Maharashtra Guardian Ministers List: मंत्रिपदाची खुर्ची मिळण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रिपदासाठी (Maharashtra Guardian Ministers List) देखील पाहायला मिळतेय. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी तयार, कोण होईल याचा उलगडा दोन दिवसात होईल, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.
संभाव्य पालकमंत्र्यांच्या यादीत नागपूरचे पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे, तर ठाण्याचे एकनाथ शिंदे यांना मिळेल. सध्या सर्वांत जास्त चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांना दिले जाण्याची शक्यता आहे. तर पुण्याचे पालकमंत्रिपद देखील अजित पवारांना मिळेल.
महाराष्ट्राच्या संभाव्य पालकमंत्र्यांची यादी- (Maharashtra Guardian Ministers List)
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळेठाणे - एकनाथ शिंदेपुणे - अजित पवारबीड - अजित पवारसांगली - शंभूराज देसाईसातारा - शिवेंद्रराजे भोसलेछत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट / अतुल सावेजळगाव - गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहेयवतमाळ - संजय राठोडकोल्हापूर - हसन मुश्रीफअहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटीलअकोला - माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे. अमरावती - चंद्रकांत पाटीलभंडारा - राष्ट्रवादी बुलढाणा - आकाश फुंडकरचंद्रपूर - नरहरी झिरवळधाराशीव - धनंजय मुंडेधुळे - जयकुमार रावलगडचिरोली - भाजपगोंदिया - आदिती तटकरेहिंगोली - आशिष जैस्वाललातूर - गिरीष महाजनमुंबई शहर - प्रताप सरनाईकमुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढानांदेड - आशिष शेलारनंदुरबार - अशोक ऊईकेनाशिक - दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावापालघर - गणेश नाईकपरभणी - मेघना बोर्डीकररायगड - भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायमसिंधुदुर्ग- नितेश राणेरत्नागिरी - उदय सामंतसोलापूर - जयकुमार गोरेवर्धा - पंकज भोयरवाशिम - दत्तात्रय भरणेजालना - अतुल सावेलातूर - बाळासाहेब पाटील
भरत गोगावले रायगडेचे पालकमंत्री होणार; महेंद्र दळवींना विश्वास
सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून कोण पालकमंत्री होणार यावरून वादविवाद सुरू आहे. शिवसेनेचे आमदार आणि फडणवीस सरकार मध्ये यंदा मंत्रिपदाची पहिल्यांदा गळयात माळ पडलेले भरत गोगावले हे सुध्दा सुरुवातीपासून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कायम इच्छुक राहिलेत मात्र सुनील तटकरे यांचं केंद्रापर्यंत असलेलं वजन पाहता त्यांनी आदिती तटकरे यांच्या गळ्यात ठाकरे सरकार काळात पालकमंत्री पदाची माळ पाडून घेतली होती. त्यानंतर जिल्हयातील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी बंड पुकारला होता आणि त्यांच्या बंडाला यश देखील आले होते. आणि त्यानंतर रायगडचे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याच्या उमेदवार असलेले उदय सामंत यांच्या पदरी पडले होते.आता हीच वेळ सरकार मध्ये असुन सुध्दा गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यावर आली असली तरी गोगावले यांनाच वाढता पाठींबा मिळताना पहायला मिळतोय. कारण मंत्री झालेल्या भरत गोगावलेंच्या मदतीसाठी पुन्हा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी उडी घेतली आहे. अलिबाग मुरूड मतदार संघाचे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तर आता खुल चॅलेंज देऊन कोणी पालकमंत्री पदासाठी इच्छुक असेल तर त्यांनी ते प्रयत्न करू नये. कोणत्याही क्षणी भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.यामुळे राजकिय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.