Maharashtra Live Blog Updates: जिथे जिथे शक्य, त्या ठिकाणी महायुती करायची; देवेंद्र फडणवीसांची भूमिका

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 16 Nov 2025 03:54 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्विकारले जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 या...More

नागपूर-उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग; 45 प्रवासी थोडक्यात बचावले

नागपूर : VIT कॉलेज ते उकळवाही हेटी दरम्यान उमरेड-नागपूर रोडवर आज दुपारी एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याने मोठा अपघात टळला. बसमध्ये एकूण 45 प्रवाशी प्रवास करीत होते. सुदैवाने सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे समजते.


घटना दुपारी सुमारे २:३० वाजता घडली. VIT कॉलेजकडून उकळवाही हेटीकडे जाणाऱ्या या ट्रॅव्हल्समध्ये अचानक धूर दिसू लागला. चालकाने तातडीने बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढले. काही क्षणांतच बसने पेट घेतला. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मदत करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र बसचा मोठा भाग जळून खाक झाला.


पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, शॉर्ट सर्किटची कारणे तपासली जात आहेत. प्रवाशांमध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची अधिक माहिती मिळण्यासाठी कुही पोलिसांचा तपास सुरू आहे.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.