Prakash Surve : शब्द देऊन मंत्री पद न दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दहिसरमध्ये प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालय बाहेर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु आहे. याबाबत बोलताना प्रकाश सुर्वे म्हणाले की, मी नाराज नाही. पण दु:खी आहे. मला मंत्रिपद न मिळाल्याने माझी आई आजारी पडली आहे. कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते, मी त्यांना भेटायला आलो असल्याचे सुर्वे म्हणाले. 


मंत्रिपद मिळाले असते तर आणखी कामं केली असती


दरम्यान, मंत्रीपद न मिळाल्याचं दु:ख कायम आहे, पण काम करेन, महापालिकेत चांगले काम करेन असंही आमदार प्रकाश सुर्वे यावेळी म्हणाले. मंत्रिपद मिळाले असते तर आणखी कामं केली असती.खुद को कर बुलंद इतना की खुदा भी पूछे बंदे से बता तेरी रजा क्या हैं असे देखील सुर्वे यावेळी म्हणाले. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सुर्वे म्हणाले. दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या दुःखद असून त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार सुर्वे यांनी केली. 


संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजलाय


मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर देखील प्रकाश सुर्वे यांनी नागपूरमध्ये प्रतिक्रिया दिली होती.य त्यावेळी ते म्हणाले होते की, आता सरकार स्थापन झालं आहे. हे सरकारनं आता जोरानं काम करेल असे सुर्वे म्हणाले. मी एक सामान्य घरातील मुलगा आहे. संघर्ष करत इथपर्यंत आला आहे. जे मिळवलं ते संघर्ष करुन मिळवल्याचे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले. माझे वडील मिलमध्ये कामगार होते. मिल बंद पडली म्हणून आम्ही लालबागवरुन बोरवलीली शिफ्ट झालो. उदरनिर्वाहासाठी आईने आणि मी भाजीचा धंदा सुरु केला होता. भाजीचा धंदा कर शिक्षण पूर्ण केल्याचे प्रकाश सुर्वे म्हणाले. त्यामुळं संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजला असल्याचे प्रकशा सुर्वे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी माझा विचार केला देखील असेल पण मंत्रीपदे मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामध्ये आजी माजी आहेत. काही मात्तबारांची मुलं होती. काही मोठ्या घरची मुलं आहेत. मी साध्या गरीब घरातील मुलगा असल्याचे प्रकाश सुर्वे म्हणाले. माझ्या जीवनात संघर्षच असल्याचे सुर्वे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी विचार करुनच घेतला असले असे सुर्वे म्हणाले. मला संधी मिळाली असती तर मी संधीचं सोनं केलं असतं असेही सुर्वे म्हणाले होते.


महत्वाच्या बातम्या:


संघर्ष माझ्या पाचवीलाच, मंत्रीमंडळात संधी मिळाली असती तर सोनं केलं असतं, प्रकाश सुर्वेंना अश्रू अनावर