते भारत जोडोसाठी निघाले होते
लोकसभा गेली मात्र यांना इंडिया आघाडी देखील एकत्र ठेवता आलं नाही
आरक्षण संविधान संपवणार असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला
खासदार याच मतदारयादीतून निवडून आलेत
मुख्यमंत्री पदाचे स्वप्न यांना पडू लागले होते, मीच मुख्यमंत्री कसा होणार असे प्रयत्न नेते यांचे करत होते
मात्र, आम्ही यांचा फेक नॅरेटिव्ह खोडून काढला
लोकांच्या सामान्य मनात आदर आहे, ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत
मुंबई उत्तर पूर्व मध्ये ९२९८३ दुबार मतदार
उत्तर मध्ये ६३७४० दुबार मतदार
दक्षिण मध्ये ५०५६५ दुबार मतदार
दक्षिण मुंबई ५५२०५ दुबार मतदार
नाशिक लोकसभा ९९६७३ दुबार मतदार
मावळ १४५६३६ दुबार मतदार
नव्याने सांगण्यासाठी काही नाही.
याआधीच अनेक वेळा बोललो आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल सगळ्यांचे आभार....
सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत
साडेचार मतदार कल्याण डोंबिवली मुरबाड आणि मधील मतदार
यांनी मलबार हिल मतदार संघात देखील मतदान केल
राज ठाकरे यांनी यादी आणली...
एकीकडे सभेला सुरवात झाली आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची धावपळ सुरू
व्यासपीठ जवळ शरद पवार यांची गाडी यावी यासाठी सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न सुरू
देशभरात मतदारयाद्यांमध्ये घोळ आहे, असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणालेय
बाळासाहेब थोरात यांनी मोर्चास्थळी भाषण करण्यास सुरुवात केली आहे.
मनसे आणि शिवसेनेमधील जवळीक वाढल्याने काँग्रेसने महाविकास आघाडीत विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आजच्या मोर्चात प्रदेश काँग्रेसमधील नेते आणि मुंबई काँग्रेसमधील नेते सहभागी होणार की नाहीत? अशी चर्चा रंगली होती. मात्र, शेवटच्या क्षणी काँग्रेसचे नेतेही मोर्चात दिसून आले. मनसेला थेट विरोध करत असलेल्या भाई जगताप यांचाही मोर्चात सहभाग दिसून आला. बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेतेही सत्याचा मोर्चात चालताना दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे आयोगाविरोधात दबाव वाढवण्यात महाविकास आघाडी आणि मनसेला यश आलं आहे.
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे मंचावर दाखल
जयंत पाटील मंचावर दाखल
अमित ठाकरे देखील मंचावर उपस्थित
जयंत पाटील, अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार मंचावर उपस्थित
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ
मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई अध्यक्ष अमित साटम
आमदार योगेश सागर
विद्या ठाकूर
संजय उपाध्याय
मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना
काही माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ
मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई अध्यक्ष अमित साटम
आमदार योगेश सागर
विद्या ठाकूर
संजय उपाध्याय
मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना
काही माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती
राज ठाकरे-उद्धव ठाकरे सत्याच्या मोर्चात सहभागी झाले आहे. दोघंही चालत सभास्थळी रवाना होतं आहेत. दुसरीकडे शरद पवार २ मिनिटांत मोर्चाच्या ठिकाणी पोहचतील.
नसीम खान,
विजय वडेट्टीवार,
बाळासाहेब थोरात,
विद्या चव्हाण,
सुप्रिया सुळे,
अरविंद सावंत,
अनिल देसाई,
विनायक राऊत,
अंबादास दानवे
सुनिल राऊत
सुनिल प्रभू
शेकापचे जयंत पाटील
जितेंद्र आव्हाड
माकपचे अजित नवले
राजू पाटील
नितिन सरदेसाई
सुनिल प्रभू
भाजपच्या मूक आंदोलनाला कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात
आमदार विद्या ठाकूर, मुंबई भाजप आणि युवा मोर्चाचे काही पदाधिकारी दाखल
विरोधकांच्या मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
७० ते ८० अधिकारी आणि ४०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात.
राज्य राखीव दलाच्या ४ ते ५ तुकड्याही बंदोबस्तला तैनात करण्यात आल्या आहेत.
जवळपास ५०० पोलीस कर्मचारी आजच्या मोर्च्याच्या अनुषंगाने सीएमटी परिसरात आणि फॅशन स्ट्रीट परिसरात तैनात आहेत.
मुंबईत होणाऱ्या महामोर्चा साठी नवी मुंबईतून शिवसैनिक रवाना
वाशी रेल्वे स्थानकावरून शिवसैनिक आंदोलनासाठी रवाना
एव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी
येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे ब्रॅण्ड चालणार
मुंबई पोलिस दलातील उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे सभास्थळी दखल
परवानगी नाकारली का दिली यावरून अजूनही स्पष्टीकरण नाही
पोलिस उपआयुक्त प्रवीण मुंडे यांच्याकडून सभास्थळी पाहणी
मुंबई पोलिस दलातील इतर अधिकारी सुद्धा याठिकाणी उपस्थित
सभास्थळी मोठ्यसंखेने ठाकरेंचे कार्यकर्ते दाखल
घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचा केला जातोय निषेध
मेट्रो जंक्शनला पोलिस उपायुक्त प्रवीण मुंडे पाहणीसाठी आलेले आहेत
जितेंद्र आव्हाड सिल्व्हर ओकला पोहचले
महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी होण्यावरुन मुंबई कांग्रेस आणि महाराष्ट्र कांग्रेसमध्ये गटबाजी
मुंबई कांग्रेसकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात अधिकृत मॅसेज नाही
विश्वसनीय सूत्रांचे माहिती
महाराष्ट्र कांग्रेसकडून सहभागी होण्यास कार्यकर्त्यांना सांगण्यात आले असले तरी मुंबई कांग्रेसचा स्वतंत्र दर्जा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
कांग्रेसचे काही मोजके कार्यकर्ते मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती
मात्र, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अनुपस्थिती असणार
बिहार विधानसभा निवडणुका आणि राज ठाकरेंकडे मोर्चाचे नेतृत्व असल्याने कांग्रेसचा सहभागी होण्यावरुन सावध पवित्रा
राहुल गांधींचाच मुद्दा राज ठाकरेंनी घेतल्याने कांग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होण्यावरुन संभ्रम
मुंबईत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसे (MNS) यांनी 'मतदार याद्यांमधील घोळ' (Voter list irregularities) आणि 'मतचोरी' (vote theft) विरोधात 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. 'मोर्चा हा परवानगी येईल किंवा नाही याचा विषय नाही,' असा इशाराच कार्यकर्त्यांनी दिला आहे. हा मोर्चा फॅशन स्ट्रीटपासून सुरू होऊन मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयावर धडकणार आहे, जिथे नेत्यांची भाषणे होतील. आंदोलकांच्या दाव्यानुसार, या मोर्चाला लाखो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. या मोर्चासाठी BMC मुख्यालयाबाहेर स्टेज उभारणीचे काम सुरू असून, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होऊ लागले आहेत.
दोन्ही पक्ष कार्यकर्ते ठाणे स्टेशनवर पोचले, जोरदार घोषणाबाजी
सत्याचा मोर्चामध्ये सामील होण्यासाठी कांदिवली चारकोप मधून मोठ्या संख्या मध्ये मनसेच्या कार्यकर्ते ढोल वाजवत चर्चगेटच्या दिशेने निघाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी घोटी टोलनाका वर पोहचले, ग्रामीण आणि शहरातील पदाधिकारी याठिकाणी एकत्रित जमून मुबईच्या मोर्चासाठी रवाना होत आहेत
मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच माकपचे पदाधिकारी देखील घोटीत जमले असून मनसेचा भगवा ध्वज आणि माकपचे लाल झेंडे एकत्रच या मोर्च्या च्या निमित्ताने एकत्रित दिसत आहेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला प्रवशांना ऑटोग्राफ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई रेल्वे ने दादर ते चर्चगेट प्रवास करणार आये
यावेळी त्यांना भेटण्यासाठी प्रवशांची गर्दी झाली
एका प्रवशाला राज ठाकरे यांनी रेल्वे तिकिटावर ऑटोग्राफ दिला आहे
हा ऑटोग्राफ फ्रेम करून ठेवणार असे प्रवशाने सांगितले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दादर ते चर्चगेट लोकलने प्रवास करणार आहे. त्यापार्श्वभुमीवर चर्चगेट स्टेशनवर सुरक्षा वाढवण्यात आली
महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभाराविरोधात मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला आहे. मनसे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी निवडणूक आयोगाला ठाम इशारा देत म्हटले, 'हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय लालसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे या मोर्चाला किंवा आम्ही मांडलेल्या कुठल्याही प्रश्नांना कृपया हलक्यात घेऊ नका'. मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) मोठा गोंधळ असल्याचा आरोप करत, जोपर्यंत याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आयोगाचे अधिकारी प्रश्नांना उत्तरे देत नसल्याचा आणि गोंधळलेले असल्याचा दावाही अभ्यंकर यांनी केला. हा मोर्चा म्हणजे शेवट नसून सुरुवात आहे आणि गरज पडल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कसा असेल मोर्चाचा मार्ग?
दुपारी एक वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल.
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.
ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात शेकाप जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.
राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात हा मोर्चा असणार आहे... मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येतोय.
राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार.
या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या सर्व पक्षांची मिळून अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
पोलिसांनी कारवाई केली तर आम्ही सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. परवनागी नसली तर मोर्चा होणार असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं. पोलिसांसोबत आमची बैठक झाली होती तेव्हा पोलीस सकारात्मक होते. अद्याप परवानगी नाही, पण कारवाईला झाली तर समोर जायला तयार आहोत, असं बाळा नांदगावकरांनी सांगितले. राज ठाकरे ट्रेनने प्रवास करतील. पाऊस असला तरी मोर्चा तसाच होणार असून शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ यांची भाषणं होतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
मोर्चात कोण कोण उपस्थित राहणार? पाहा यादी-
शरद पवार, राष्ट्रवादी(शप)
उद्धव ठाकरे, शिवसेना(उबाठा)
राज ठाकरे, मनसे
विजय वडेट्टीवार,काँग्रेस
बाळासाहेब थोरात,काँग्रेस
सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी(शप)
जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी(शप)
जयंत पाटील,राष्ट्रवादी(शप)
रोहित पवार,राष्ट्रवादी(शप)
शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी(शप)
आदित्य ठाकरे,शिवसेना(उबाठा)
बाळा नांदगावकर, मनसे
जयंत पाटील, शेकाप
प्रकाश रेड्डी, भाकप
अनिल परब,शिवसेना(उबाठा)
अनिल देसाई, शिवसेना(उबाठा)
अरविंद सावंत, शिवसेना(उबाठा)
राजन विचारे , शिवसेना(उबाठा)
सचिन अहिर , शिवसेना(उबाठा)
अंबादास दानवे, शिवसेना(उबाठा)
सुनील प्रभू, शिवसेना(उबाठा)
सुनील शिंदे, शिवसेना(उबाठा)
अविनाश अभ्यंकर, मनसे
नितीन सरदेसाई, मनसे
संदीप देशपांडे, मनसे
अविनाश जाधव,मनसे
नसीम खान, काँग्रेस
सचिन सावंत, काँग्रेस
अमीन पटेल, काँग्रेस
विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय?(What are the demands?)
1. मतदारयाद्या अद्ययावत करा
2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा
3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा
4. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा
मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका रस्ता बंद करण्यात आला आहे.
बॅरिगेटिंग करण्यात आला आहे आणि आता मनसैनिक शिवसैनिक जमायला सुद्धा सुरुवात झाली आहे.
पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त वाढवलेला आहे मुंबई पोलिसांसोबत दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात ठेवण्यात आला आहे...
माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न, गरीबाच्या मुलावर अन्याय करू नका
अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या वडिलांची प्रतिक्रिया
पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याच्या आरोपात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर सिकंदरचे वडील रशीद शेख एबीपी माझावर exclusive
‘’माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले आहे, कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात गोवलं आहे“
”मी आयुष्यभर हमाली करून कमवलेत, मीच हरामचा पैसा कमावला नाही तर माझा मुलगा हरामची कमाई कसा कमवेल“
”त्याला शेकडो गडा, गाड्या, सैन्यात नोकरीं मिळाली त्यामुळे त्याला कसलीच गरज नव्हती“
”हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे, तो हिंद केसरी स्पर्धेची तयारी करतोय, हिंद केसरी खेळू नये म्हणून केलंय की अन्य काही कारण आहे याची मला माहिती नाही“
”सिकंदर शेख याने पंजाबमध्ये देखील अनेक पैलवानांना धूळ चारली आहे, पंजाबमध्ये लोकं त्याच्या मोठं प्रेम करतात“
”त्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाब पोलिसांना आमची हात जोडून विनंती आहे माझ्या मुलावर अन्याय होऊ देऊ नका, त्याला सोडून देण्यात यावं“
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याचे वडील पैलवान रशीद शेख यांची प्रतिक्रिया
भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून भीषण अपघात , अपघातात दोन युवकांचा मृत्यू.
साखरखेर्डा बिबी मार्गावर उड्डाण पुलानजिक अपघात.
अपघातात आरिफ तांबोळी आणि अल्ताफ तांबोळी या युवकांचा मृत्यू.
लग्न समारंभ आटोपून घरी परतताना झालं अपघात.
अपघाताची भीषणता इतकी होती की दुचाकीचे अक्षरशः अनेक तुकडे झालेत.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पाच कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक मारीजुआना हे प्रतिबंधित ड्रग्स जप्त करण्यात आले....
कतार एअरवेजच्या दोहा - नागपूर फ्लाईट मधून आलेल्या एका प्रवाशाजवळ हे ड्रग्स आढळले...
डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच डीआरआय आणि कस्टम्सच्या विशेष इंटेलिजन्स व इन्वेस्टीगेटिव्ह ब्रांच ने संयुक्तरीत्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई केली...
आरोपी प्रवाशाने ड्रग्सची ही खेप थायलंडची राजधानी बँकॉक मधून घेतली होती.. त्यानंतर उजबेजिकस्थानची राजधानी ताश्कंद येथून दोहा आणि दोह्यातून नागपूर असा प्रवास केला होता...
हायड्रोपोनिक मारिजुआना हे ड्रग्स गांजा, चरस आणि भांग पेक्षा अधिक तीव्र असून मानवी मेंदूवर त्याचा तीव्रतेने परिणाम होतो...
हे ड्रग्स ईशान्य आशियाई देशात तयार केले जातात आणि रेव्ह पार्टीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो...
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाहीच..
निवडणूक आयोगाच्या विरोधात होणाऱ्या मोर्चला पोलिसानी दिली नाही परवानगी.
विनापरवानगी मोर्चा झाल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार.
मोर्चानंतर आयोजकांवर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता.
जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांना रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात आणले आहे. त्यांना कोणतीही गंभीर आरोग्याची समस्या नाही, असे कौटुंबिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन दिग्दर्शित "21" या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात ते अगस्त्य नंदांच्या आजोबांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट अरुण खेतरपाल यांच्या कथेवर आधारित आहे, ज्यांना 1971 च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. अगस्त्य नंद अरुण खेतरपाल यांची भूमिका साकारणार असून डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मतदार यादीतील संभाव्य दुबार नावे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून उपाय योजना सुरू
निवडणूक आयोगाचे सर्व जिल्ह्यातील निवडणूक विभागांना कारवाईचे आदेश
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी दुबार नावांचा घोळ मिटवण्यासाठी उपाययोजना
मतदार यादीत दुबार नाव असल्याची खातरजमा करून संबंधित मतदारांकडून कोणत्या ठिकाणी मतदार करणार याबाबत लिखित स्वरूपात पत्र घेण्याच्या सूचना
मतदाराने लिखित स्वरूपात न दिल्यास, मतदार यादीत दुबार मतदाराची नोंद करावी, मतदानासाठी आल्यावर इतर कोणत्या ठिकाणी मतदान केलं नाही असं हमीपत्र घेण्यात यावं
एका ठिकाणी मतदान केल्यावर दुसऱ्या ठिकाणी मतदान करता येणार नाही
ऑनलाइन मतदार यादीमध्ये याबाबत नोंद करण्याच्या ही सूचना
पवईत एन्काउंटर झालेल्या रोहित आर्या याच्या पार्थीवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले
अंत्यसंस्कारावेळी रोहित आर्याची पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि इतर 2 नातेवाईक उपस्थित होते
सायंकाळी मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन पार पडल्यानंतर पुण्यात रात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले
नातेवाईकांनी मात्र माध्यमांशी बोलण्याचा नाकार दिला.
बुलढाणा : चक्क अंगणवाडी शेजारी स्मशानभूमी.....! ऐकून नवल वाटलं असेल, मात्र हा प्रकार आहे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावात चक्क अंगणवाडी इमारतीच्या लगतच नवीन स्मशानभूमी बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावात मृत्यू झाल्यास याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि आतां भीतीमुळे मात्र या अंगणवाडीत आता मुलेच येत नाहीत आणि त्यामुळे ही अंगणवाडी आता बंदच आहे...त्यामुळे अंगणवाडीत स्मशानभूमी की स्मशानभुमित अंगणवाडी...? असा सवाल गावातील नागरिकांना पडला आहे. या इमारतीत चक्क एका खाजगी व्यक्तीने बस्तान बसवलं असून आतातरी प्रशासन याकडे लक्ष देईल का...? असा प्रश्न गावकरी विचारतायत.
मतदारयाद्या अद्ययावत करा
मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा
मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा
सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा
दुपारी एक वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल.
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.
ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात शेकाप जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.
राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात हा मोर्चा असणार आहे... मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येतोय.
राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार.
या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या सर्व पक्षांची मिळून अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसचे प्रमुख नेते सत्याच्या मोर्चात सहभागी; सभास्थळी हजारोंची गर्दी, आतापर्यंत काय काय घडलं?, सर्व अपडेट्स