Maharashtra Live Blog Updates: बीडमधील राड्यानंतर लक्ष्मण हाके गेवराई पोलिसांना शरण जाणार?

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

मुकेश चव्हाण Last Updated: 26 Aug 2025 04:22 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मागण्या का मान्य नाही?...More

लक्ष्मण हाके यांना गेवराईत येण्यापासून पोलिसांनी रोखलं

बीड :  जिल्ह्यात लागू जमाबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना गेवराई तालुक्यातील नागझरी गावाजवळ पोलिसांनी अडवलं. काल गेवराईत झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी हाके यांना नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी ते गेवराईकडे निघाले होते. मात्र, कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना थांबवण्यात आलं असून, सध्या जालन्यातील वडीगोद्री येथे पोलीस आणि हाके यांच्यात चर्चा सुरू आहे. पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.