Maharashtra Breaking News LIVE: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jan 2025 10:56 AM
Sindhudurg Floating Jetty : मालवणमधील दांडी समुद्र किनाऱ्यावर राज्यातील पहिली तरंगती जेटी

Sindhudurg News : महाराष्ट्रातील पहिली तरंगती जेटी सिंधुदुर्गातील मालवणमधील दांडी समुद्र किनाऱ्यावर कार्यान्वित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग किल्ला दर्शन आणि स्कुबा डायव्हिंगसाठी ही नवीन तरंगती जेटी कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून महाराष्ट्रातील पहिली तरंगती जेटी कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे किल्यावर जाण्यासाठी मालवण बंदर वरून लागणारा वेळ कमी करण्यासाठी मदत होणार आहे. या नवीन तरंगती जेटी वरून 5 मिनिटात सिंधुदुर्ग किल्यावर जाता येणार आहे. तसेच, पर्यटन व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे, याबाबत माहिती बंदर विभागाचे अधिकारी अनंत गोसावी यांनी दिली आहे.

Sindhudurg Cashew : केंद्राच्या एक जिल्हा एक उत्पादनात सिंधुदुर्गचा काजू प्रक्रिया उ‌द्योगाचा समावेश

Sindhudurg News : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या केंद्र शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादनासाठी देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उ‌द्योगाचा समावेश करण्यात आला आहे. काजू आणि काजू उत्पादनाबाबत तसेच काजू प्रक्रियाबाबत "वेंगुर्ला काजू" यांस 2018  मध्ये जीआय मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72000 हेक्टर क्षेत्रामध्ये काजू लागवड आहे. देशामध्ये काजू प्रक्रियामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे. त्यामुळे केंद्राच्या एक जिल्हा एक उत्पादनात सिंधुदुर्गचा काजू प्रक्रिया उ‌द्योगाचा समावेश करण्यात आला आहे.

Wardha Accident : दुचाकीचा भीषण अपघात, माजी खासदार रामदास तडस यांची अपघातग्रस्ताला मदत
Wardha News : वर्ध्याच्या हिंगणघाट मार्गावरील धोतरा जवळ अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीचालक प्रज्वल ढगे हा रस्त्यावर पडून असल्याचे माजी खा. रामदास तडस यांना दिसले. रक्तबंबाळ अवस्थेत पडून असणाऱ्या प्रज्वलला रामदास तडस यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाडीत बसवत हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. याच काळात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून उपचारासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केला. तब्येत स्थिर असल्यानं त्याला नागपूर इथं पुढील उपचारासाठी हलविण्यात आलं. माजी खा. रामदास तडस यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रज्वलचा जीव वाचल्याने नातेवाईकानी रामदास तडस यांचे आभार मानले.
Ahilyanagar Crime News : 17 लाखांची लूट करणारे जेरबंद

Ahilyanagar News : वाटमारी करुन 17 लाख रुपये लुटणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह तीन जणांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. 30 डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील अनिल बनसोडे हे दुधाच्या पैशाचा भरणा करण्यासाठी कारमधून 17 लाख रुपये घेऊन जात असताना अज्ञात चार जणांनी त्यांची कार रस्त्यात अडवली आणि मारहाण करत जवळ असलेले सर्व 17 लाख रुपये लुटले. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेची माहिती घेत सूत्र फिरवले. मिळालेल्या माहितीच्या आधारे नगर शहरातील एमआयडीसी परिसरातून तीन जणांना ताब्यात घेतला आहे. यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर लूट केल्याची कबुली दिली आहे. लुटीत वापरलेली मोटरसायकल 3 लाख रुपये रोख, असा 4 लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाची पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

Dharashiv Electricity Issue : धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी इथं सौर प्रकल्प, मात्र शेतकऱ्यांना वीज मिळेना
Dharashiv News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी इथं सौर प्रकल्प उभारण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतच या प्रकल्पाचे लोकार्पणही करण्यात आले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं.  मात्र, नारंगवाडी इथं अद्याप शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही. शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रपाळी सुरूच आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी नारंगवाडी येथील सौर प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपली कैफियत मांडली. 
Satara Crime News : साताऱ्यातील कास पठाराजवळ एकाचा खून

Satara News : साताऱ्यातील कास पुष्प पठाराजवळ एकाचा खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत युवकाचं वय 30 ते 35 वर्षे असल्याचा अंदाज असून त्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. पर्यटक दरीचा फोटो काढत असताना पर्यटकांना मृतदेह दिसल्याने घटना उघडकीस आली.  यानंतर फाळणी गावच्या पोलीस पाटीलांनी मेढा पोलिसांना माहिती दिली. आता पोलिस पुढील तपास करतील, त्यातून हा मृतदेह कुणाचा हे समोर येईल.

Nagpur Crime : नागपुरात नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाकाबंदी कारवाईदरम्यान 41 लाखांची रोकड जप्त

Nagpur Crime : नागपुरात नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाकाबंदी कारवाईदरम्यान 41 लाखांची रोकड पोलिसांनी पकडली आहे. जप्त केलेली रक्कम हवालाची असण्याची शक्यता आहे. दुचाकीत रोकड लपवून नेणाऱ्या दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 41 लाख 67 हजार 300 रुपये जप्त केले आहेत. दोन्ही आरोपी मध्यप्रदेशचे आहेत.

Maharashtra News: तुळजाभवानी मातेचे मंदिर मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला 22 तास खुले राहणार

Maharashtra News: तुळजाभवानी मातेच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. भाविकांच्या गर्दीचा विचार करता आता नवीन वर्षात मंगळवार, शुक्रवार , रविवार आणि पौर्णिमेला  तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी रात्री एक वाजताच खुले होणार आहे. त्यामुळे या दिवशी भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे.  मंगळवार शुक्रवार हे देवीचे वार असतात, पौर्णिमेलाही मंदिरात गर्दी असते. तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची गर्दी पाहायला मिळते त्यामुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाचे या निर्णयाचे भाविकांसह पुजारी मंडळातूनही स्वागत होत आहे.

Thane Crime : ठाणे शहरात वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकले 369 मद्यपी

Thane Crime : ठाणे शहर परिसरातील वाहतूक पोलिसांच्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला जाळ्यात तब्बल 369 मद्यपी अडकल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस  उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. नववर्षाच्या जल्लोषात मद्य प्रश्न करून वाहन चालविण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यात वर्षाच्या पहिल्याच दिवशी 369 मद्यपान कोर्टाच्या दारात जावे लागले किंवा दंडाची 10 हजाराची रक्कम भरावी लागली. 


ठाणे शहर परिसरात वाहतूक विभागाच्या वतीने तब्बल 450 पोलिसांचा बंदोबस्त आणि ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीची मोहीम 26 डिसेंबर पासून राबविली होती. तर 31 डिसेंबरच्या रात्री ते पहाटे पर्यंत मद्य प्रश्न करून वाहन चालविणाऱ्या 369 मद्यपीना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत त्यांचे वाहन हे जप्त करून मद्यपीला न्यायालयात नेण्यात आले. तर न्यायालयात आकारलेला दंडाची रक्कम भरून आले. या गुन्ह्यात दंडाची रक्कमम न भरल्यास एक महिन्याची शिक्षेची तरतूद असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ अधिकारी यांनी दिली.
Dharashiv Breaking: तहसीलदार उपजिल्हाधिकारी वादावर दुसऱ्या दिवशीही तोडगा नाही, नागरीकांच्या कामाचा खोळंबा

Dharashiv Breaking: धाराशिवमध्ये नवीन वर्षाची सुरुवात तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाने झाली. उपजिल्हाधिकारी संजय कुमार ढव्हळे यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली अपमानास्पद वागू नको दिल्याचा आरोप तहसीलदार डॉ. मृणाल जाधव आणि कर्मचाऱ्यांनी केला. त्याविरोधात  मंगळवारी त्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला जिल्हाभरातील तहसीलदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तहसील मध्ये नागरिकांचा खोळंबा झाला. एन ए लेआऊट प्रकरणात भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी होत्या त्याची आपण चौकशी केल्याचं संजयकुमार ढव्हळे यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराची ढाल बोलू नका असं आव्हानही त्यांनी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना केले. दरम्यान जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आज आंदोलकांशी चर्चा करणार असून काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे.

Sangali Crime : सांगली एलसीबीने एका दुचाकी चोरट्याकडून 19 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस

Sangali Crime : सांगली एलसीबीने सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या तासगाव तालुक्यातील  चिंचणी  येथील तरूणाला अटक केलीय. या चोरट्यांकडून दोन्ही जिल्ह्यातील 19 गुन्हे उघडकीस आणत 19 चोरीच्या दुचाकी सांगली एलसीबीने जप्त केलेत. अमोल संभाजी साबळे, असं अटक केलेल्याचं नाव आहे. दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकाला सांगलीतील विश्रामबाग येथील जुना धामणी रस्ता परिसरात एकजण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली.


पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. पथकाने तेथे संशयास्पदरित्या थांबलेल्या साबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती मिरजेतील एका रूग्णालयासमोरून ती चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक, विश्रामबाग, मिरज शहर, संजयनगर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुपुरी, गावभाग इचलकरंजी, शिवाजीनगर आदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आणखी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याने चोरलेल्या तब्बल १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याला मिरजेच्या महात्मा गांधी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 
Nashik Crime : नाशकात महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार, निफाड आणि आडगाव पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यामध्ये महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. या प्रकरणी निफाड आणि आडगाव पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला.. यानंतर  आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिला गुन्हा घडल्यानं निफाड पोलिसांनी आडगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला.  आडगाव पोलिसांनी एकाला अटक केलीये तर चार संशयित आरोपी ताब्यात घेतलंय.  महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना पीडित तरुणीवर दोन वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी 2 जणांनी अत्याचार केल्याची  पोलिसांत तक्रार करण्यात आलीय. 

Sindhudurg News: सिंधुदुर्गात व्हेकेशनसाठी गेलेल्या पर्यटकांना डॉल्फिन्सचं दर्शन

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील तळाशिल समुद्रात कवडारॉक येथील समुद्र सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना डॉल्फिनच्या एका छोट्या पिल्लाला मोठा डॉल्फिन दर दोन-तीन मिनिटांनी पाण्यावर आणून वाचवण्याचा प्रयत्न करीत असतानाचं दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालंय. सुट्टीच्या हंगामात समुद्री सफरीचा अनुभव काही पर्यटक घेत असताना बोटीपासून काही अंतरावर एक प्रौढ डॉल्फिन एका छोट्या डॉल्फिनला पाण्याच्या पृष्ठभागावर आणत असल्याचे पर्यटकांना दिसून आले. प्रथमदर्शनी डॉल्फिन एकमेकांवर हल्ला करीत आहेत, असे वाटत होते. पण जवळ जाऊन पाहिले असता एक प्रौढ डॉल्फिन एका मृत छोट्या डॉल्फिनला पाण्याच्या पृष्ठभागावर ढकलत त्या डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आल.

Buldhana News : बुलढाण्यातील कळंबेश्र्वर गावातील सरपंचाच्या पतीला मारहाण, तुझा मस्साजोगचा सरपंच करू, अशी दिली धमकी

Buldhana News : बुलढाण्यातील कळंबेश्र्वर गावातील सरपंचाच्या पतीला मारहाण करून तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी गावगुंडांनी दिलीय. अवैध धंदे बंद केल्यानं गावगुंडांनी सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला एका अंत्यसंस्काराच्या ठिकाणी करण्यात आला. कळंबेश्वर येथील सुभाष खुरद यांच्या पत्नी डिसेंबर 2023 पासून ग्रामपंचायत सरपंच आहेत. त्यांच्या पतीवर गावगुंडांनी हल्ला केला. या प्रकरणी जानेफळ पोलिसांकडे पाच हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Air Pollution Control Rules: हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या 297 पैकी 39 बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेची कारणं दाखवा नोटीस

Air Pollution Control Rules: हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या 297 पैकी 39 बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेनं कारणं दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. 297बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचे निर्देश दिले होते. या नियमावलीचं पालन न करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीनं काम थांबविण्याचे आदेश दिले जाणार आहेत. 151 जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाखांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावले आहे.

Nagpur Crime : पोटच्या मुलानं आई-वडिलांना संपवलं; रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं

Nagpur Crime : पोटच्या मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना, कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत खसाळा कॅम्पसमध्ये घडली. लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृत आई वडिलांची नावे असून. आरोपी हा त्यांचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे. उत्कर्षने 26 डिसेंबरला आईची हत्या केल्यानंतर , बाहेरून घरी आलेल्या वडिलांनाही चाकूने भोसकले. गेल्या 6 वर्षांपासून इंजिनिअरींगचा अभ्यास करणाऱ्या उत्कर्षला यश येत नव्हतं. म्हणून आई वडिलांनी त्याला शेती करण्याचा सल्ला दिला होता. पण एमडी ड्रग्जच्या आहारी गेलेल्या उत्कर्षने, रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं. आई-वडिलांनी स्वत:चं जीवन संपवल्याचा बनाव रचला होता, पण पोलीस तपासामध्ये मुलाचं बिंग फुटलं.

Maharashtra News: वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची पोस्ट चर्चेत...

Maharashtra News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. जवळपास तीस वर्ष नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून काम पाहिलं. पण याच नार्वेकरांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून सध्या सध्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बीड हत्याप्रकरणासंदर्भात रडारवर असलेला बीडचा वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला. त्यावेळी नार्वेकरांनी पोस्ट लिहित मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. मिलिंद नार्वेकर यांचं अशाप्रकारे अभिनंदन करणं याचे सध्या अनेक अर्थ लावले जातायत.

Maharashtra News: वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची पोस्

Maharashtra News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. जवळपास तीस वर्ष नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून काम पाहिलं. पण याच नार्वेकरांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून सध्या सध्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बीड हत्याप्रकरणासंदर्भात रडारवर असलेला बीडचा वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला. त्यावेळी नार्वेकरांनी पोस्ट लिहित मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. मिलिंद नार्वेकर यांचं अशाप्रकारे अभिनंदन करणं याचे सध्या अनेक अर्थ लावले जातायत.

Maharashtra News: वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची पोस्

Maharashtra News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. जवळपास तीस वर्ष नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून काम पाहिलं. पण याच नार्वेकरांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून सध्या सध्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बीड हत्याप्रकरणासंदर्भात रडारवर असलेला बीडचा वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला. त्यावेळी नार्वेकरांनी पोस्ट लिहित मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. मिलिंद नार्वेकर यांचं अशाप्रकारे अभिनंदन करणं याचे सध्या अनेक अर्थ लावले जातायत.

Mumbai Municipal Corporation Elections: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली

Mumbai Municipal Corporation Elections: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली असून, पक्षप्रमुखांकडून सध्या मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांत आढावा घेण्यात येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या निरीक्षकांची बैठक 21 डिसेंबर रोजी झाली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या विधानसभा मतदारसंघनिहाय पहिल्या टप्प्याच्या बैठका डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पार पडल्या. आता दुसऱ्या टप्प्याच्या उर्वरित बैठका या 7 ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहेत. 

Devendra Fadnavis: सोशल मीडियावर फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणारे रडारवर; 12 सोशल मीडिया वापरकर्त्यांविरोधात आरोपपत्र


Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बदनामी आणि कायदा सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी 12 सोशल मीडिया वापरकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारे व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मुंबई येथील वरद कानकी नावाच्या व्यक्तीला आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी चौकशीसाठी आणण्यात आलं होतं. त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलाय. यात एक मॉर्फ व्हिडीओ आढळून आल्याची माहिती आहे. पद्माकर आंबोळकर नावाच्या व्यक्तीनं हा मॉर्फ व्हिडीओ सर्वात आधी फॉरवर्ड केला होता. आंबोळकरला उद्या चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर सेल प्रयत्नात आहे. 


Gadchiroli News: दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक

Gadchiroli News: दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू, असा विश्वास गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला. माओवाद्यांच्या ऐतिहासिक आत्मसमर्पणानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पालांची एबीपी माझाला खास मुलाखत दिली. गडचिरोलीत आता फक्त 46 सशस्त्र माओवादी शिल्लक असल्याचा दावाही त्यांनी केला. 

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे 2023 पासून फरार; सीआयडी तपासानंतर खळबळजनक खुलासा

Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात, सीआयडी तपासानंतर अनेक मोठे खुलासे होताहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे फरार आहेत. मात्र कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुलेवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता.  गुन्हा दाखल झाल्यानंतर  कृष्णा आंधळे 2023 पासून फरार आहे . त्यामुळे वर्षभर त्याला अटक का केली गेली नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जर पोलिसांनी कारवाई केली असती तर सरपंच संतोष देशमुखांची हत्या टळली असती का? असाही सवाल विचारला जातोय. तसंच दुसरा आरोपी म्हणजे सुदर्शन घुलेला 2023 मध्ये हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटकेनंतर जामीन मिळाल्यानं तो तुरुंगाबाहेर होता. घुलेशी संबंधित लोकांच्या चौकशीनंतर ही माहिती समोर आलीय. 

Crime News: नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांच्या नाकाबंदी कारवाई दरम्यान 41 लाखांची रोकड पोलिसांनी पकडली

Crime News: छुप्या मार्गाने दुचाकित मोठ्या रकमेची वाहतूक करणाऱ्या दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे. नागपूर  पोलिसांनी आरोपींकडून हवालाचे 41 लाख 67 हजार 300 रुपये जप्त केले आहे. दोनही आरोपी मध्यप्रदेशचे आहेत. महाल परिसरात गांधी गेट जवळ नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्री लावलेल्या नाकाबंदी दरम्यान एका दुचाकीवर आलेले दोघे जण घाबरलेले दिसून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी करत दुचाकीची डिक्की तपासली, तेव्हा त्यात 41 लाख 67 हजार 300 रुपयांची रक्कम आढळून आली.


पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून रोहित गुलाबचंद्र कोळी (वय 30) रा. जबलपूर मध्यप्रदेश आणि संगम रघुबीर कोळी (वय 27) रा. पन्नगढ, जबलपूर मध्यप्रदेश अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

Dharashiv Breaking: तहसीलदार उपजिल्हाधिकारी वादावर दुसऱ्या दिवशीही तोडगा नाही, नागरीकांच्या कामाचा खोळंबा

Dharashiv Breaking: तहसीलदार उपजिल्हाधिकारी वादावर दुसऱ्या दिवशीही तोडगा नाही, नागरीकांच्या कामाचा खोळंबा, तहसील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश , आंदोलकांशी आज चर्चा करणार. उपजिल्हाधिकारी संजयकुमार ढव्हळे यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली तहसीलदार डॉ. मृणाल जाधव आणि कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून कामबंद आंदोलन


एनए लेआऊट प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी केली, भ्रष्टाचाराची ढाल बनू नका ढव्हळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन


धाराशिवमध्ये नवीन वर्षाची सुरुवात तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाने झाली. उपजिल्हाधिकारी संजय कुमार ढव्हळे यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली अपमानास्पद वागू नको दिल्याचा आरोप तहसीलदार डॉ. मृणाल जाधव आणि कर्मचाऱ्यांनी केला. त्याविरोधात  मंगळवारी त्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला जिल्हाभरातील तहसीलदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तहसील मध्ये नागरिकांचा खोळंबा झाला. एन ए लेआऊट प्रकरणात भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी होत्या त्याची आपण चौकशी केल्याचं संजयकुमार ढव्हळे यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराची ढाल बोलू नका असं आव्हानही त्यांनी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना केले. दरम्यान जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आज आंदोलकांशी चर्चा करणार असून काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे.

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT स्थापन

Santosh Deshmukh Murder Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांंनी विधिमंडळ सभागृहातील चर्चेवेळी बोलताना, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी लवकरच राज्य सरकरकडून एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणारय. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखाली स्थापलेल्या एसआयटीमध्ये 10 अधिकारी असणार आहेत.. याशिवाय स्थानिक पोलीस आणि सीआयडीचाही स्वतंत्र तपास सुरू राहणार आहे.

Maharashtra Cabinate Meeting: खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक, शंभर दिवसांचा रोड मॅप आणि प्रस्तावित एसटी भाडेवाढीवर निर्णय अपेक्षित

Maharashtra Cabinate Meeting: राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता बैठक पार पडणार आहे. खातेवाटपानंतर ही पहिलीच बैठक असणार आहे. दुपारी बारा वाजता मंत्रालयात कॅबिनेट बैठक होईल. अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत होतील अशी शक्यता आहे.  शंभर दिवसांचा रोड मॅप संदर्भात मुख्यमंत्री प्रत्येक विभागाचा आढावा घेत आहेत, यावरही आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष आहे. महामंडळाने 15 टक्के भाडेवाढचा प्रस्ताव मांडलाय. आज मंत्रिमंडळ याला मान्यता देतं का याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग हत्या प्रकरणावरही आज चर्चा होण्याची शक्यता आहे. 

पार्श्वभूमी

राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दरम्यान, कराड यांच्या अटकेनंतर देशमुख हत्याप्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात पारा चांगलाच घसरला असून सर्वदूर थंडीचा कडाका वाडला आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...


1. खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक, शंभर दिवसांचा रोड मॅप आणि प्रस्तावित एसटी भाडेवाढीवर निर्णय अपेक्षित


2. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीची स्थापना, आयपीएस डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली होणार तपास, सीआयडीचा स्वतंत्र तपास सुरूच राहणार


3. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारी आटोपून आज नाशकात परतणार, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा उद्या कटगुणमध्ये कार्यक्रम


4. संभाजीनगरात मंत्रिपदापासून दूर राहिलेल्या अब्दुल सत्तार यांचं शक्तिप्रदर्शन...विश्वास असेपर्यंत शिंदेंना साथ, विश्वास संपल्यानंतर 'निर्णय', सत्तारांचा थेट इशारा...


5. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे रडारवर, 12 यूझर्सविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.