Maharashtra Live Blog Updates: उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला; भाजप शिंदे गटाला सुरुंग लावत असल्याने नाराजी?

Maharashtra Live Blog Updates: मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली.

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 18 Nov 2025 03:05 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. आजपासून अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी...More

उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला; भाजप शिंदे गटाला सुरुंग लावत असल्याने नाराजी?

मुंबई: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे आकाराला येत असल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याची माहिती समोर आली आहे. याच अंतर्गत नाराजीमुळे शिंदे गटाच्या (Shivsena) मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याचे समजते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता मंत्री उदय सामंत हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.