Maharashtra Live Blog Updates: मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेना जागावाटप अंतिम टप्प्यात; आज होणार महायुतीची चर्चेची तिसरी फेरी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी (Municipal Corporation Election 2025) राजकीय वातावरण तापलंय. 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची...More
भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सर्व निवडणूक अधिकारी कार्यालयात सुरवात झाली असून यासाठी सात निवडणूक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाच इमारतींमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. तर पालिका मुख्यालय इमारतीमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.जेथून उमेदवारांना सर्व परवानग्या दिल्या जाणार आहेत.
मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेना जागावाटप अंतिम टप्प्यात
आज होणार महायुतीची चर्चेची तिसरी फेरी
आतापर्यंत जवळपास १८० जागांवर एकमत
आज आणखी ३०-४० जागांवरील पेच सुटण्याची शक्यता
दरम्यान, उर्वरित जागांसंदर्भात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार
२०१७ साली धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या मात्र निसटत्या फरकाने जिंकलेल्या जागांवर भाजपचा दावा अजूनही कायम
सोबतच, २०१७ साली दुसऱ्या क्रमांकावर भाजप असलेल्या जागांवर देखील भाजपचा दावा कायम
विश्वसनीय सूत्रांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या पत्नी पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीने व त्यांच्या बंधूंनी आज पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी वैद्यनाथाला महाआरती देखील केली. तब्बल वीस मिनिटं वैद्यनाथ चरणी त्या लीन झालेल्या दिसून आल्या.
सातारा: फलटण येथील यशवंत सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई
यशवंत बँकेचा 112 कोटींचा घोटाळा प्रकरणात फलटण येथील बँकेत Ed च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
आज सकाळी कराड आणि फलटण बँकेत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
फलटण, कराड, पुणे या ठिकाणी एकाच वेळी Ed अधिकाऱ्यांकडून चौकशी..
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज न्यायालयात काय झाले?
- हायकोर्टातले अर्ज निकाली निघालेले आहेत- सरकारी पक्ष
- चार नंबरचा आरोपी प्रतीक घुलेने आज ॲड.बारगजे हे स्वतंत्र वकील दिले.
- आरोप निश्चितीकडे जाण्यापूर्वी ॲडिशनल एव्हिडन्स आम्हाला मिळालेला नाही तो देण्यात यावा - आरोपीचे वकील.
- फॉरेन्सिककडे दिलेल्या लॅपटॉप मधील कॉपी आम्हाला मिळालेली नाही. जोपर्यंत कॉपी मिळत नाही तोपर्यंत पुरावा ACCEPT करता येणार नाही - आरोपीचे वकील
- कॉपीज दिल्या जात नाहीत तोपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये-आरोपीचे वकील.
- चार्ज फ्रेम अगोदर आम्हाला त्याच्या प्रति देण्यात याव्यात-आरोपीचे वकील.
- लॅपटॉप फॉरेन्सिककडे आहे-विशेष सरकारी वकील उज्वल निकम.
- खाजगी पुरावे आहेत त्याचा गैरवापर होईल आम्ही एवढा मोठा डेटा देऊ शकत नाही-तपासी अधिकारी
- तुमच्याकडे आल्यानंतर तात्काळ आरोपीच्या वकिलांना पूर्तता करावी- कोर्ट.
- पुरावा मिळाल्यानंतर तात्काळ दिले जातील-सरकारी पक्ष
- मला पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे हे पाहू द्या.. मला काही दिवसांचा वेळ द्या-आरोपी प्रतीक घुलेचे नवे वकील.
- याला बराच कालावधी गेलेला आहे हे असं व्हायला नको.. वारंवार वकील बदलून तेच ते कारण दिले जात आहे- कोर्टाने नाराजी व्यक्त केली.
- न्यायालयाला विनंती आहे मला एक दिवसाचा तरी वेळ द्यावा-प्रतीक घुले चे वकील.
- आज दिवसभरात तुम्ही पाहून घ्या-कोर्ट.
- सगळ्या आरोपींना आत्ताच विचारणा केली जात आहे.. कोणाला वकील बदलायचे आहेत का-?- कोर्ट.
- सगळ्या आरोपींचे वेगवेगळे वकील असतील - आरोपी वाल्मीक कराड याचे उत्तर
- हो आम्हाला वकील बदलायचे आहेत-सर्व आरोपींनी वकील बदलण्यासंदर्भात दिले उत्तर.
कोल्हापूरात खाजगी बस वर दरोडा
एक कोटींचे दागिने लंपास
चाकूचा कोयत्याचा धाक दाखवून लुटले दागिने
सात ते आठ जनानी सोने चांदीचे दागिने लुटले
किणी टोल नाका जवळ घडला प्रकार
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज अकोल्यात आहेत. आज महापालिकेच्या तिकीट इच्छुकांनी प्रकाश आंबेडकरांच्या कृषीनगरमधील 'यशवंत भवन' या घरी मोठी गर्दी केलीय. या सर्वांनी तिकिटासाठी प्रकाश आंबेडकरांना गळ घातलीय. अकोला महापालिकेत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचे तयारीत आहेय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इच्छूकांनी प्रकाश आंबेडकरांना भेटण्यासाठी गर्दी केलीय. याआधी 80 जागांसाठी जवळपास 200 च्या वर लोकांनी पक्षाकडे मुलाखती दिल्यायेत. शहरातील मुस्लिम आणि दलित बहुल भागात वंचितच्या तिकिटासाठी मोठी स्पर्धा आहेय.
चांदूर रेल्वेतील दाळीची कंपनी मीरा इंडस्ट्रीज येथे भीषण आग
लाखो रुपयांचे नुकसान, 5 अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या मीरा इंडस्ट्रीज येथे आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अचानक आग लागून संपूर्ण कंपनी खाक झाली आहे..
आग विझवण्यासाठी चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा आणि अमरावती येथील अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले असून आग विजविण्याची शर्तीचे प्रयत्न अजूनही सुरू आहे...
या आगीमध्ये कंपनीतील चना, डाळ, बारदाना, मशीनरी ह्या जळाल्या आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून सदर नुकसानीचा आकडा करोड रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविला जात आहे...
शॉर्टसर्किटने आग लागल्याची चर्चा सुरू असून याची अधिकृत माहिती मिळू शकले नाही
पुण्यात भाजपाचा ठाकरे गटाला धक्का
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांचा भाजपमध्ये होणार प्रवेश
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय भोसले यांचाही पक्ष प्रवेश
Pune Crime : वाघोलीत कॉलेजबाहेर गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाघोलीतील बीजेएस कॉलेजच्या बाहेर चार जणांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, बीजेएस कॉलेज परिसरात यापूर्वीही हाणामाऱ्या आणि गुंडगिरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. याबाबत नागरिकांनी वाघोली पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे असामाजिक घटकांचे धाडस वाढत असल्याची नाराजीही व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच कॉलेज परिसरात नियमित पोलीस गस्त आणि कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ढोलक्याची वाडी गावाच्या शिवारामध्ये आज भली मोठी मगर आढळून आलेली आहे गावाच्या शेत शिवारात असलेल्या एका उसाच्या फडामध्ये ही मगर नागरिकांना दिसून आलेली आहे त्यानंतर गावातील नागरिकांनी या मगरीला दोरी आणि इतर साहित्य सामग्रीच्या सहाय्याने पकडले असून ही मगर आता नागरिकांच्या कैद मध्ये आहे जवळच असलेल्या ईसापुर धरणातून किंवा या धरणाच्या कालव्यातून ही मगर बाहेर आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय या मगरीने आतापर्यंत एकाही व्यक्तीवर हल्ला किंवा तसा प्रयत्न केलेला नाही परंतु पहिल्यांदाच मगर आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये काहीसं भीतीदायक आणि कुतूहल निर्माण झालेला आहे दरम्यान वन विभागाच्या वतीने या मगरीला पकडून नेण्यासाठी वन विभागाचे टीम दाखल झाली असून वन विभागाच्या वतीने या मगरीला पकडून नेत तिला पाण्यामध्ये सोडण्यासाठी घेऊन गेले आहेत
बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयातील तरुणाला बेदम मारहाण, रॅगिंगच्या प्रकारातून मारहाण झाल्याचा आरोप
11 वीच्या विद्यार्थ्याला स्टम्पने इतर चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये घुसून जबरी मारहाण केलीय
प्रसिक बनसोडे असे पिडीत विद्यार्थ्याचे नाव असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे
तब्बल तीन तास मारहाण केल्याचा पिडीत विद्यार्थ्याचा आरोप
रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचा पीडित मुलाचा आरोप
दरम्यान महाविदयालयात या आधी देखील असा प्रकार घडलेला असताना महाविद्यालय दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा विद्यार्थ्याचा आरोप
मारहाण झालेल्या जखमी विद्यार्थ्यावर धाराशिव येथील शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत
मारहाणीनंतर भीतीपोटी शाळेत न जाण्याच्या प्रसिक म्हणाला
दारूच्या नशेत मारहाण केल्याचाही आरोप
Mahayuti Seat Sharing : शिवसेना मुंबई महापालिका निवडणूकीत 50% जागावाटपावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 227 वॅार्ड पैकी 112 वॅार्डसाठी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे. काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याची माहिती आहे. तसेच, शिवसेना भाजप यांच्यातील जागा वाटप हे अंतिम टप्यात असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित युती आणि जागा वाटपाची घोषण़ा होईल, अशी देखील माहिती आहे.
शरद पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा धक्का
विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे करणार आज भाजपमध्ये प्रवेश
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
कलाटे यांनी २०२४ मध्ये शंकर जगताप याविरुद्ध लढवली होती निवडणूक
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि महापालिका गटनेते म्हणून कलाटे यांची ओळख
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची दुपारी १२ वाजता बैठक
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार
उद्धव ठाकरेंच्या वतीने आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन आपला निर्णय ठाकरेंना आजच पक्षाच्या वतीने कळविण्यात येणार
अद्याप दोन्ही पक्षात बोलणी सुरू असून चर्चेतून योग्य मार्ग निघेल असा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विश्वास
प्रशांत जगताप यांचा मोठा निर्णय
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मी पक्षातून बाहेर पडतो
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशांत जगताप यांनी भूमिका मांडली
कार्यकर्त्यांच मरण होतं असेल तर मी पक्षातून बाहेर पडतो
प्रशांत जगताप यांची भूमिका
मूलभूत सुविधांमध्ये आज विज ही अत्यावश्यक सुविधा बनली आहे. विजेविना जगणे कल्पनाही करवत नाही. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील तुमरकोटी गावच्या नागरिकांना स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही विजेविनाच जगावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, 25 वर्षांपूर्वी या गावांमध्ये विजेसाठी खांब उभे करण्यात आले आणि येथील चार नागरिकांना वीज कनेक्शन ही देण्यात आले. मात्र वीज पुरवठाचं सुरू झालं नाही. तरीसुद्धा येथील नागरिकांना विज बिल येत आहे. गावातील अनेक नागरिकांकडे मोबाईल आहेत. मात्र चार्जिंगसाठी वीज नाही. पहाडाच्या कुशीत वसलेले या गावातील नागरिकांना दिव्याच्या उजेडाखाली रात्र काढावी लागत आहे.
मूलभूत सुविधांमध्ये आज विज ही अत्यावश्यक सुविधा बनली आहे. विजेविना जगणे कल्पनाही करवत नाही. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील तुमरकोटी गावच्या नागरिकांना स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही विजेविनाच जगावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, 25 वर्षांपूर्वी या गावांमध्ये विजेसाठी खांब उभे करण्यात आले आणि येथील चार नागरिकांना वीज कनेक्शन ही देण्यात आले. मात्र वीज पुरवठाचं सुरू झालं नाही. तरीसुद्धा येथील नागरिकांना विज बिल येत आहे. गावातील अनेक नागरिकांकडे मोबाईल आहेत. मात्र चार्जिंगसाठी वीज नाही. पहाडाच्या कुशीत वसलेले या गावातील नागरिकांना दिव्याच्या उजेडाखाली रात्र काढावी लागत आहे.
सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवारांच्या भेटीला
सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढावं कार्यकर्त्यांचं म्हणणं
सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता
उमेश पाटील अजित पवारांची भेट घेत सोलापूर महानगरपालिके विषयी चर्चा सुरू
उमेश पाटील यांच्यावर सोलापूर ग्रामीणची जबाबदारी आहे.
सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया पुण्याला रवाना
पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटणार
अंजली दमानिया यांनी नवीन पुरावे मांडले होते
आता जर गुन्हा दाखल झाला नाही तर अंजली दमानिया कोर्टात धाव घेणार
धाराशिव नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येताच 117 कोटींच्या विकास कामाची स्थगिती उठली
नगर परिषदेत भाजपने मिळविलेल्या घवघवीत यशानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य शासनाने उठवली स्थगिती
५९ रस्त्यांची आणि नाल्यांची कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार
भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची माहिती
आज पासूनच होणार शहरातील विकास कामांना सुरुवात
शहरातील रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या धाराशिवरांना अखेर दिलासा
नगर परिषदेत भाजपची सत्ता येतात स्थगिती उठवल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
2014 नंतर सलग प्रत्येक निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसने नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राज्यात नगराध्यक्ष पदाच्या 43 जागी तर नगरसेवक पदाच्या 1006 ठिकाणी यश संपादन करून काहीशी पराभवाची मालिका खंडित केलेली दिसत आहे... नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवलेली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रवासासाठी कुठलेही हेलिकॉप्टर न वापरता राज्यात जवळपास 64 सभा व 22 बैठका घेतल्याचा दावा केला आहे... अनेक ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर तर काही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार दिले होते. यात काँग्रेसला विदर्भात सर्वात जास्त म्हणजे 23 जागी यश मिळालं आहे. हे यश कमी नसून काँग्रेसला मिळालेल यश हे वाखानण्याजोग आहे असं हर्षवर्धन सपकाळंनी मानत असताना त्यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. शिवाय त्यांनी असंही म्हटलं आहे की, " हार कर भी जो जीता है उसे बाजीगर कहते है....!" भाजप शिंदे सेना आणि अजित पवार ज्या पद्धतीने सत्ता मिळवत आहेत, आम्हाला त्या पद्धतीने सत्ता मिळवायची नसून सत्याच्या आणि जनतेच्या मनातील सत्ता मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाय आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिकेतही अशाच प्रकारे सत्याच्या मार्गाने आम्ही जाऊ व "बचेंगे तो और भी लढेंगे...!" असही त्यांनी सूचक विधान केलेल आहे.
मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी हे उद्या उच्च न्यायालयात राहणार हजर
मुंबईतील खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तेवरून मुंबई उच्च न्यायालयाने सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली आहे
मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून पालिका आयुक्तांना समन्स देण्यात आले आहेत
खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने हे समन्स बजावले आहे
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांना सुनवणीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेल आहे
उद्या पालिका आयुक्त भूषण गगराणी हे उच्च न्यायालयात हजर राहणार आहे
न्यायालयाने बजावलेल्या समन्स संदर्भात पालिका आपली बाजू उद्या उच्च न्यायालयात मांडेल
Sangli Crime : सांगली शहरातील कुपवाड भागातील सूतगिरणी परिसरात चिकन 65 चा खाद्यगाडा चालवणाऱ्या एकावर चौघा व्यक्तींनी रात्री साडे अकराच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडलीय. साजिद मुलाणी असे जखमी झालेल्याचे नाव असून यांच्या गाड्यावर रात्री चौघे जण आले व त्यांनी चिकन 65 मागितले. यावेळी आचारसंहिता लागू असून वेळ झाल्याने गाडा बंद करत असल्याचे सांगत पार्सल घेऊन जाण्याची सूचना साजिद मुलाणी यांनी केली. याचा राग आल्याने संबंधित चौघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हा प्रकार पाहताच परिसरातील संतप्त नागरिकांनी हस्तक्षेप करत त्या चौघांना पकडून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाणेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौघांनाही ताब्यात घेऊन जखमीला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहेत.
कामठी नगरपरिषद निकालाच्या विरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. कामठी मधून भाजपाचे निर्वाचित नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी शेवटच्या तीन फेऱ्यात आघाडी घेत निर्णय घेतला. मात्र काँग्रेसचे पराभूत उमेदवार शकूर नागरी यांनी शेवटल्या तीन फेऱ्यांची फेरमोजणीची मागणी केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली होती. या विरोधात काँग्रेस नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत आहे. अजय अग्रवाल हे कामठी मधून 103 मतांनी विजयी झाले आहे.
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या आडमुठेपणाचा भूमिकेमुळे नागपूर जिल्ह्यात 27 ठिकाणी झालेल्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असा आरोप केला जात आहे . त्यामुळे काँग्रेसला फक्त एका नगरपंचायत मध्ये विजय मिळवता आला . त्यामुळे सुनील केदार यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून केली जात आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लवकरच भेट घेऊन हि मागणी करणार असल्याचे केदार विरोधी गटाने सांगितले. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक काळात देखील हि मागणी करण्यात आली होती. मात्र तेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनील केदार यांना अभय दिले होत. मात्र केंद्रीय नेतृत्वाने सुनील केदार यांचे पक्ष शिस्तीच्या विरोधात जाऊन वागणे, पक्षाच्या प्रोटोकॉलला मोडून समांतर बैठका घेणे याची दखल घेतली होती. मात्र यावेळेला काँग्रेसचे नेतृत्व सुनील केदार यांच्या विरोधात काही निर्णय घेते का ? हे बघणे महत्वाचे राहणार आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेना जागावाटप अंतिम टप्प्यात; आज होणार महायुतीची चर्चेची तिसरी फेरी