Balasaheb Thorat : महाराष्ट्र म्हणून आम्ही एकमताने निवडणूक लढवली आहे.आमचे पक्षांतर्गत कोणतेही वाद नव्हते असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं. कुठलं धोरण ठरवायचं त्यावर आजच्या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली. तसेच निवडणुकीत भाजपने वापरलेल्या गोष्टींवर देखील चर्चा झाली. मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारीत अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे थोरात म्हणाले. सायंकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झालं हा संशोधनाचा विषय असल्याचे थोरात म्हणाले.
EVM बाबत निवेदन रात्री येईल. मतदानाची आकडेवारी वाढली त्यात अनेक संशयास्पद गोष्टी आहेत. त्या आम्ही निदर्शनाला आणून दिल्या आहेत. त्यावर AICC विचार करत असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. सायंकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झाल हा संशोधनाचा विषय आहे. बंटी शेळके यांच्या आरोपावर देखील थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. असा आरोप करन चुकीचं आहे. हा आरोप योग्य नसल्याचे थोरात म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर विरोधकांकडून EVM बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. देश विदेशातील जाणकार याबाबत आपले मत मांडत आहेत. तर विरोधक EVM मध्ये गैरप्रकार झाल्याचे सांगत आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी देखील केली आहे. अनेकांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं या मुद्यावरुन सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
नवी दिल्लीत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक
आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची (CWC) बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा देखील झाली. CWC बैठकीत केवळ ईव्हीएमवरच (EVM) नव्हे तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच त्यावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे. आज सकाळी काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी, नाना पटोले, रमेश चेन्निथला आणि मुकुल वासनिक यांनी निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालाबाबत एक पत्र लिहिले आहे. यावर देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आम्ही आमचे काम करत आहोत, आमचा धर्म पूर्ण करत आहोत, पण निवडणूक आयोगानेही आपले कर्तव्य बजावले पाहिजे अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्या आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. याबाबत विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या: