Nashik News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या शिलापूर परिसरातील (सीपीआरआय) सेंट्रल पावर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅबचे आज उद्घाटन होत आहे. नाशिकमध्ये सुरु होणारी हि महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील तिसरी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आहे. या टेस्टिंग लॅबमुळे आगामी काळात नाशिकला इलेक्ट्रिक हब म्हणून चालना मिळणार आहे. दरम्यान या महत्वाकांक्षी टेस्टिंग लॅबवरून नाशिकमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगल्याचे बघायला मिळाले आहे. माजी खासदार हेंमत गोडसें आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात या श्रेयवाद सुरू असल्याचे बघायला मिळालेय. मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून टेस्टिंग लॅब सुरू झाल्याचा भुजबळ यांनी दावा केलाय.
महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये श्रेयवादाचे रंगले राजकारण
तर यावर बोलताना माजी खासदार हेंमत गोडसें यांनी शहरात होर्डिंग लावत याच श्रेय घेतल्याची चर्चा आहे. होर्डिंग्जच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नातून टेस्टिंग लॅब साकारण्यात आल्याचा गोडसें यांचा दावा आहे. शिवाय 2013 पासून आपण पाठपुरावा करत असल्याचा भुजबळ यांचा दावा असून 10 वर्षात आपणच पाठपुरावा केल्याचा गोडसें यांच म्हणणं आहे. यामुळे महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. परिणामी, भुजबळ आणि गोडसें यांच्यातील राजकिय वादाचा पुढचा अंक पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे.
नाशिकमध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब सुरू व्हावी अशी अनेक उद्योजकांची मागणी होती, माजी खासदार हेंमत गोडसें यांनी देखील टेस्टिंग लॅबसाठी पाठपुरवा केला आहे. मात्र भुजबळ यांनी केवळ माजी खासदार समीर भुजबळ याच्याकडे श्रेय घेतल्यानं हेंमत गोडसें नाराज झाले आहे. नाशिकमध्ये राज्यातील प्रथम इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचे आज उद्घाटन होत आहे. मात्र भुजबळ यांनी कोणताही प्रकल्प आला तर माझ्यामुळे आला ही भुजबळ यांची सवय आहे. आणि त्याच्याकडून काही होत नसेल तर ते अडचणी आणतात. ते कॅबिनेट मंत्री असताना त्यांना ती जागा घेता आली नाही. तर 100 एकर जागा टेस्टिंग लॅबला होती. त्याच्या बाजूला 50 एकर गायरान जागा त्यांना स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी घ्याची होती. भुजबळ यांची सवय आहे, ते कोणताही प्रकल्प आला तर त्याचे श्रेय घेतात, त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. अशी प्रतिक्रिया माजी खासदार हेंमत गोडसें यांनी दिली आहे.
काय आहे इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब?
- नाशिकच्या शिलापूर परिसरातील (सीपीआरआय) सेंट्रल पावर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅबचे आज उद्घाटन होणार - या टेस्टिंग लॅबमुळे आगामी काळात नाशिकला इलेक्ट्रिक हब म्हणून चालना मिळणार - महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील तिसऱ्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे आज उद्घाटन होणारे - या टेस्टिंग लॅबमुळे नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील उद्योगांना फायदा होणार- इलेक्ट्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे
- 216 कोटी रुपये खर्च करून 100 एकर क्षेत्रावर उभारण्यात आलाय प्रकल्प
- विद्युत उपकरणे निर्मिती आणि त्याच्या गुणवत्ता ची तपासणी करण्यासाठी टेस्टिंग लॅबचा उपयोग होणार आहे- या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यास चालना मिळणार असून जगाच्या विद्युत बाजार पेठेच्या नकाशावर नाशिकचे नाव ही समाविष्ट झाले आहे
- धार्मिक नगरी अशी ओळख असणाऱ्या नाशिकची आता एलट्रिकल हब अशी नवी ओळख निर्माण होण्यास आणि नाशिकच्या औद्योगिकीकरणला कलाटणी मिळण्यास देखील मदत होणार आहे.
आणखी वाचा