- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, सरकारच्या निर्णयांकडे लक्ष
Maharashtra live blog updates in Marathi:महाराष्ट्र, देश-विदेशातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra live blog updates in Marathi: बीडमधील धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्या भेट झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत कोणते निर्णय होतात हे पाहावे लागेल. ...More
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग
राज्य निवडणूक आयुक्त यांच्या नावाची आज होणार शिफारस
मंत्रीपरिषदेच्या बैठकीत चर्चा करुन शिफारस केली जाणार
गेली अनेक दिवसांपासून हे पद रिक्त आहे
एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता
त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या नावाची आज शिफारस केली जाणार
पोलिस उपायुक्त दिक्षीत गेेडाम यांची माहिती
सैफच्या घरी चोरीचा आरोपीचा प्रयत्न होता
पोलिसाची विविध पथकं काम करत आहेत
शिड्यांचा वापर करून सैफच्या घरात आरोपी शिरला
आरोपीची ओळखही पटल्याची सूत्रांची ाहिती
आरोपी १२ माळे चढून घरात शिरला
सैफ अली खान प्रकरणात पोलिस तपास करतायत.लवकरच सत्य बाहेर येईल.
पण लगेच शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखाड्यात उतरण्याची गरज नाही.
प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते याचं भान संजय राऊतांना नसेल पण पवारांसारख्या जेष्ठ नेत्याला असायला हवं, असं प्रविण दरेकर म्हणालेत.
धनंजय मुंडे देवदर्शनासाठी परळी वैजनाथ मंदिरात दाखल होणार आहेत.
मस्साजोग प्रकरणानंतर ते परळीत भेटीगाठी घेतील
इनोव्हेशन सिटी महाराष्ट्र मध्ये तयार करू, गिफ्ट सिटी तयार झाली तशी सर्व प्रकारें उपयुक्त इनोवेशन सिटी तयार करणार आहोत, अतिशय वेगाने आम्ही काम करू असं मुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नवीन स्टार्ट अप धोरणचा मसुदा सगळ्यासाठी तयार केला आहे त्यावर तुमचे सूचना द्याव्यात पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्र सगळ्यात आधुनिक स्टार्टअप पॉलिसी तयार करेल
नवीन संकल्पना या राउंड टेबल मधून समोर येताय आणि त्या आर्टिफिशिंयल इंटेजन्स च्या अवतीभवतीच्या आहे. टेक्नॉलॉजीला घाबरू नका, टेक्नॉलॉजीला घोडा समजून त्यावर स्वार व्हा टेक्नॉलॉजीला चा अवलंब कामात करा ते काम सरकार सध्या सरकार करताय
खाजगी विद्यापीठ हे भविष्यातील हे यासाठी एक मोठे केंद्र होण्याची त्यांची क्षमता आहे
AI पॉवर स्टार्ट अप हब महाराष्ट्र मध्ये तयार करायचा आहे
सैफ अली खान
मुंबई पोलिस लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार
पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की पथक हे प्रकरण सोडवण्याच्या अगदी जवळ आहे.
दुपारी, प्रकरण सोडवण्याबाबत अपडेट देण्यासाठी माध्यमांना एक निवेदन जारी केले जाईल.
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर चेक नाका जवळ मध्यरात्री कार आणि डंपर चा मोठा अपघात झाला,
डंपर आणि कार चा अपघात होऊन दोन्ही गाड्यांमध्ये मोठी आग लागली,
या आगीत कारचालकाचं आगीत होरपळून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाली. तर डंपर चालक सुखरूप बाहेर निघून फरार झाला आहे..
रात्री 2:30 च्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर जवळ ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल अर्धा तासांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवले होते,
हा अपघात कसा झाला यासंदर्भात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास करत आहेत....
नाशिकमधील गंगापूर सह वेगवेगळ्या प्रकल्पाच्या पाणी वितरण बाबतीत राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली
काही कालवा प्रकल्प जुने झाले आहेत, पाण्याची गळती होत आहे
जलसंपदाच्या माध्यमातून पाईपलाईन ने शहरांना पाणी पुरवठा केला तर पाण्याची बचत होईल, शेतीला पाणी पुरवठा देता यईल, या संदर्भात सर्व्हे करून पाणी देता यईल का याचा विचार केला जातोय
-
*पाण्याची उधळपट्टी करायची आणि सिंचनाचे पाणी कमी केलेले चालणार नाही
-झेडपी ceo का गैरहजर राहिले माहिती नाही, त्याच्यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गैरहजर ceo कारणे दाखवा नोटीस बाजवली जाणार
मुंबई मनपाची पवई येथील मराठी शाळा दुर्गा देवी मनपा मराठी शाळा अचानक बंद करण्याचे नोटीस आले आणि पालकांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला आहे.
या शाळेत २६० विद्यार्थी बालवाडी ते आठवी शिक्षण घेत आहे.मात्र इथे रस्त्याचे काम सुरू असताना एका वर्गाच्या भिंतीला जेसीबी चा धक्का लागला आणि भिंतीचा काही भाग खचला.
बैठ्या स्थिती मध्ये असलेल्या या शाळेचा एक वर्ग बंद करण्याऐवजी ही संपूर्ण शाळा धोकादायक झाली असल्याचा ठपका ठेवत ही शाळा बंद करून दोन किमी लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचे आदेश दिले.
ही शाळा चांदिवली च्या मध्यावर मोक्याच्या ठिकाणी असल्याने हे आजूबाजूच्या विकासकांचे षडयंत्र असल्याचा संशय आहे.मात्र बाजूच्या झोपडपट्ट्या मध्ये घरकाम करणाऱ्या लोकांची ही मुले असल्याने इतक्या दूर ते शिकायला पाठवणार नाही आणि मुल शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती आहे.
या मुळे ही शाळा इथेच सुरू राहावी म्हणून आज या शाळेसमोर पालक आणि विद्यार्थी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत निदर्शने केली ही मराठी पालिकेची शाळा वाचविण्याची विनंती केली जात आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी खेड्यापाड्यात कुपोषित बालकांची संख्या नेहमीच चर्चेत राहिली आहे.पण भिवंडी या कामगार वस्तीच्या शहरातील झोपडपट्टी परिसरात सुध्दा मोठ्या संख्येने कुपोषित बालक आढळत असून मागील वर्षभरात 80 माध्यम कुपोषित बालक आढळून आली आहेत.या बालकांवर स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार केले गेले आहेत.विशेष म्हणजे ही सर्व माध्यम कुपोषित बालके भिवंडी शहर क्षेत्रातील आहेत.
कुपोषित बालकांमध्ये माध्यम व तीव्र कुपोषित असे दोन प्रकार आढळतात परंतु सुदैव म्हणजे भिवंडी शहरात आढळलेली ही सर्व बालके माध्यम कुपोषित असून रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ माधवी पंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात 14 दिवस थांबवून उपचार केले जातात.कुपोषित बालकांवरील उपचारासाठी दहा बेड असलेले सुसज्ज पोषण पुनर्वसन केंद्र असून महिन्याला साधारण 7 ते 8 बालक या केंद्रात दाखल होतात.
नागपूरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेष्ठ शिवसैनिक संजय राऊत यांच्यावर नाराज
नागपूर मध्ये येऊन स्वबळाचा नारा देणाऱ्या संजय राऊत यांना जिल्हाप्रमुखांचा सवाल पक्ष उद्धव साहेब चालवतात की संजय राऊत चालवतात? जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांचा सवाल
नागपूरातील जुन्या शिवसैनीकांशी चर्चा, बैठक न करता संजय राऊत यांची स्वबळाची घोषणा का केली?
बाहेर पाच पक्ष फिरून आलेल्यांना सोबत घेवून महानगरपालिका निवडूक लढली तरी पक्षाला यश मिळणार का?
निर्णय समन्वयाने घ्यायला हवे, स्वबळापेक्षा महाविकास आघाडीसोबत लढण्यावर नागपूरच्या शिवसानिकांचा कल ...
सैफ अली खान शस्त्रक्रियेतून बाहेर आला आहे आणि धोक्याबाहेर आहे. तो सध्या बरा आहे आणि डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस घटनेची चौकशी करत आहेत.
आम्ही डॉ. निरज उत्तमणी, डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि लीलावती रुग्णालयातील टीमचे आभार मानू इच्छितो.
या काळात त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि शुभचिंतकांनी प्रार्थना आणि विचार केल्याबद्दल त्यांचे आभार.
सैफ अली खानच्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी
मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम तपासात जुंपल्या
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक देखील करत आहेत तपास
वांद्रे पोलीस स्टेशनने हल्लेखोरांच्या शोधासाठी याआधीच केल्या आहेत सात टीम्स
हल्लेखोरांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीम
बारामतीच्या विकासाने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेही भारावल्या;
बारामतीत अजितदादांचे काम सकाळी ६ वाजता सुरू होते.. यामुळे प्रभावित..
अजितदादांकडून खूप काही शिकण्यासारखे बारामतीसारखाच विकास स्वतःच्या मतदारसंघात करण्याचा व्यक्त केला निर्धार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिस्तीसह वक्तशीरपणाचेही मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून तोंडभरून कौतुक
अजितदादाना माहितीय मी उशिरा उठतो, मात्र अजितदादानी मला रात्रीच सांगितलं एक दिवस तसदी घ्यावी लागेल, मात्र अजितदादा जिथे सांगतील तिथे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, आपण पहाटेचा शपथविधी पहायला असेल असा उल्लेख माणिकराव कोकाटे यांनी भाषणात करताच अजितदादानी डोक्याला हात लावत हसत अरे ती पहाट नव्हती आठ वाजले होते, मात्र लोकं पहाट म्हणतात असं प्रत्युत्तर माणिकराव कोकाटे यांनी दिलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या केल्याची घटना घडलीय. 19 वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्यांची अज्ञातांनी निघृण हत्या केली. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय आहे. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांची एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. संक्रांती रोजी रात्री मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी त्याच्या फ्लॅटवर जात त्याला गळा चिरून मारून टाकले. मंगळवारी रात्री 11:30 वाजता उस्मानपुऱ्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा
माजी उपसरपंचांची फॉर्च्युनर गाडीला काळ्या काचा असल्याने केली जप्त
गाडीवर २३ हजाराचा दंड वसूल केला
फर्ग्युसन रस्त्यावर गाडी फिरताना दिसली गाडी काळी आणि काचा पण काळ्या असल्याने सजग नागरिकाने अमितेश कुमार यांना वीडियो पाठवला
आयुक्तांनी गाडीचे चौकशीचे आदेश दिले चौकशी केली असता अमोल कारले यांच्या नावावर ही गाडी आहे
वारजे पोलिसांनी फॉर्च्युनर गाडी घेतली ताब्यात
ड्युटी संपवून घरी परतत असतांना घडली घटना..
नाशिकच्या येवला, मनमाड, नांदगाव येथे नायलॉन मांजाने नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच आज मनमाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या रेखा फडताळे या कॉन्स्टेबलचा नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याने यात त्या गंभीर जखमी झाल्या..येवला येथून बंदोबस्त ड्युटी करून त्या परत येत असताना ही घटना घडली.या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले..नायलॉन मांजा विक्री बाबत प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे..
पुण्यातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत
वाहतूक विभाग , पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले आदेश
राज्यांत नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.यामध्ये रायगड जिल्ह्यात सुध्दा नवीन विभाजन करून महाड हा नवीन जिल्हा स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या अंमलबजावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलय.शिवाय या जिल्ह्यांत दोन पालकमंत्री होतील का, अशी विचारणा केली असतां मंत्री भरत गोगावले यांनी दोन जिल्हे दोन पालकमंत्री होणार मात्र यावर निर्णय होण्यास विलंब लागणार आहे.यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन करणार आहोत अस वक्तव्य सुध्दा केलंय.
सिने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी त्यांचा मुलगा जहांगीर याच्या बेडरूम मध्ये आज दिनांक 16.1.2024 रोजी पहाटे 02.00 वा. चे सुमारास एक अनोळखी इसम त्यांची घरकाम वाली बाई श्रीमती एरियामा फिलिप्स उर्फ लिमा यांना आढळून आला त्यामुळे त्यांनी आरडाओरड केला त्यावेळेस सिने अभिनेता सैफ अली खान हे पुढे आले तेव्हा सदर इसमाने त्यांच्यावर कोणत्यातरी टोकदार हत्याराने हल्ला केला त्यामध्ये ते जखमी झालेले असून त्यांच्या कामवाली बाई देखील जखमी आहेत, सैफ अली खान यांचे वर लीलावती हॉस्पिटल येथे विलाज चालू आहे घटनास्थळावर सर्व वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले असून आरोपी चा शोध घेणे चालू आहे फिर्याद नोंदवण्याचे काम चालू आहे.
रात्रपाळी पर्यवेक्षक अधिकारी बांद्रा
अजित पवार आणि शरद पवार थोड्याच वेळात एकाच मंचावर येणार
अजितदादा आणि शरद पवार यांची आसनव्यवस्था एकमेकांच्या शेजारी नाही
अजितदादा आणि शरद पवार यांच्या खुर्ची शेजारी अजित जावकर यांच्या खुर्चीची व्यवस्था
तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या खुर्चीत अंतर
त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार यांच्यात संवाद होणार का याकडे लक्ष?
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना
दापोलीत घडली घटना
अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक्कर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे
महाराष्ट्रामध्ये मुंबईत नाही पुण्यातही रोज हल्ले होतात. बीड जिल्ह्यात हल्ले होतात.गृहखात्याचे अपयश आहे. मुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे.*त्यांनी स्वत:कडे खातं ठेवलं. कायदा आणि सुव्यवस्था गृहमंत्री अबाधित ठेवली पाहिजे. असं खा सोनवणे अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर म्हणाले.
सोलापूर महापालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी गेल्यानंतर महेश कोठे यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने झाले होते निधन
मात्र लखनऊ मध्ये प्रचंड धुके असल्याने काल एअर ॲम्बुलन्स सोलापुरात पोहोचण्यास उशीर
बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान पुणे नाका येथील स्मशानभूमीत करण्यात आले अंत्यसंस्कार
महेश कोठे यांच्या अंत्ययात्रेमध्ये सोलापुरातील लोकप्रतिनिधीसह विविध क्षेत्रातील मान्यवर होते उपस्थित
महेश कोठे यांचे अचानक जाण्याने सोलापुरात मोठी हळहळ व्यक्त केली जातेय
पंचवटीतील गुरव आत्महत्येचे काेडं सुटणार; सुसाईड नाेटनुसार तपास सुरू...
बापाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न तर, मुलाचा धक्क्याने मृत्यू पोलिसांच्या तपासात माहिती उघड...*
- सुसाईड नाेटमध्ये नामाेल्लेख असलेल्या संशयितांवर लवकरच गुन्हा दाखल केला जाणार पोलिसांनी दिली माहिती...
- साेलापूर येथे गुंतवणूक केल्यानंतर त्यात वारंवार अडचणी येत असल्याने प्रशांत हे होते तणावात...
- गुरव प्रकरणांचा गांभीर्याने तपास सुरु करत जाबजबाब नाेंदविण्याची कार्यवाही सुरु - उपायुक्त प्रशांत बच्छाव.
बारामतीत एक तासाच्या कृषी प्रदर्शन पाहणीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कुठे ही सवांद नाही
दोघे ही बहीण भाऊ वेगवेगळ्या गाडीतून करत आहेत पाहणी
अजित पवार पंकजा मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांची एकत्रित पाहणी
बारामतीत एक तासाच्या कृषी प्रदर्शन पाहणीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कुठे ही सवांद नाही
दोघे ही बहीण भाऊ वेगवेगळ्या गाडीतून करत आहेत पाहणी
अजित पवार पंकजा मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांची एकत्रित पाहणी
नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत संपली
- जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने आजपासून प्रशासक ...
* जिल्हा परिषदेवर आज पासून प्रशासक राज
- जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सह सर्व सभापतींच्या कार्यकाळ संपला....
- नंदुरबार जिल्हा परिषद सोबतच जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या देखील कार्यकाळ संपला.....
- जिल्हा परिषदेचे कार्यकाळ संपला असल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे......
- जिल्हा परिषदेची निवडणूक लवकर घ्यावी लोकप्रतिनिधी यांची अपेक्षा.....
पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेले जिथे त्यांची चौकशी केली जाईल.
- स्टेट बँक ऑफ इंडियाची गेल्या तीन वर्षात 15 कोटींनी फसवणूक
- माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीत धक्कादायक वास्तव समोर
- 1 जानेवारी 2022 ते 31 नंबर 2024 या कालावधीत 31 हजार 237 प्रकरणांमध्ये पंधरा हजार 191.72 कोटी रुपयांची झाली फसवणूक
- एकूण फसवणुकीमध्ये 22,473 प्रकरणे सायबर फसवणुकीशी संबंधित असून यात 163.46 कोटी रुपयांची फसवणूक झाली
- इतर संवर्गातील फसवणुकीच्या 8,764 प्रकरणांमध्ये पंधरा हजार 28.26 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे माहिती अधिकारातून पुढे
- ऑटोमॅटिक विड्रॉल आणि डिजिटल बँकिंग खात्यातील फसवणुकीची माहिती उपलब्ध नसल्याचे बँकेचे उत्तर
महाड पोलादपूर मतदार संघाचे आमदार आणि नवनिर्वाचित मंत्री झालेले भरत गोगावले यांचा रायगड जिल्ह्यातील पहिला भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा महाड तालुक्यातील लोअर तुडिल या गावात कऱण्यात आला.यावेळी त्यांनी मी महाराष्ट्राचा मंत्री झालो असलो तरी आमदार ते नामदार करणाऱ्या माझ्या मतदार संघातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथम कटिबद्ध असेन.शिवाय महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम करत असताना पहिलं प्राधान्य माझ्या मतदार संघाला देईन असं रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी या नागरी सोहळा सत्कार समारंभात केलं.या नागरी सोहळ्याला हजारो बांधव उपस्थीत होते. यावेळी लाडक्या बहिणींची पेन्शन बंद होऊ देणार नसल्याचंही ते म्हणालेत.
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं शहरात बंदी घालणं शक्य आहे का?, हायकोर्टाचा सवाल
वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबईसह मुंबई महानगरप्रदेशात (एमएमआर) वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपारीक इंधनाऐवजी ईव्ही आणि सीएनजीच्या वापरावर भर देण्याचे संकेत
तसेत हा तोडगा व्यवहार्य आहे की नाही?, याचा अभ्यास करण्यासाठी 15 दिवसांत तज्ज्ञ, महापालिका आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले
सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती सूत्रांची माहिती
वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला
अज्ञाताने चाकू हल्ला केल्याची माहिती
सैफ अली खान लीलावती रुग्णालयात भरती
वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल
बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काका पुतण्या एकत्र येणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुंबईतील टोरेस घोटाळ्यात आतापर्यंत 57 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे.
महायुतीतील गोष्टी बाहेर जाऊ देऊ नका, असा सल्ला नरेंद्र मोदी यांनी काल महायुतीच्या आमदारांना दिल्या.
ST चालक आणि वाहक यांची गोपनियतेने तपासणी होणार
अल्कोटेस्ट या यंत्राद्वारे केली जाणार टेस्ट
विभागातील सर्व मार्गावर तपासणी पथके, वाहतूक निरीक्षक, चालक प्रशिक्षण, सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षकांनी तपासणी करण्याच्या सूचना
वाहतूक नियंत्रकांनी लाॅगशिटची नोंद करताना मद्यपान केलेले नाही याची खातर जमा करावी
राज्य परिवहन ST विभागाकडून विशेष पथक तैनात
एकाच परवान्यावर एकापेक्षा अधिकजण व्यवसाय करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय
गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांकडून 8 हजार 813 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
अनधिकृत फेरीवाल्यांवरील मुद्यावर राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशीच, हायकोर्टाची नाराजी
बेकायदेशीर फेरीवाल्यांना वीज जोडणी कशी मिळते?, हायकोर्टाचा सवाल
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, सरकारच्या निर्णयांकडे लक्ष